










प्रतिनिधी (तुळजापूर) : महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटना व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटना यांच्या वतीने जळगाव येथे ११ व्या वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी करत चार रजतपदकासह चार कांस्यपदकांची कमाई केली.
दि. १९ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. यात राज्यातील मुलांच्या गटात ३५ जिल्ह्यातील तर मुलींच्या गटात ३० जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.
यात धाराशिव जिल्ह्याकडून खेळताना मुलींच्या एकेरी स्पर्धेत प्रियांका किरण हंगरगेकर हिने रजतपदक पटकावले. तर मुलींच्या दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर व प्रेरणा देशमुख यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलींच्या सांघीक संघाला रजतपदक प्राप्त झाले.या संघात प्रियांका हंगरगेकर, प्रेरणा देशमुख, इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, शुभांगी नन्नवरे यांचा सहभाग होता.
मुलांच्या एकेरी स्पर्धेत स्वराज देशमुख यांने कांस्यपदक प्राप्त केले. मुलांच्या दुहेरी स्पर्धेत सुयश आडे व आदित्य सापते यांनी रजतपदक प्राप्त केले. दुहेरीमध्ये यशराज हुंडेकरी व संजय नागरे यांनी यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलांच्या सांघीक संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात स्वराज देशमुख, आदित्य सापते, यश हुंडेकरी, कृष्णा थिटे, करण खंडागळे, संजय नागरे, सुयश आडे यांची सहभाग होता.
मिश्र दुहेरीमध्ये प्रियांका हंगरगेकर व यश हुंडेकरी यांनी रजतपदक प्राप्त केले.या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे, प्रशिक्षक राहुल जाधव यांनी अभिनंदन केले.
लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी उद्गार

धाराशिव : ( प्रतिनिधी ) भारतरत्न माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा समिती, धाराशिव या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकसेवा पुरस्कार – २०२३ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , श्री. शेषाद्री डांगे , कमलाकर पाटील , श्री. शिवाजीराव कदम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अटलजींच्या प्रतिमा पुजनाने व दिप प्रज्वलनाने झाली.
पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून हा पुरस्कार मराठवाडा स्तरीय पुरस्कार आहे. यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार- २०२३ परंडा ( जि. धाराशिव ) येथील जगन्नाथ राजाराम साळुंके, मुरुड ( जि. लातूर ) येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी आणि बुधोडा ( ता. औसा ) शरद केशवराव झरे यांना प्रदान करण्यात आला.
परंडा येथील समसमपुर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिर परिसरात झाडे लावून सुशोभीकरण करणे तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण व व्यवस्था केल्याबद्दल श्री. जगन्नाथ साळुंके यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देण्यात आला. बुधोडा ( ता. औसा ) येथे ५१ निराधार , वंचित , उपेक्षित मुलांना संरक्षण , संगोपन व शिक्षण देऊन भावी पिढी घडविणारया शरद केशवराव झरे यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विषमुक्त सेंद्रिय शेती करणारे व शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा देणारे मुरुड येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी यांना यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी यांना रोख अकरा हजार रुपये , सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले की , अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व असून निस्वार्थीपणे समाजहिताचे काम करणारे लोक समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यांनी दुष्काळ , पाणी , प्रदुषण , सेंद्रिय शेती , शेतकरी आत्महत्या , सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले की , निरपेक्ष वृत्तीने लोक कल्याणाचे कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन तरुणांनी कार्य करणे गरजेचे आहे.
शेषाद्री डांगे म्हणाले की , अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या उत्तुंग कार्याने जगाला भारताची ओळख करून दिली. निस्वार्थीपणा व सद्भावना जपणारी कर्तृत्ववान माणसं समाजासमोर आणण्याकरिता लोकसेवा समिती गेल्या चौदा वर्षांपासून काम करत असून सर्वांनी हे काम व्यापक स्वरूपात करण्यासाठी सहकार्य करावे.
यावेळी सहशिक्षिका मीरा पवार व विद्यार्थीनी नारायणी कुलकर्णी यांनी स्वागत गीत म्हटले तर वर्षाताई पाटील यांनी वैयक्तिक गीत गायान केले. याप्रसंगी लोकसेवा समितीला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. योगेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक , विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई – २०२४ च्या लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तसे राजकारण देखील बदलू लागले आहे. महाराष्ट्रात भाजपचे मिशन ४५ सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत वंचित बहुजन आघाडी संदर्भात मोठे वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत केले आहे.
आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू, काही प्रमुख लोकं शिवसेना आणि महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत ती गणितं बदलणार आहेत. किमान ४० जागा लोकसभेच्या जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपच्या मिशन ४५ वर टीका करताना त्यांनी भाजप देशात १ हजार जागा जिंकेल आणि राज्यात १४८ जागा जिंकेल असा उपरोधिक टोला लगावला.भाजप हवेतला पक्ष आहे. जो पक्ष मिंधे आणि अजित पवार दोन कुबड्यांवर उभा आहे त्यांनी ४५ जागा जिंकण्याची भाषा करावी हे हास्यास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू
बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने पुढे जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशामध्ये संविधान टिकावं , या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची आणि त्यांची जी चर्चा होतेय ती अत्यंत सकारात्मक होतेय आणि ती चालू आहे, लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत. २८ डिसेंबर नंतर जी बैठक होणार आहे ती निर्णायक बैठक होईल, प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील. शिवसेनेच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकूमशाहीवर हल्ले करत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

तुळजापूर, दि.24 (प्रतिनिधी) :तालुक्याचा आमदार झाल्यावर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करू अशा घोषणा करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. परंतु प्रत्यक्षात गेल्या चार वर्षात कुठलीही मोठी विकास योजना न आणता, उलट तालुक्याचा विकास दहा वर्ष मागे पडला आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांनी सर्किट हाऊस सिटी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यात रखडलेल्या योजनांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने कृष्णा खोरे अंतर्गत तालुक्याला मिळणारे सात टीएमसी पाणी अद्यापही मिळाले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेती ओलीचा खाली अजूनही आली नाही. रेल्वे प्रश्न मार्गी लागला मार्गी लागला असे वारंवार सांगितले जाते, परंतु त्याचे प्रत्यक्ष काम अजूनही सुरू झाली नाही. तुळजापूरसाठी पंधराशे कोटी रुपयांची केंद्राची योजना आणली असे वारंवार सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात कशा प्रकारचा केंद्राचा कुठला आदेशही निघाला नाही, तुळजापूर शहर विकासासाठी 158 कोटी रुपये निधी मंजूर झाला असे सांगितले जाते, त्याचीही कुठे अंमलबजावणी झाली नाही.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अजूनही सोडविला नाही, पैसा नसल्याने सातवा वेतन देता येत नाही असे सांगितले जाते. परंतु तुळजाभवानी मंदिरामार्फत जिल्ह्यामध्ये शाळा सुधारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी देण्यात आला. सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काढण्यासाठी मंदिराकडून 50 कोटी मागणी करण्यात आली आहे, तर कौशल्य विकास विद्यापीठ काढण्यासाठी मंदिराकडे 15 कोटीची मागणी करण्यात आली आहे, जर मंदिराकडूनच सर्व पैसा घ्यायचा असेल तर तुम्ही सरकार मधले आमदार असून त्याचा उपयोग काय असा प्रश्न पडला आहे.
एमआयडीसी सारखा रोजगारभूमिक प्रश्न महत्त्वाचा आहे, पण यावर देखील तालुक्यात एक एकर देखील जागा अधिग्रहण केली नाही, मग एमआयडीसी होणार कशी तालुक्याचा विकास होणार कसा मागील निवडणुकीत निवडून येण्यासाठी तालुक्यातील लोकाला मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या, पण विकास कुठे गेला, हाच कळत नाही. फक्त सोशल मिडीयावर पोस्ट फिरवून आपण असे असे काम केले सांगणे म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे असा घणाघात जगदाळे यांनी केला.
आता जनता यांना कंटाळली आहे, त्यांना बदल हवा आहे, तो बदल महाविकास आघाडी करणार आहे, यासाठी आपण परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्यादारी जाणार आहोत, कोणतेही आश्वासन न देता फक्त कृतीतून विकास काम करणार आहोत आणि हाच आपला अजेंडा राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
परंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता,सतर्कता व तत्परता

परंडा (प्रतिनिधी दि.२३डिसेंबर) – मोरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कुर्डूवाडी रोड परंडा येथे दि.२२ डिसेबर रोजी अत्यावश्यक सेवेमध्ये रात्री ११ ते ११: ३० च्या दरम्यान एक ऑपरेशन सुरू होते.त्याचवेळी हॉस्पिटलच्या समोरील रोडला काही अज्ञाताची भांडणे सुरू झाली होती.त्या पळापळीत दगडफेकीच्या भीतीने ऑपरेशनसाठी आलेले बाहेरचे तज्ञ सर्जन डॉक्टर व भूलतज्ञ यांच्या गाडीतीचे ड्रायव्हर घाबरले.त्यांनी हॉस्पिटलमध्ये घाबरून फोन केला बाहेर गोंधळ चालू आहे गाडीवर दगडफेक होण्याची शक्यता आहे.
तेवढ्यात ग्रामीण भागातील एका रुग्णाच्या अचानक छातीत दुखून चक्कर येऊन पडल्यामुळे त्यास मोरे हॉस्पिटल येथे उपचारा साठी आणले होते.त्या चवेळी त्या रुग्ण व नातेवाईका बरोबर या अज्ञात गोंधळ घालणाऱ्या जामावा मधील काही आठ-दहा व्यक्ती दवाखान्यामध्ये त्या रुग्णासोबत शिरले.कदाचित त्याच्या मधील व्यक्तींचा हेतू त्या रुग्णाला वाचवण्याचा असू शकतो.हे समजताच या गोंधळाने सर्जन व भूल तज्ञ डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट ऑपरेशन करत असताना घाबरले.मध्येच ऑपरेशन तर थांबवणे शक्यच नव्हते अशावेळी भूलतज्ञ यांनी परंडा पोलीस स्टेशनला फोन केला.क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यारी मोरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व त्यांनी हॉस्पिटल समोरील गोंधळ शांत केला व हॉस्पिटल मध्ये गेलेल्या जमाची समजुत काढून त्यांना बाहेर काढले.व दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन थिएटर मधील ऑपरेशम करणाऱ्या डॉक्टर वअसिस्टंट यांना धीर दिला व तुमचे सर्व कार्य संपेपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्येच थांबतो आहोत असे सांगीतले.
ऑपरेशन संपल्यानंतर त्या दोन्ही डॉक्टरांच्या गाड्या जाईपर्यंत पोलीस कर्मचारी मोरे हॉस्पिटल येथेच उपस्थित होते. परंडा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य वेळी मदतीमुळे सर्वच रुग्ण, त्यांचे नातेवाईक,तज्ञ डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील स्टाफ आणि ऍडमिट पेशंट यांना मोठा दिलासा मिळाला.
परंडा पोलीस स्टेशनच्या आधिकारी, कर्मचाऱ्यांची तत्परता
योग्य वेळी धावून आलेल्या या देवदूतांमुळेच समाज रक्षक पोलीस दल यांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची प्रचिती आली.संविधानाचे अधिकार प्रामाणिक,दक्ष, संवेदनशील,संस्कारक्षम व्यक्तींच्या हाती गेले तर कायदा सुव्यवस्थेने समाजातील गरीब, वंचित,पीडित घटक सुखी होईल. पोलीस दलाचे अथक परिश्रम व रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गुन्हेगारी जगतावर जो वचक ठेवला आहे.याचमुळे आम्ही सर्व कुटुंबीय रात्री शांततेची झोप आपल्या मुलाबाळांसोबत घेतो आहोत.मात्र हीच दक्ष सतर्क यंत्रणा ऊन,वारा,पाऊस,प्रकाश, अंधार या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या कुटुंबा पासून दूर राहून निस्वार्थ भावनेने कर्तव्यनिष्ठ समाजसेवा करतात, ती एक प्रकारची देशसेवाच आहे. याचा आम्हा भारत देश बांधवांना अभिमान व गर्व आहे.अशा सर्व खाकी वर्दीतील देवदुतांना मानाचा मुजरा.
दुरितांचे तिमीर जावो।विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो।जो जे वांच्छिल तो ते लाहो।प्राणीजात ।
डॉ.आनंद गोरख मोरे. एम.डी.वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय परंडा
मोरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. परंडा .

परांडा (प्रतिनिधी)परांडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूल व डॉ.वेदप्रकाश विद्यामंदिर या शाळेत संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘फन -फेअर ‘हा विध्यार्थ्यांच्या विविध कला -कौशल्याला वाव मिळावा हा मनोरंजनात्माक व आनंददायी उपक्रम अतिशय उत्साहत पार पडला.
यावेळी या ‘आनंद मेळाव्यात ‘एकूण २१२ विद्यार्थ्यांनी १०६ स्टॉल लावले होते.यामध्ये भाजीपाला,फळे,मसालेदार पदार्थ,सौंदर्य प्रसाधने,बाईक शोरूम,खेळ व खेळणी इ.ची अतिशय उत्कृष्ट मांडणी करून खूप मोठे मोठे आकर्षक स्टॉल लागले होते.विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य,नेतृत्व गुण,मार्केटिंग स्किल,सवांद कौशल्य,संघटन कौशल्य समजावे व शिक्षणातून मनोरंजन व्हावे या हेतूने या ‘फन -फेअर ‘ उपक्रमाचे आयोजन केले होते.
यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य दाखवत लाखो रुपयांची उलाढाल केली.या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना १०० पैकी गुण देण्यात येणार आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांना शाळेत या स्पर्धेचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,माजी सभापती अनुजा दैन,सुचिता सिद्धेश्वर पाटील,अॅड.झहीर चौधरी, भोत्राच्या सरपंच उर्मिला पाटील, विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, अशोक खुळे,अॅड.पै.विशाल देवकर,अजय खरसडे,डॉ. अब्बास मुजावर,एव्हरेस्ट देशमुख,जफर जिनेरी,इरफान शेख,समीर पठाण,जयदेव गोफने,शीतल खराडे,संजीवनी पाटील, बाळासाहेब गोडगे,पंजाब घाडगे, सागर ठाकूर,जावेद पठाण, प्राचार्य संतोष भांडवलकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व स्टॉल ला भेटी देऊन कौतुक केले व आनंद घेतला.
मार्केट डे चे संयोजक म्हणून संतोष शेरे,विकास शेळके,राणी भिल्लारे,दादासाहेब गिरवले व सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी काम पहिले.निरीक्षक म्हणून विकास सुरवसे व सुमित कोकाटे यांनी काम पाहीले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा गव्हाळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी दिवसभरातून परंडा व तालुक्यातील अनेक पालक व शिक्षण प्रेमी नागरीकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कौतुक केले.

धारशिव – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 21डिसेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर ४.०० वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन (लॉजमालक) 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर-2) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- 3) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, पोलीस हावलदार- अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार- साईनाथ आशमोड, योगेश कोळी, रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार- भोसले, अरब यांच्या पथकाने केली