Home Blog Page 52

महिलांचा आत्मविश्वास वृंध्दीगत करण्यासाठी हिरकणी महोत्सव हक्काचे व्यासपीठ – आ. राणाजगजितसिंह पाटील

महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून लेडीज क्लबच्या माध्यमातून ‘हिरकणी महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत आत्मनिर्भर बनत महिलांनी विकसित भारताच्या संकल्प यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, जिल्ह्यात १५०० हून अधिक उद्योजकांनी प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून विविध उद्योग सूरु करत स्वतःला व इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांनी ड्रोनद्वारे शेती मशागतीची कामे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या कि, धाराशिव जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी लेडीज क्लब च्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महालक्ष्मी सरस भीमथडी जत्रा तसेच महिला बचत गटांच्या वेगवेगळ्या उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गटांना नेऊन त्याची विक्री व्यवस्था तसेच मार्केटिंग शिकवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी संक्रांतीचे वाण म्हणून श्री राम प्रभूंच्या मूर्ती महिलांना देणार असल्याचं सांगत 22 जानेवारीला घरोघरी या मूर्तीचे पूजन करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात १० जानेवारी पर्यंत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले असून महिलांसाठी उद्योजकीय तसेच सांस्कृतिक मनोरंजन, गीत रामायण यासारखे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी देवीची नऊ रूपे नृत्य अविष्कारामध्ये सादर करणाऱ्या चाळीस महिलांच्या ताफ्याचा नवदुर्गा हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी सदरील कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेल्या जिल्ह्यातील यशस्वी हिरकण्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.संताजीराव चालुक्य पाटील, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री.सुरेशभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.नेताजीराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती सौ. महिमा कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

Dainik Janmat 05 January 2024 E paper

0

Dainik Janmat 04 January 2023 E Paper

0

सोलापूरकरांना नव्या वर्षात मिळाले ४५ किलोमीटरच्या रिंग रोडचे गिफ्ट

नव्या रिंगरोडमुळे कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी होणार उपयोग

(प्रतिनिधी) : सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती. एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम २०२२ पासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. २०२४ या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना हे नवं गिफ्ट मिळालं आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा ४५ किलोमीटरच्या रिंग रूटची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूरच्या हद्दीतील एकूण ५ विभाग शहराशी सहजपणे जोडण्यासाठी या रिंगरोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडचे काम ओजोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने कमी वेळेत उत्तमरित्या केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. या रिंग रोडमुळे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मधील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतमालाच्या वाहतुकीसह दळणवळणाचे साधन ग्रामीण भागात जलद गतीने पोहोचण्यासही मोठा उपयोग होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डी अशी अनेक गावे सोलापूर शहराशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम गेल्या वर्षी २० मे २०२३ रोजी कंपनीला देण्यात आले होते. ते काम ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग सुरू करून नवीन वर्षाचं गिफ्ट लोकांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती ओजोनलँड
कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह म्हणाले. या प्रकल्पामध्ये २-लेन/४-लेन महामार्ग तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि पुनर्वसन, सध्याच्या महामार्गालगत चांगले फूटपाथ बांधणे इत्यादींचा समावेश आहे. या नव्याने विकसित झालेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे केवळ लोकांची हालचाल सुधारणार नाही तर कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी चांगल्या वाहतूक व्यवस्थेद्वारे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करेल. याशिवाय या चांगल्या रस्त्यांचे जाळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यास मदत करेल असंही ओजोनलँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०२४ मध्ये सोलापूरकरांना मिळालेल्या या गिफ्टमुळे सोलापूरकर देखील आनंद व्यक्त करत आहेत.

Dainik Janmat 03 January 2023 E Paper

0

Dainik Janmat 02 January 2023 E paper

0

Dainik Janmat 01 January 2024 E Paper

0

उमरगा येथे अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा लॉज मालक चालकावर गुन्हा नोंद

उमरगा पोलीस ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉज वर पोलिसांचे छापासत्र सुरू आहे. आरोपी नामे- 1)धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय 42 वर्षे, व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा जि. धाराशिव 2) रविंद्र महादेव महतो, वय 35 वर्षे, व्यावसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा. कमरवली थाना पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता. उमरगा जि. धाराशिव, 3) आशा रामचंद्र तेलंग (लॉज मालक) रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.30 डिसेंबर रोजी 17.00 वा सु आरोग्य नगरी उमरगा येथील शांतादुर्गा लॉज येथे एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 370,370(अ)(2),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

भारतीय जनता पार्टी महाविजय-2024 सुपर वॉरियर्स छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग सहसमनव्यक म्हणून ॲड. अनिल काळे यांची नियुक्ती

धाराशिव –
भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक आज 30 डिसेंबर रोजी वसंत स्मृती दादर मुंबई येथे झाली या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केमवाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील भाजपचे एकनिष्ठ व खूप जुने कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस व बावनकुळे व विक्रांत पाटील यांचे जवळचे असणारे भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांची त्यांचे काम पाहून महाविजय-2024 सुपरवारीयर्स मराठवाडा-विभागीय सहसमनव्यक पदी नियक्ती केली आहे या नियुक्तीमळे मराठवाडा पातळीवर काम करण्याची खूप मोठी जबाबदारी देऊन संधी दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील 100 सक्षम कार्यकर्ते म्हणजे सुपरवारीयर यांना कामास लावून ते सक्षम झाले तर मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार यांना निवडून येतील अश्या प्रकारची जबाबदारी मिळाली आहे या निवडीबद्दल मा बावनकुळे साहेबांनी शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र भाऊ फडणवीस आ आशिषजी शेलार आ श्रीकांत भारतीय आ प्रवीण दरेकर आ राणा जगजितसिंह पाटील माजी आ.सुजितसिंह ठाकूर ॲड.मिलिंद पाटील तसेच धाराशिव जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या