पारा (प्रतिनिधी ): धाराशिव येथील गालिब नगर येथे राहत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार चांदखान मेहबूब खान पठाण (वय 64वर्ष)यांचे दि. 10फेब्रुवारी 2024 रोजी तीन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या दुरुक्षेत्र पारा येथील जमादार मोहसीन खान पठाण यांचे ते वडील होते .त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा त्यांचा परिवार आहे .त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट, मिञ परिवार व संपूर्ण गालिब नगरावर शोककळा पसरली होती.
सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार चांदखान पठाण यांचे निधन
शिक्षक आमदारांना सापडले बॅनरबाजीचे फुकट ठिकाण, वाहनचालकांना नाहक त्रास
धाराशिव – अनधिकृत बॅनर बाजीवर उच्च न्यायालयाने शासनाला अनेकदा फटकारले आहे. याबाबत सूचना देखील केल्या आहेत. मात्र पुढाऱ्यांकडून या निर्देशांना नेहमी मूठमाती दिली जाते. धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दिशादर्शक कमानीवर बॅनर लावण्याचे आणि कार्यक्रम उलटून १० दिवस तसेच ठेवण्याचे धाडस मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केले आहे.
स्व. वसंतराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे संमेलन भरविण्यात आले असून शिक्षक आमदार विक्रम काळे हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ०२ फेब्रुवारी रोजी हे संमेलन भरविण्यात आले होते मात्र दहा दिवस उलटून देखील बार्शी लातूर मार्गावर असलेल्या या कमानीवर झळकत असलेले हे बॅनर वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. शासकीय मालमत्ता फुकटात वापरण्याची ही क्लृप्ती कदाचित यापूर्वी कधीच वापरली गेली नाही. या बॅनर मुळे अनेकांचा मार्ग भटकण्याचा, खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकारी नेमक्या कोणत्या दबावात आहेत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
धाराशिव येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वैद्यकिय महाविद्यालये व सामान्य रुग्णालये एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) यांच्या अर्थसहाय्यातून उन्नती करणेबाबतची V.C. मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य व मा. प्रविणसिंह परदेशी सिईओ मित्रा, मा. आरोग्य आयुक्त व मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेसोबत आज दिनांक 12/2/2024 रोजी व्हि. सी. व्दारे बैठक संपन्न झाली.
यामध्ये महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर ७ धोरणात्मक निर्णय घेतल्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) ने एकूण 4000 कोटी पैकी 1200 कोटी चा पहिला हप्ता महाराष्ट्र शासनास देण्याचे मान्य केले. मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी धाराशिव या आकांक्षीत जिल्हयातील रुग्णांच्या अडचणीबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले. प्राप्त निधीतून 500 खाटांचे नविन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जवळ-जवळ 67000 स्केयर मिटर (Sqm) बांधकाम कर्मचारी
निवासस्थानासह टाईप प्लॅन प्रमाणे बांधकाम करणेबाबत सुचना देण्यात आल्या.
त्यानूसार महाराष्ट्र शासनाची उपलब्ध कुष्ठधामाची जागा मा. जिल्हाधिकारी, धाराशिव महोदयांनी मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार लगेच 20 एक्कर जागा देण्याचे मान्य केले. सदर जागेची पाहणी दिनांक 9/2/2024 रोजी मा. प्रविणसिंह परदेशी सिईओ मित्रा यांनी करुन जागा योग्य असल्याचेही मान्य केले. याकरिता लागणारे एकूण रु.350 कोटी इतका निधी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) च्या अर्थसहाय्यातून देण्याचेही मान्य करण्यात आले. याकरिता मा. आरोग्य मंत्री महोदय यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.
पात्रता प्रवेश परीक्षांमधील संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) विधेयक, 2024’ राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
पेपरफुटी, गैरप्रकार तसेच यूपीएससी, एसएससी इत्यादी भरती परीक्षा आणि नीट, जेईई आणि सीयूईटी सारख्या प्रवेश परीक्षांमधील संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) विधेयक, 2024’ ला राज्यसभेने आज मंजुरी दिली. लोकसभेने यापूर्वीच मंजूर केलेले हे विधेयक आता अधिसूचना जारी झाल्यानंतर कायद्यात रूपांतरित होईल.
विधेयकावरील चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय कार्मिक प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, “सार्वजनिक परीक्षा विधेयक, जे भारताच्या संसदेच्या इतिहासातील बहुधा अशा प्रकारचे पहिले विधेयक भारतातील युवकांप्रती समर्पित आहे”.
“अनुचित साधनांना प्रतिबंध विधेयक, 2024” मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या सर्व संगणक-आधारित परीक्षांचा समावेश असेल.
लोकसभेने याआधीच 6 फेब्रुवारी 2024 रोजी व्यापक चर्चेनंतर हे विधेयक मंजूर केले आहे.
काँग्रेसचे दिग्विजय सिंह, भाजपचे प्रकाश जावडेकर, द्रमुकचे पी. विल्सन; आप चे संदीपकुमार पाठक; बीजेडी चे मुझिबुल्ला खान; सीपीआय(एम) चे डॉ. व्ही. शिवदासन; काँग्रेसचे डॉ अमेय याज्ञिक; भाजपचे दिनेश शर्मा, सीपीआयचे संतोष कुमार पी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ फौजिया खान यांनी या विधेयकावरील चर्चेमध्ये भाग घेतला.
आजचे मंत्रिमंडळनिर्णय संक्षिप्त स्वरूपात
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले ते संक्षिप्त स्वरूपात पुढीलप्रमाणे
मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही.
राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षांवरील नागरिकांना लाभ देणार.
राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबविणार, पायाभूत सुविधा बळकट करणार.
उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.
मधाचेगाव योजना संपूर्ण राज्यात राबविणार. मध उद्योगाला बळकटी.
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात #बिबट सफारी
बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार.
शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी.
धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.
सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.
स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.
बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.
कोंढाणे लघु प्रकल्प कामाच्या जादा खर्चास मान्यता.
तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.
नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार.
कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय.
गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.
दुधी गावचे सुपुत्र मेजर नागनाथ कवठे २६ वर्ष सैनिकी देश सेवा बजाऊन ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त
दुधी ग्रामस्थांच्या वतीने सुपुत्र मेजर नागनाथ कवठे यांच्यावर पुष्पवृष्टी करत केले भव्य स्वागत
परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दुधी येथिल सुपुत्र मेजर नागनाथ रामहरी कवठे हे आपली २६ वर्षांची सैनिकी देश सेवा पुर्ण करुन ३१ जानेवारी रोजी सैनिकी सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहेत.
नागनाथ कवठे सैनिकी सेवेतुन सेवानिवृत झाल्या नंतर ते प्रथमच दुधी गावात आले आसता दुधी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्ठी करत भव्य सत्कार करून स्वागत केले व पुढिल आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मेजर नागनाथ रामहरी कवठे यांची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची व हालाखीची होती.घरात कमालीची हालाखी असताना आशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करून १ एप्रिल १९९८रोजी सीआपीएफ मध्ये भरती झाले.त्यावेळी दुधी गावात जास्त कोणी शिकलेले नसल्याने योग्य मार्गदर्शन देखील मिळणे कठीण होते,अशा परिस्थितीत गरिबीवर आणी अनेक संकटांवर मात करून ते भरती झाले,१ एप्रिल १९९८ रोजी त्यांनी सीआरपीएफ मध्ये जाॅईन होऊन सैनिकी सेवेला प्रारंभ केला.त्यांची ट्रेनिंग बडुच मध्यप्रदेश येथे झाली.त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग नागालॅंड येथे झाली तेथे त्यांनी ३ वर्ष देश सेवा केली.त्यानंतर बिहार व आसाम येथे प्रत्येकी ३ वर्ष देश सेवा केली.पुढे जम्मू आणि काश्मीर अशा दुर्गम भागात ५ वर्ष व छत्तीसगड सारख्या नक्षलवादी भागात ५ वर्ष देश सेवा केली.
तसेच आपल्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांनी नागपूर येथे ३ वर्ष व मुंबई येथे २ वर्ष देश सेवा करून ते ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.
ग्रामस्थांच्या स्वागत सत्काराने भाराऊन गेलेले नागनाथ कवठे यांनी त्यांच्या २६ वर्षाच्या सैनिकी सेवेतील खडतर जिवन प्रवासा विषयी गावकऱ्यांना सांगताना त्यांचे डोळे पानावले होते.
सैनिकी सेवेत भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी गावातील देशसेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झालेले मेजर बब्रुवान तुकाराम जाधव, बाबुशा लक्ष्मण जाधव,देशसेवेत सध्या कार्यरत कार्यरत मेजर मोहन काशिद या सुपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दुधी गावातील मुले, पुरुष,महिला,वयोववृध महीला, पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
धाराशिव,दि.31(प्रतिनिधी) जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील वाशी,धाराशिव व लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेद्वारे महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील गुरांचा चारा / गवत / वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.तसेच हे आदेश आजपासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहणार आहेत.
यासाठी जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक,पशुपालक व चारा व्यावसायिकांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या आवश्यकतेस विचारात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक वा विक्री करु नये.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांच्या वाटपात अनियमितता, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप
धाराशिव – जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांच्या वाटपात अनियमितता होत असून लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत नगर परिषद धाराशिव अंतर्गत १०५ विकासकामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. नगर परिषदेअंतर्गत असलेली ही विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली असून बांधकाम विभागामार्फतच त्यांना मंजुरी देण्यात येत आहे. ही विकासकामे खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी आपआपसात वाटून घेऊन कार्यकर्त्यांना देण्याची शिफारस करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
जर लोकप्रतिनिधी आपापल्या कार्यकर्त्यांना कामे वाटप करण्याची शिफारस देत असतील तर इतरांवर हा अन्याय असून मग आम्ही काय करावे ? असा सवाल उपस्थित होत आहे. कामे वाटपामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढत असल्याचे दिसत आहे. कामे मिळत नसल्यामुळे अन्य मजूर संस्था, अभियंते, ठेकेदारांवर अन्याय होत असल्यामुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. कामे वाटपाचा हा वाद जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः लक्ष घालून मार्ग काढावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी धनंजय शिंगाडे, खलील सय्यद यांच्यासह सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
परिवर्तन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचा सत्कार
कोल्हापूर, दि.२६ (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे डिन (अधिष्ठाता) डॉ. प्रकाश गुरव यांनी विविध ठिकाणी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा कोल्हापूरकर नागरिक व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने जीवनरक्षक धन्वंतरी स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मुरगुंडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, डॉ. झहीर आदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विविध डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक तसेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर परिवर्तन फाउंडेशन एन.जी.ओ.च्या वतीने हॉस्पिटल परिसरातील रुग्णाच्या नातेवाईकांना मिठाई वाटप करण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव व दिपक ड्रायव्हिंग स्कुल परंडा यांच्या वतीने परंडा येथे वाहन चालकांना मार्गदर्शन
आपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियमाचे पालन करून हेल्मेट व सिट बेल्टचा वापर करा- प्रशांत भांगे
परंडा ( प्रतिनिधी )रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपघाताचे प्रमाण कमी करण्या साठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बदर,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नकाते तसेच दिपक मोटार ड्रायव्हींग स्कुल परंडा चे संचालक दिपक थोरबोले यांच्या वतीने परंडा येथील नगऱ परिषदेच्या स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात दि २५ जानेवारी रोजी जनजागृतीसाठी वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
आपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून मोटार सायकल चालकाने हेल्मेट वापराने तसेच चारचाकी वाहण चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा तसेच रस्त्याने पायी चालनाऱ्या नागरीकांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे असे अवाहन मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे यांनी केले आहे.
आपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे,बादर,नकाते व दिपक मोटार ड्रायव्हींग स्कुलचे संचालक दिपक थोरबोले यांनी सांगीतले.
यावेळी दिपक मोटार ड्रायव्हिग स्कुल चे संचालक दिपक थोरबोले यांच्या वतीने लकी ड्रॉ पध्दतीने चिट्टया काडून उपस्थित असलेल्या वाहन चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
मीरा काळे,प्रिया रॉय,महमंद हुसेन सौदागर,सुनील तांबे. मुनाफ सौदागर यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
यावेळी महेश थोरबोले, ओंकार थोरबोले,संजय वैद्य, सचिन वारे,गणेश सरवदे,अरुण बनसोडे,नवनाथ पवार यांच्या सह वाहन चालक उपस्थित होते.