Home Blog Page 58

दैनिक जनमत ०५ डिसेंबर २०२३ E paper

दैनिक जनमत ०४ डिसेंबर २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०२ डिसेंबर २०२३ E paper

 

धाराशिव येथे धनगर समाज एस.टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा

धाराशिव –  30 नोव्हेंबर 2023 रोजी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावेत या एकमेव मागणीसाठी काढण्यात येणार आहे, भारतीय राज्यघटनेत आरक्षण असताना सुद्धा केंद्र शासनाने व राज्य शासनाने धनगर समाजाला उपेक्षित ठेवले आसून राज्यघटनेत दिलेल्या आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे. त्या अनुषंगाने मोर्चा 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:00वाजता लेडीज क्लब पासून सुरू होऊन श्री संत गाडगेबाबा चौक -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक -छत्रपती शिवाजी महाराज चौक -लहुजी वस्ताद साळवे चौक ते जिल्हाअधिकारी कार्यालय धाराशिव येथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी धनगर समाजातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चासाठी आलेल्या वाहनाची पार्किंगची व्यवस्था लेडीज क्लब मैदान धाराशिव व मल्टीपर्पज हायस्कूल मैदान धाराशिव या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास 300 स्वयंसेवक हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

मा.आ.ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस परंडा शहरात धार्मीक व सामाजीक उपक्रमाने साजरा

परंडा (भजनदास गुडे)भुम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या वाढदिवस परंडा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या व युवा सेनेच्या वतीने सामाजीक व धार्मीक उपक्रम राबऊन दि २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.  परंडा शहराचे कुलदैवत हजरत ख्वाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद दर्गा येथे फुलाची चादर अर्पण करुन ज्ञानेश्वर पाटील यांना दिर्घष्य लाभावे यासाठी प्रार्थना  करण्यात आली. तसेच शहरातील श्रीराम मंदीर येथे महाआरती करण्यात आली व परंडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना फळाचे वाटप करण्यात आले.   यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील,शहर प्रमुख रईस मुजावर,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती जयकुमार जैन,मा.नगरध्यक्ष सुभाष शिंदे,मा.नगरध्यक्ष शिवाजी मेहेर,जर्नाधन मेहेर,मा.नगरसेवक डॉ.अब्बास मुजावर, मा.नगरसेवक इरफान शेख,मा.मंकरद जोशी, मा.नगरसेवक विनोद साळवे, संजय कदम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जावेद बागवान, अनिकेत काशीद,हरि नलवडे,सरपंच रेवण ढोरे, नागनाथ नरसाळे,अंकुश डांगे,अरविद नरूटे,गणेश भांगे,युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव, संतोष गायकवाड,दिपक गायकवाड, तुकाराम गायकवाड,बाकर मुजावर, रविकिरण चैतन्य,बालाजी गायकवाड, दत्ता मेहेर,धनाजी जाधव,शाहरूख मुजावर,तय्यब मुजावर,फिरोज मुजावर,सद्दाम मुजावर,राजा पाटील, औदुंबर पाटील, धनराज पाटील, दतात्रय धनवे,मजहर दहेलूज, ज्योतीराम गायकवाड,रमेश गरड, लक्ष्मण हौरे,लक्ष्मण गरड,शिवाजी कदम,सत्तार पठाण,लतीफ कुरैशी, मोहन बुरुड,सचिन शिंदे,अजित पाटील वाकडी,विकास सांळुके,ओंकर काशीद,अहेमद भोले, मुन्ना भोले, बालाजी बुलबुले, प्रितम डाके,जितेश थोरबोले,बापू मुळे, रणजित इतापे, सुरज पाटील, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.