Home Blog Page 41

लाडकी बहीण योजनेवर अर्थ खात्यानेच नोंदवले आक्षेप!

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ही घोषणा महायुती सरकारने जाहीर केली असली तरी या योजनेवर विरोधीपक्षाने टिका देखील केली आहे. 

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आर्थिक तरतुदीसंदर्भात अडचण असल्याचं स्वत: अर्थ विभागाने म्हटलं आहे. अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत.

योजनेसाठी दर वर्षी 46 हजार कोटी रुपये कुठून आणणार ? या संदर्भातील तरतूद कशी करायची?, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही, राज्यावर 7.8 लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी मंजूर कसे ?

महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय,आदिवासी विकास,महिला-बालकल्याण अनेक योजना आहेत.

एकाच लाभार्थ्याला दोन-दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता.

योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे.

मुलगी 18 वर्षांची होताच, 1.1 लाख रुपये देतो, त्यासाठी वर्षाला 125 कोटी लागतात.

प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5 टक्के म्हणजे 2223 कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षांना जबर फटका बसला होता. त्यामुळेच ही योजना आणल्याचे बोलले जात होते. योजना सुरू करताना ज्या अटी शर्ती होत्या त्यातील काही अटी नंतर शिथिल करण्यात आल्या होत्या. 

वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतली ३ हजाराची लाच; गुन्हा नोंद

धाराशिव – किरकोळ रजा मंजुर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी ३ हजाराची लाच घेतल्याने सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी – डॉ. नितीन कालिदास गुंड, वय 32 वर्षे, यांच्यावर तामलवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहिती
तक्रारदार हे कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणुन मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमीक आरोग्य केंद्र अंतर्गत नोकरीस आहेत. त्यांची पगार, वैदयकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरीक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकार यातील आलोसे यांना आहेत. यातील आलोसे यांनी यातील तक्रारदार यांची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजुर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 3000/- रुपये लाचेची मागणी करुन 3,000/- रुपये लागलीचे रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तुळजापूर व उमरगा विधानसभा लढविण्याचा काँग्रेस कमिटीचा निर्धार

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव पारित

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने तुळजापूर व उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव एकमताने दि.२३ जुलै रोजी पारित करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील हे होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात उमरगा – लोहारा व तुळजापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले असल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा तिरंगा फडकला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवावी असा ठराव मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला. या ठरावास जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद व जिल्हा सरचिटणीस महबूब पटेल यांनी अनुमोदन दिले. तर उमरगा – लोहारा हा विधानसभा काँग्रेसने लढवावा असा ठराव मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला. या ठरावास उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर व प्रशांत पाटील यांनी अनुमोदन दिले. हे दोन्ही ठराव टाळ्याच्या कडकडाट बहुमताने संमत करण्यात आले. यावेळी खलील सय्यद म्हणाले की, काँग्रेसच्या विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्कल निहाय कार्यकारणी गठीत करून त्या जिल्हा काँग्रेसकडे सादर कराव्यात. त्याबरोबरच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. तर प्रस्ताविकामध्ये जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी करण्यासह बुत कमिट्या स्थापन करणे, बीएलओची नियुक्ती करणे, सोशल इंजिनिअरिंग धोरण अंगीकृत करणे अशा सर्व बाबींवर कार्यकर्त्यांनी काम करावे. त्याबरोबरच केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेविरोधी घेतलेल्या निर्णया विरोधात जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवावा असे आवाहन केले.  तसेच ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष तळागाळात कसा रुजेल यासाठी पक्ष संघटनेवर अधिक भर द्यावा असे आवाहन केले. तर जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते म्हणाली की, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी काय योगदान दिले याचा सविस्तर आढावा घेतला. त्याबरोबरच तुळजापूर उमरगा – लोहारा या दोन्ही जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न पराकाष्टा करावी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  या बैठकीस जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर, प्रशांत पाटील, विजयकुमार सोनवणे, विलास शाळू, डीसीसी बँकेचे संचालक महेबुब पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजे, नवाज काझी, विनोद वीर, प्रकाश चव्हाण, विभागीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, कपिल सय्यद, आयुब पठाण, मुकुंद (दादा) डोंगरे, नानाभाऊ भोसले, संजय चालुक्य, मधुकर यादव, अनिल लबडे, बाबुराव तवले, प्रभाकर लोंढे, अशोक बनसोडे, शहाजान शिकलकर, मिलिंद गोवर्धन, संजय देशमुख, प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण,  तालुकाध्यक्ष ॲड विलास राजोळे (उमरगा), ऍड हनुमंत वाघमोडे (परंडा), राजेश शिंदे (वाशी), रुपेश शेंडगे (भूम), रामचंद्र आलूरे (तुळजापूर), शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे (धाराशिव), रवी ओझा (कळंब), रमेश परदेशी, नवाब काझी (नळदुर्ग), महिला प्रदेश सचिव शीलाताई उंबरे, ज्योतीताई सपाटे, ॲड हेड्डा, समाधान घाटशिळे, अवधूत क्षीरसागर, भूषण देशमुख, अमर तागडे, बाळासाहेब गपाट, ऍड शेषराज माने, बाबा पाटील, प्रभाकर डोंबाळे, वसंत मडके, सत्तार शेख, सलमान शेख, बालाजी माने, काका सोनटक्के, धवलसिंह लावंड, संतोष वडवले, सुधीर गव्हाणे, अकबर शेख, इरफान पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले.

लोहारा येथील तहसीलदार निवासस्थान नवीन बांधकामाला भेगा! 

नविन इमारत धोकादायक गुतेदारांवर कारवाई करा!!

लोहारा प्रतिनिधी ( यशवंत भुसारे) 

      लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील तहसीलदार यांचे नवीन निवासस्थान बांधकामाला कमी कालावधीत अनेक ठिकाणी तडे जाऊन काही ठिकाणी भिंतीला भेगा गेल्याचे बोलके छायाचित्र दैनिक जनमतने रेखाटले आहे. 

     सविस्तर माहिती अशी की,शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांना मुख्यालयी राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव अंतर्गत लोहारा येथे ५ फेब्रुवारी २०२० रोजी तहसीलदार निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले ७ डिसेंबर २०२१ ला ते काम पूर्ण झाले खरे पण हे निवासस्थान तहसीलदारने ताब्यात घेण्यापूर्वीच स्लॅप चा काही दर्शनी भाग अपोआप गळुन पडत असल्याचे दिसून येताच संबंधित गुतेदारांनी जागोजागी नुसती डागडुजी केली पण भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडुन काही ठिकाणी भिंत खचल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवीन तहसीलदार निवासस्थान बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून धोकादायक इमारत बनली आहे. शासनाचे लाखो रुपयचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा मात्र ऐकण्यास मिळत आहे.अवघ्या दीड ते दोन वर्षात बांधकामाला तडे गेले असून सार्वजनिक बाधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व गुतेदारांच्या संगनमताने अर्थपुर्ण व्यवहार करुन लोहारा तहसीलदार निवासस्थान बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे बोलले जात आहे.

        तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व गुतेदारांवर योग्यती कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलनचा इशारा 

महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना आक्रमक

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शन विक्री करतात एमसीएमआर लागू असून त्याचे लाभ लाभार्थ्यास देणे बंधनकारक आहे. मात्र ते बंद केलेले असून ते पूर्ववत चालू करावे यासह इतर विविध मागण्यासाठी दि.१ ऑगस्ट रोजी कर्मचारी काळ्याफिती लावून काम करतील. मात्र मागण्या मान्य न झाल्यास दि.8 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दि.२४ जुलै रोजी दिला आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेचे कर्मचारी, कामगार यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अथवा त्यांचे औषध उपचाराचे (मेडिकल बील) कसलेही बील हे अदा करण्यात येत नाही. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांची बिले अदा करण्यात आलेली आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी अर्ज करून देखील ती देण्यात आलेली नाहीत. त्याचा खुलासा देण्यात यावा. ७ वा वेतन आयोग शासन निर्णय क्र. वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा -९, दि.२० जून २०२४ प्रमाणे पाचवा हप्ता देणे आवश्यक होते. परंतू काही कर्मचाऱ्यांना चौथा हप्ता देण्यात आला नाही, तो देण्यात यावा. तर जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत शासनाचे सहायक अनुदान किती आले व त्याचा विनीयोग कसा केला ? तसेच उपयोगी प्रमाणपत्र सादर केले, त्याच्या प्रती संघटनेस देण्यात याव्यात. तसेच शासनाचे अनुदान जवळपास दरमहा अंदाजे ३.२० कोटी रुपयांच्या आसपास नगर परिषदेकडे येते.

हे अनुदान कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे बिल देण्यासाठी येथे तथापि या गोष्टीची पूर्तता करीत नाहीत. वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने अभिलेख यांच्या छायांकित सत्यप्रती सात दिवसाच्या आत देण्यात याव्या तसेच संघटनेने नमूद केलेल्या वरील मागण्या मान्य कराव्यात, या मागण्या मान्य कराव्यात असे नमूद केले आहे. यावर अध्यक्ष दीपक तावरे सचिव रावसाहेब शिंगाडे, तानाजी सुरवसे दत्तात्रय बनसोडे, कुमार मुंडे, धनराज मिसाळ, सुदाम खरात गायकवाड, दत्ता पेठे, अशोक देवकते, भास्कर वाघ चौरे, लहू गेजगे, दयानंद बनसोडे, एजाज शेख, सुनील उंबरे, अरुण जाधव, नागनाथ गोरपे, सिद्राम जानराव, नितीन गायकवाड, सचिन गायकवाड, जे.एस. राजेनिंबाळकर, दिगंबर डुकरे, शाकीर शेख, अजिंक्य जानराव आदीसह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने लोणी येथे ६की.मी.रस्ता कामाची सुरुवात

जि.प.माजी सभापती धनंजय सावंत यांच्या हस्ते जोतिबा मंदिर ते नालगाव शिव ६.कि मी रस्ता कामाचा शुभारंभ

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील लोणी येथील जोतीबा मंदिर ते नालगाव शिव ६ कि.मी.रस्ता कामाचा जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२१जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला.
लोणी येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जोतिबा मंदिर ते नालगावकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्त्याचे काम करुन द्या आशी मागणी करण्यात आली होती.लोणी ग्रामस्त व शेतकरी यांची रस्त्यांची निकड लक्षात घेत धनंजय सावंत यांनी रस्ताकाम करुन देतो आसा शब्द लोणी ग्रामस्थाना दि.२०जुलै रोजी दिला होता.
दिलेल्या आश्वासना नुसार दि.२१जुलै रोजी प्रत्यक्ष जोतीबा मंदिर ते नालगाव रस्ता कामाचा शुभारंभ धनंजय सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला आहे.जोतीबा मंदिर ते नालगाव शिव या मार्गवरील १०० कुटूंबाची लोक वस्ती आहे मात्र रस्त्या अभावी त्यांचे मोठे हाल होत होते.आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली व भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातुन जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शेतकरी व ग्रामस्थांची मागणी त्वरीत मान्य करत ६ कि.मी.रस्त्याच्या कामाचा स्वा:ता शुभारंभ करून जोतीबा मंदिर ते नालगाव मार्गावर राहाणाऱ्या कुंटूबाचा रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. रस्ता कामाचा प्रश्न धनंजय सावंत यांनी मार्गी लावल्याबद्दल
लोणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने धनंजय सावंत यांचा सत्कार करून आभार मानले.
या वेळी नागनाथ पाटील, शाहाजी शिदे,विनोद शिंदे,सुरेश सोठे,धर्मासाठे,सतिष शिंदे,दगडु केमदारणे,बाळासाहेब शिंदे
नवनाथ शिंदे,नानासाहेब केमदारने,वैभव सांगडे, बाळासाहेब शिंदे,सत्यवान शिदें, अनिखेत शिंदे,जयराम शिदें, मुकुंद शिदें यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

सिनाकोळेगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रा गेलेल्या जमीनीचा वाढीव मावेजा शेतकऱ्यांना मिळऊन देण्यासाठी मंत्री सावंत यांचे प्रयत्न

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा डोंजा येथील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार

परंडा( भजनदास गुडे )परंडा तालुक्यातील डोंजा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी सिना कोळेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गेल्या आहेत.त्याचा वाढीव
मावेजा मिळावा यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत प्रयत्न करत आहेत.
सिनाकोळेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गेलेल्या जमीनीचा वाढीव मावेजा मिळाळवा आशी मागणी डोंजा येथील शेतकरी अनेक वर्षापासुन करत आहेत. मात्र वाढीव मावेजावा मितळत नसल्याने डोंजा येथील शेतकऱ्यांनी सदर मागणी आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
शेतकऱ्यांच्या सदर मागणीच्या अनुशंगाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळावा यासाठी मंत्रालईन स्थरावर पाठपुराव केला आसुन
लवकरच हा प्रस्न मार्गी लागेल असे मंत्री सावंत यांनी डोंजा येथील शेतकऱ्यांना सांगीतले.
मंत्री सावंत वाढीव मावेजा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मंत्रालईन स्थरावर प्रयत्न करीत आसल्याबद्दल डोंजा येथील शेतकऱ्यांनी मंत्री सावंत यांची सोनारी येथील भैरवनाथ कारखाण्यावर भेट घेऊन त्यांचा सत्कार करून अभार व्यक्त केले.
या वेळी बोलताना मंत्री सावंत म्हणाले तुमचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे.मी शंभर टक्के वाढी मावेजा मागणीचा आपला प्रस्न मार्गी लावतो असे आश्वासन मंत्री सावंत यांनी डोंजा येथील शेतकऱ्यांना दिले असता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,मोहन बापू करपुरे,शशिकांत पाटील,पिंटू हजारे,बिभीषण घोगरे,किशोर पाटील,शरद बापू पाटील,तुकाराम पाटील,बंडू काका जगताप, नामदेव घोगरे,सोमनाथ गणगे, पांडू दादा घोगरे,सुनील शिरसाट, सुधाकर भालेराव,किरण भालेराव,हनुमंत शिरसाट,कचरू करपुरे,जनक घोगरे,बालाजी घोगरे आदी शेतकरी उपस्थित होते.

सोनारी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याने अवघी सोनारी नगरी दुमदुमली

दिंडी सोहळ्यातील संत, वारकऱ्यांच्या वेशभूषतील विद्यार्थ्यानी ग्रामस्थांचे वेधले लक्ष

परंडा [ दि.१३ जुलै ] महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेने चालत आलेला पालखी,दिंडी सोहळ्याची माहीती आत्ताच्या पिढीला व्हावी तसेच जाती,धर्म मतभेद,सहकार्य,ऐकतेची भावना मुलांमध्ये रुजावी व तीची जोपासना करण्यासाठी सोनारी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन दि.१३जुलै रोजी करण्यात आले होते.
जि.प.शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी संत वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.सकाळी गावातील मुख्य रस्त्यावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते,गावात विविध ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला.
या वेळी मुलच्या हातात भगवे ध्वज तर मुलीच्या डोक्यावर तूलशी वृंदावन हे दृष्य पाहून पंढरपुरच्या आषाढी वारीला दिडीं सोहळा निघाला आसल्याचा भास होत होता.
एरव्ही शाळेच्या गणवेशात असणारी लहान मुलं-मुली संत, वारकऱ्यांचा पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारी साडीत,केसात गजरा,डोक्यावर तुलस आणि मुखी विठ्ठल नामाची भरली शाळा,शाळा शिकताना तहान भूक हरली’या अभंगा प्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी गावातील प्रमुख मार्गावरुन दाखल होत संपूर्ण गावात ही पायी दिंडी अवतरली.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ दिंडी सोहळ्याच्या भक्तीसागरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी शाळेतील शिक्षक देखील संत,वारकऱ्यांच्या वेशभूषत दिडी सोहळ्यात सहभागी होते.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित दिंडीमध्ये पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.हि दिंडी यशस्वी पार पाडण्यासाठी प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक पोपट परदेशी, माध्यामिक शाळेचे मुख्याध्यापक विलास थोरात यांच्या सह सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.


वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले -मुली,शिक्षक पालखी मिरवणूक,विठू नामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात सोनारी गावातील परिसरासह शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालक, ग्रामस्थांचे आकर्षण ठरले.बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.


बल वारकऱ्यांची पायी दिंडी संपुर्ण गावातून येऊन शाळेत विसावली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश फले यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच दिपक दुबळे,दिगंबर ईटकर, अविनाश हांगे,राम ईटकर, आण्णा हांगे,नाना मांडवे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी परंडा शहरातून शनिवारी सकाळी ८ वा पंढरपुर कडे मार्गस्थ

दिपक थोरबोले यांच्या फार्म हाऊसवर माऊलींच्या पालखीचा विसावा

थोरबोले परिवाराच्या वतीने पालखीचे फटाक्याच्या अतिषबाजित भव्य स्वागत

परंडा ( दि १३ जुलै )पैठण तालुक्यातील आपेगाव येथिल संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचे शुक्रवार दि १२ जुलै रोजी सायंकाळी परंडा शहरात आगमन झाले.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वगृही मुक्कामी असलेल्या पालखीचे पाटील कुटंबीयांनी स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले.यावेळी पालखीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यावस्था पाटील कुंटूबीयांच्या वतीने करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी ८ वाजता परंपरे नुसार दिपक थोरबोले यांच्या कुर्डूवाडी रोडवरील
थोरबोले फार्म हाऊस येथील माऊली विसाव्यावर पालखीने विसावा घेतला.या वेळी थोरबोले परिवराच्या वतीने फाटाक्याच्या आतिषबाजीत पालखीचे व दिंडीतील वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापुरकर यांचा थोरबोले परिवराच्या वतीने फेटा, पुष्पहार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दिपक थोरबोल यांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून कुटूंबासह दर्शन घेतले.
थोरबोले परिवाराच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी अल्पोहारची व्यावस्था करण्यात आली होती.वारकऱ्यांनी अल्पो हाराचा आस्वाद घेतल्यानंतर
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा पालखी सोहळा विठठल, रुखमाई,ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या नामाचा जयघोष करत पंढरपुर कडे मार्गस्थ झाली या पालखी सोहळ्यात महिल, पुरुष भावीक मोठया संखेने सहभागी झाले होते.
यावेळी मा.आ.ज्ञानेश्वर पाटील,डॉ.सत्यनारायण गायकवाड,जि.प.माजी सदस्य सिध्देश्वर पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील,विकास कुलकर्णी,विश्वजीत पाटील, बाळासाहेब पाटील,विलास पाटील,मारूती धनवे,अनिल शिदे,श्रीकांत भराटे,बाबुराव गायकवाड,प्रशांत गायकवाड, रामराव शेळके,मोहण गायकवाड, यांच्या सह थोरबोले कुटूंब व भावीक मोठया संखेने उपस्थित होते.

श्री संतश्रेष्ठ भगवानबाबा महाराज पालखी सोहळ्याचे कल्याण सागर विद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत

मा.आ.सुजितसिह ठाकुर,शैला ठाकुर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून श्री संत भगवान बाबांच्या पादुकांचे घेतले दर्शन

उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप

परंडा (प्रतिनिधी)-विठ्ठलाच्या भेटीच्या लागलेल्या ओढीत,टाळ मृदंगाच्या ठेक्यावर कष्टकरी ऊसतोड कामगार वारकऱ्यांनी धरलेला फेर,भगवानबाबाचा जयघोष,आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या भागवत धर्माची फडकत असणारी पताका,अशा भक्तीमय वातावरणात श्री संत भगवान बाबा पालखीचे सकाळी ११ वा.शहरातील कल्याण सागर विद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले.
यावेळी मा.आ.सुजितसिंह ठाकुर,सौभाग्यवती शैला ठाकुर, डॉ सुयेशा ठाकूर,सुबोधसिंह ठाकुर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर,भाजपा जिल्हा संघटक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक चंद्रकात पवार, मुख्याध्यापक किरण गरड,मा. नगर शेवक गणेश राशिनकर, मनोज ठाकूर,डॉ आनंद मोरे आदी उपस्थित होते.पालखी सोहळा कल्याण सागर प्रांगणात पोहचताच कल्याण सागर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करुन पालखीचे स्वागत केले.
संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पादुकांची ठाकुर यांनी सपत्नीक पुजा करून दर्शन घेतले. कल्याणसागर समुहाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी शाळेच्या प्रांगणामध्ये १०हजार वारकऱ्यांच्या महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाच्या वाटपासाठी प्रशालेचे२००विद्यार्थी,विद्यार्थीनी कार्यरत होते.भोजनाच्या व्यावस्थेची जवाबदारी मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, चंद्रकांत तनपुरे,महादेव नरुटे, अजित गव्हाणे,रजणी कुलकर्णी, भारत थिटे,सचिन शिंदे,प्रशांत कोल्हे,आमोल कोकाटे,नरसिंह सोणवने,गणेश पवार यांनी संभाळली.
कल्याण सागर समुहाचा पाऊणचार घेऊन पालखी आवार पिंपरी येथील मुक्कामासाठी मार्गस्त झाली.
पालखी परंडा शहरातून आवार पिपरीकडे मार्गस्थ होत असताना परंडा शहरातील भाविकांनी श्री संतश्रेष्ठ भगवान बाबाच्या पादुकांचे दर्शन घेतले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

     श्री संतश्रेष्ट भगवानबाबा महाराराज यांच्या पालकी सोहळ्याचे कल्याण सागर विद्यालयावर आगमन होताच उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकानी पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासनी करुन औषधाचे वाटप करण्यात आले.
     या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी,डॉ.आनंद मोरे,डॉ. दयानंद पाटील,डॉ जयश्री गोफणे,डॉ.इफत कोरबू,डॉ.प्रशांत जाधव,सौ.शिवगंगा गायकवाड, ज्योती जगदाळे,सिस्टर औषध निर्माता तेजश्री शिंदे,स्वाती चव्हाण यांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी,कर्मचारी व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.ज्ञानदेव नलवडे आधी उपस्थित होते.