Home Blog Page 50

शेतकरी चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता – नितीन काळे

जो तेरणा कारखाना निवडणूक लढवून ताब्यात घेतला ७२ शेतकऱ्यांना कारखान्याच्या कर्जापोटी जमिनी विकाव्या लागल्या, पोटाला चिमटा लावून शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले, त्यावेळी तेरणा कारखाना कोणाच्या ताब्यात होता? तुमचा खंदा शेतकरी कार्यकर्ता कर्जापोटी जमीन कारखान्याला देतो त्याच्या लिलावाच्या उद्वेगाने त्याच्या चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता असे म्हणत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. खा. राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. राजेनिंबाळकरांनी बाष्कळ बडबड थांबवावी, पुतना मावशीचे प्रेम आणि मगरीचे अश्रू दाखवू नये, महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद पाहून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी खा. राजेनिंबाळकर यांनी आपलं संसदेतील पहिलं भाषण ऐकावं मोदी साहेब मोदी साहेब जप किती वेळा केला हे देखील पहावं असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेवरून केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नाही – मकरंद राजेनिंबाळकर

धाराशिव – गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उद्घाटने झालेल्या आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना ( उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी शिवसेना तालुकास्तरीय कार्यशाळेत केला. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर जिल्ह्याला विकासाच्या नावावर केवळ नारळ मिळाला असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
तसेच जिल्ह्यात जी आरोग्य शिबिरे घेतली त्यात दिली गेलेली औषधे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातून घेतली गेली मात्र शिबिरासाठी औषधाची वेगळी तरतूद न केली गेल्याने औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला.

या कार्यशाळेत बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी भाजप च्या धोरणावर जोरदार प्रहार केला.
विधानसभा अध्यक्षांनी खोटारडेपणा करत निकाल दिला आहे, यापूर्वी राज्यातील राजकारण कधीही असे झाले नव्हते, सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले. सध्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. धाराशिव शहरातील स्वच्छतेवरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.नेत्यांना बदनाम करून फोडाफोडी करून मत मागितली जातील त्यापासून सावध रहा असा सल्ला देखील उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेत जिल्हा प्रमुख आ. कैलास पाटील यांनी देखील राज्य सरकार आणि विरोधकांवर चांगला निशाणा साधला. मूलभूत विषय बाजूला ठेवून मराठा ओबीसी वाद  लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना मोठ्ठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन प्रधांमंत्र्यांनी दिले होते तो प्रकल्प कुठे आहे हे देखील सत्ताधाऱ्यांना विचारा, जिल्ह्यात पाच हजार कोटींची कामे आणली म्हणून सत्कार करून घेतला ती कामे कुठे आहेत हे देखील सत्ताधाऱ्यांना येत्या काळात विचारा असे आ. कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.

या कार्यशाळेला सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, युवासेना राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, युवासेना सहसचिव मनीषा वाघमारे, पंचायत समिती माजी सभापती शाम जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, गणेश खोचरे,रवी वाघमारे, दयानंद येडके, बाळासाहेब काकडे तसेच धाराशिव शहरासह तालुक्यातील सर्व गटप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, आदींसह, शिवसैनिक उपस्थित होते.

ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार, ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नाही – अर्जुन सलगर

धाराशिव – ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार आहे त्याबाबत प्रकाश अण्णा शेंडगे, टी.पी.मुंडे यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी केला.
24 जानेवारी ला मेळवा होणार नसल्याबाबत नवनियुक्त ओबीसी कोअर कमिटीच्या खुलाश्याचे त्यांनी खंडन केले तसेच ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नसून त्यातील लोक आमच्या संपर्कातील नाहीत ठरलेल्या कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नसून सकल ओबीसी समाज हाच या मेळाव्याचा आयोजक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच याबाबत पत्रकार परिषद घेण्याचा विचार असून त्यात सर्व काही सांगितले जाईल असेही अर्जुन सलगर यांनी सांगितले.

तिघांनी घेतली २ हजाराची लाच, वाशी पोलिस ठाण्यातील २ पोलिस शिपाई एका खाजगी इसमावर लाचलुचपतची कारवाई

धाराशिव –
तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करून स्वीकारल्याने तिघांविरोधत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की,
तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक तानाजी त्रिंबक तांबे यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर / किरकोळ कारवाई करण्यासाठी बिट अंमलदार यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे यांनी आरोपी रणजित अनिल कासारे यांचेकरवी पंचा समक्ष २०००/-रुपये लाचेची मागणी केली.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे याने लाचेची रक्कम खाजगी इसम आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांनी सदर २०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर ०२ आरोपी लोकसेवक व ०१ खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सापळा अधिकारी म्हणून नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर , अविनाश आचार्य यांचा समावेश आहे.

आरोपींमध्ये यांचा समावेश

-तानाजी त्रिंबक तांबे , वय 28 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 260, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)

  1. रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 514, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)
  2. पवन राजेंद्र हिंगमिरे, वय 26 वर्षे, रा. झिन्नर, ता. वाशी, ज़ि. धाराशिव ( खाजगी ईसम )

धाराशिव जिल्ह्यात 15 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी

धाराशिव जिल्ह्यात 15 जानेवारी 13 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी असणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत हे सण साजरा होणार आहे. दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. दिनांक 18 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी2024 या कालावधीत श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 24 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीत श्री खंडोबा यात्रा मैलापूर नळदुर्ग ता. तुळजापूर येथे संपन्न होणार आहे. दिनांक 20 जानेवारी 2024 ते दिनांक 24 जानेवारी 2024 या कालावधीत परंडा शहर ता. परंडा येथे हजरत ख्वॉजा बद्रीद्दीन चिस्ती दर्गा उरुस संपन्न होणार आहे. दिनांक 24 जानेवारी 2024 ते दिनांक 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत धाराशिव शहर ता, धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी दर्गा उरुस संपन्न होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष संघटना यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांचे कडून धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात पर्यन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे अंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव, कार्यकम च यात्रा/जत्रा ऊरुस तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजीचे 00:01 पासून ते दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी 24:00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात जारी होणार आहेत.

या कालावधीत शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.

2) लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत.

3) कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.

4) दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडक्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

5) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

6) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.

7) व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

8) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार

उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत

1) अंत्ययात्रा

2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही

आणखी वाचा

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले

धाराशिव – पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पडले असा आरोप माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे केला आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की,गौतम अदानिणी मोठ्या प्रमाणात परदेशातून पामतेल आयात केलेलं आहे.त्याचा धंदा चांगला व्हायला पाहिजे यासाठी पामतेलावर आयात कर पाच टक्क्यांनी कमी केला त्याचा परिणाम सोयाबीन च्या दरावर झाला. जेव्हा पामतेल स्वस्तामध्ये मिळतं त्यावेळी आपोआप सोयाबीनच्या, भुईमुगाच्या, सूर्यफुलाच्या सगळ्या प्रकारच्या तेलावर त्याचा परिणाम होतो.ज्यावेळी पक्क्या मालाचा भाव कमी होतो त्यावेळी कच्या मालाचा भाव कमी होतो हे साधं अर्थशास्त्र आहे.सोयाबीन चे भाव पडले असतील आणि आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्या असतील तर अदानिंचे हात देखील रक्ताने बरबटले असतील असेही ते यावेळी म्हणाले.दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, सरकार शेतकऱ्यांच कर्जमाफ करत नाही उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यांचा सातबारा कोरा करा, नैसर्गिक आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही निसर्गाचे नुकसान उद्योगपतींनी केलं म्हणून शिक्षा आम्हाला झाली कधी गारपिटीच्या माध्यमातून तर कधी महापुराच्या माध्यमांतून, दुष्काळाच्या माध्यमातून शिक्षा झाली.

कांद्याला भाव मिळत नाही कारण निर्यातीवर बंदी घातली,त्यामुळे ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला. गेल्या जन्मीचे पाप म्हणून आम्ही गरीब राहिलो नाहीतर सरकारने लुटणारी धोरणे राबवली म्हणून आम्ही गरीब राहिलो त्याचा जाब सरकारला विचारायचा आहे असं त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोंधित करताना सांगितले

आणखी वाचा

१४ नव्हे १३, महायुतीच्या मेळाव्याला एक घटकपक्ष अनुपस्थित

१४ नव्हे १३, महायुतीच्या मेळाव्याला एक घटकपक्ष अनुपस्थित

धाराशिव – शहरात आज महायुतीचा मेळावा पार पडला मात्र मेळाव्याला भाजपचा जुना घटकपक्ष अनुपस्थित होता.
एकूण १४ घटकपक्ष असलेल्या महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार, आर पी आय यांच्यासह इतर घटकपक्ष आहेत त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील समावेश आहे. रासपला महायुतीच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र वरिष्ठांनी सहभागी न होण्यास सांगितले असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली.
रासपचे प्रमुख महादेव जानकर जिल्ह्याचे सहपालकमंत्री होते तसेच २०१७ साली रासपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २१ जागा लढवल्या होत्या. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघात रासपचा प्रभाव आहे. राज्यस्तरावर बारामती, माढा, परभणी मतदारसंघात देखील रासपचा प्रभाव आहे. येत्या काळात रासप महायुती पासून दूर राहिल्यास भाजपच्या ५१ टक्के मतदान घेण्याच्या रणनीतीला धक्का पोहचू शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतात.

१८ लाख जनतेसाठी केंद्रातील एक योजना आणलेली दाखवा, म्हणल ती पैज – आरोग्यमंत्र्यांचे विद्यमान खासदारांना आव्हान

धाराशिव – महायुतीच्या धाराशिव येथील मेळाव्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनाच लक्ष्य केले. १८ लाख जनतेसाठी केंद्रातील एक योजना आणलेली दाखवा म्हणल ती पैज असे थेट आव्हान विद्यमान खासदारांना यानिमित्ताने दिले तसेच एक महिना शिल्लक आहे आणता आली तर एखादी केंद्राची योजना आणून दाखवा असेही ते यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी धाराशिव जिल्ह्याला भावनिक आवाहनाला मतदान देण्याची सवय आहे त्याला छेद द्या भावनेच्या आहारी जाऊन मतदान करणं पाप आहे असे सांगितले. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की विरोधकांची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे आधें इधर जाव आधे उधर जाव, धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून मागच्या पापात जाणार नाही, जो नेता विकास उंबऱ्या पर्यंत आणेल तोच आपला नेता. विकासाच्या विषयी मी स्फोटक आहे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी माझा रोड मॅप तयार आहे. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील दिलेल्या उमेदवाराला अडीच लाखांच्या पुढे मताधिक्य असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या फंदात पडू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना मेळाव्यात बोलू दिलं नाही, शिवसैनिकांची नाराजी?

लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होत असल्याने याला महत्व होते. सर्वच घटक पक्षातील नेत्यांची यानिमित्ताने भाषणे झाली मात्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाषणानंतर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भाषणासाठी बोलवले गेले त्याच वेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना बोलू देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली मात्र ती मागणी मान्य न केल्याने मंचावर उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ नाराजीचे चित्र होते.

बहुत झाले भावी खासदार, कधी जाहीर करणार उमेदवार?महायुतीच्या मेळाव्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा

धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत मेळावा आयोजित केला असून त्यानिमित्ताने उमेदवार जाहीर करावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीतील प्रहार आणि रयतक्रांती या संघटना सोडून सर्वांनी आपला भावी खासदार जाहीर केला आहे.

जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सुटणार!

लोकसभा निवडणुकीचा पूर्वानुभव पहाता धाराशिव लोकसभेची जागा लढण्याचा अनुभव राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहे. नैसर्गिक स्थितीनुसार या दोन पक्षांना जागा सोडावी लागेल न सुटल्यास दोन्ही घटक पक्षावर अन्याय होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

महाविकास आघाडीने जागा, उमेदवार याबाबत स्पष्टता ठेवली आहे त्याविरोधात तगडा उमेदवार अपेक्षित आहे मात्र काम कोणाचे करायचे हे निश्चित नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले नाहीत. तीन पक्षातील नेत्यांशी सुसंवाद असणारी व्यक्तीच उमेदवार असावी, क्लीन चेहरा असावा, कोणतेही राजकीय आरोप नसावेत अश्याच व्यक्तीच्या गळ्यात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे राजकीय निष्णात सांगतात.

आजचा मेळावा निर्णायक

राजकीय दृष्ट्या आज धाराशिव शहरात स्वस्तिक मंगल कार्यालय येथे होणारा महायुतीचा मेळावा निर्णायक असणार आहे. अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर टीका केलेले अनेकजण आज मांडीला मांडी लावून कार्यकर्त्यांच्या समोर बसणार आहेत.

आयएनएस चिता, गुलदार आणि कुंभीर 40 वर्षांच्या वैभवशाली देशसेवेनंतर कार्यमुक्त

भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपारिक पद्धतीने कार्यमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूर्यास्ताच्या वेळी या तीनही जहाजांवरील राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि तीन जहाजांचे डिकमिशनिंग प्रतिक शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आले.

चीता, गुलदार आणि कुंभीर ही जहाजे पोलंडच्या ग्डिनिया शिपयार्ड येथे पोलनोक्नी वर्ग जहाजे म्हणून बांधली गेली होती आणि ही जहाजे अनुक्रमे 1984, 1985 आणि 1986 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. चित्ता हे जहाज आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अल्पा काळासाठी कोची आणि चेन्नई येथे तर कुंभीर आणि गुलदार हे विशाखापट्टणम येथे तैनात होते. या जहाजांनी नौदलात सूमारे 40 वर्षे सक्रिय सेवा बजावली. या जहाजांनी 12,300 दिवस समुद्र वास्तव्यात एकत्रितपणे सुमारे 17 लाख समुद्री मैलांचा प्रवास केला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे उभयचर प्लॅटफॉर्म म्हणून, या जहाजांनी सैन्याच्या तुकड्या किनाऱ्यावर उतरवण्यासाठी 1300 पेक्षा अधिक समुद्रकिनारी मोहीमा केल्या आहेत.

आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजांनी अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी तसेच भारत आणि श्रीलंकेच्या सीमेवरील अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मे 1990 मध्ये ऑपरेशन ताशा दरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आयपीकेएफ मोहीमेचा भाग म्हणून ऑपरेशन अमन तसेच 1997 मध्ये श्रीलंकेवर चक्रीवादळामुळे कोसळलेले संकट आणि 2004 मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी नंतरच्या मदत कार्यात या जहाजांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

चित्ता, गुलदार आणि कुंभीर या भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवली आहे आणि त्यांची कार्यमुक्ती झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे.

एअर मार्शल साजू बालकृष्णन, एव्हीएसएम, व्हीएम, अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) चे कमांडर-इन-चीफ आणि व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम , व्हीएसएम यांच्यासह नौदल उपप्रमुख, ध्वज अधिकारी, माजी कमांडिंग अधिकारी आणि या तीनही जहाजांचा सेवादल ताफा पोर्ट ब्लेअर येथे संपन्न झालेल्या कार्यमुक्ती समारंभात सहभागी झाला होता. एकाच वर्गाच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी कार्यमुक्त करण्यात आल्याने हा कार्यक्रम खूप अनोखा बनला होता.