मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अश्विनी धनंजय पडवळ(मुंडे) यांची सर्वानुमते निवड

धाराशिव – मागील सोळावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अश्विनी धनंजय पडवळ (मुंडे), कार्याध्यक्षपदी सुधाकर पवार तर सचिवपदी बाळासाहेब केदार यांची निवड करण्यात आली.


जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी १२ जानेवारीपासून समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहु समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभुषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार. मान्यवरांची व्याख्याने, स्त्री रुग्णालय येथे विविध साहित्य वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर देखील या निमित्ताने आयोजित केले जाते. यावर्षी देखील समितीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
प्रभाग १९ मधील नागरी समस्यासाठी रासपचा तुळजापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन

उप मुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांनी केली प्रभाग क्रमांक 19 ची पाहणी
धाराशिव शहरातील प्रभाग क्र.१९ मधील नागरी समस्या व असुविधेबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नाका पोहनेर रोड येथे प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रभागातील समस्या, कचरा, गटारी, मोकाट जनावरे, रस्ते अशा विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला यापूर्वी वेळोवेळी
जिल्हाधिकारी, व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आली होती परंतु प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी किंवा दखल न घेतल्यामुळे रासपच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला यावेळी नगरपरिषद चे उपमुख्य अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी नागरिकांनी प्रभागातील समस्याची पाहणी करण्याचा आग्रह केल्यानंतर उपमुख्याधिकारी यांनी पाहणी केली यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी विधी न्याय विभाग शमशुद्दीन सय्यद, शहराध्यक्ष सलीम पठाण, तालुकाध्यक्ष सचिन देवकते, युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बंडगर, शाम तेलकर, गोरोबा पवार, डॉक्टर स्वामी, इंगळे दादा, युवराज देवकते, सचिन साळुंखे, तुकाराम घोडके, राहुल जाधव, बालाजी माने, चंद्रकांत पोंदे, मोहसीन पठाण, जमीर शेख, सोनू निचलं, अण्णा शेंडगे, नेताजी कोकाटे, अमोल कोटेकर आदीं सह प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते, हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
झटतय कोण आणि नटतय कोण…भाजपावाढीसाठी फिरतय कोण…
डी एस गायकवाड
अकलूज(प्रतिनिधी)
- भाजपावाढीस कारणीभूत ठरलेले मोहिते पाटील भाजपासाठी पायात भिंगरी बांधून जंग जंग पछाडताना दिसत आहेत ते जीवाचे रान करताना दिसत आहेत. न थांबता न थकता भाजपासाठी आणखी वातावरण सुपीक करताना दिसत आहेत पण अशा परिस्थितीत फक्त पदे घेऊन आपणच भाजपाचे तारणहार असल्याच्या अविर्भावात फिरून काही नेते मंडळी फक्त मलीद्याला उठताना दिसत आहेत. म्हणजे भाजपा वाढविणार मोहिते पाटील आणि त्याची फळे चाखायला मात्र अनेक जण टपलेले दिसत आहेत. त्यामुळे कोण काम करतय यावरून झटतय कोण आणि फुकटात नटतय कोण अशी चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असताना दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपामध्ये एकमेकांना पाण्यात पाहण्याचेच धंदे जोमात सुरू आहेत. मुळात पक्ष कोणी वाढवला हे पाहणे गरजेचे बनले आहे आणि आता सुद्धा पक्षासाठी तन-मन-धनाने कोण काम करत आहे हेही पाहणे पक्षाच्या हिताचे ठरणार आहे. मोठमोठाली पदे घेऊन अनेक जण भाजपमध्ये सध्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेताना दिसत आहेत.पक्ष वाढीसाठी ते कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. फक्त वरिष्ठ नेते मंडळी आली की त्यांच्या पुढे पुढे करायचे, त्या नेते मंडळींना मिसगाईड करायचे, पक्षासाठी आजचे सुपीक वातावरण हे माझ्यामुळेच झाले आहे असा अविर्भाव दाखवायचा हेच उद्योग सध्या सुरू आहेत.त्यामुळे मनापासून झटणारे कार्यकर्ते नेते बाजूलाच राहताना दिसत आहेत. काही जणांना तर इतकी मोठी पदे दिली आहेत की त्यांचे योगदान शून्य आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा देखील पत्त्या नाही. त्यामुळे आता भाजपा पक्षाला सतर्कता दाखवावी लागणार आहे. काम करणाऱ्यांना पदे दिली पाहिजेत. जे बिनकामाची पदे घेवून मिरवत आहेत त्यांना पक्ष वाढीसाठी आपले योगदान काय हे पक्षाने विचारले पाहिजे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण आहे पण हे वातावरण अशा मंडळीमुळे बिघडताना दिसत आहे.दुसरीकडे मोहिते पाटील मात्र अचूक धोरण आखून पक्षवाढीसाठी योगदान देताना दिसत आहेत. मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक तालुक्यात ते संपर्क अभियान राबवून, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करून,पक्षाची संघटनात्मक ताकद उभा करताना दिसत आहेत. बूथ रचना सक्षम करून सूक्ष्म नियोजनाने ते पक्षाला आणखी मजबुतीकडे घेऊन जाताना दिसत आहेत. अशा अवस्थेत काहीजण पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा नेत्यांना वेळीच भाजपाने रोखले पाहिजे. वातावरण चांगले असताना काही मंडळी ते खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर पक्षाने अंकुश ठेवला पाहिजे. पक्ष ध्येय धोरणाने पुढे जातो ती ध्येय धोरणे अचूकरित्या मोहिते पाटील राबवताना दिसत आहेत याची प्रचिती गत लोकसभा निवडणुकीत आलेली आहे. कमी कालावधीत मोहिते पाटलांनी हे अद्वितीय यश मिळवून दिले होते. आता त्यांच्या नेतृत्वामुळे पूर्वीपेक्षाही आणखी भक्कमपणा वाढला आहे. पण पक्षातील वरिष्ठ मंडळीनी देखील आता पक्षांमध्ये कलुशीत वातावरण कोण निर्माण करत आहे हे तपासले पाहिजे आणि सच्चा नेतृत्वाच्या पाठीमागिल बळ वाढवले पाहिजे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाची क्रेझ
- भाजपाचे संघटन महामंत्री म्हणून कार्यरत असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपाला जुडताना दिसत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी पक्षासाठी सक्षम अशी बूथ यंत्रणा लावली आहे. सर्व स्तरात मिसळून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने अनेक युवक भाजपामध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यांच्या धोरणी नेतृत्वाचा भाजपाला फायदा होत असताना दिसत आहे. एवढा मोठा मतदार संघ असताना सुद्धा संपूर्ण मतदारसंघांमध्ये फिरून कार्यकर्त्यांची मोळी बांधणारे ते भाजपातील एकमेव नेते ठरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे माढा मतदारसंघात भाजपा निर्विवाद वर्चस्व मिळवेल असे वातावरण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी त्यांचे थेट कनेक्टिंग असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावाचा सध्या जोर मतदार संघात वाढताना दिसतो आहे. असंख्य कार्यकर्त्यातून त्यांच्या उमेदवारीची मागणी आतापासूनच होताना दिसत आहे.
दैनिक जनमत मध्ये आपले स्वागत !
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!









