उस्मानाबाद, दि. ५ प्रतिनिधी – नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे गटनेते नळे यांच्यात ओएफसी केबलवरुन चांगीलच खडाजंगी झाली दोघेही एकमेकांच्या जागेवर उठुन जोरजोरात बोलत असल्याने सभागृहात काही काळ तणाव होता.
सभेची सुरुवात नगरसेवक अभय इंगळे यांनी मांडलेल्या विषयाने झाली. शहरातील बागांमध्ये झाडे लावली जात आहेत. बागांना कंपाऊंड वॉल करुन झाडे लावण्याच्या ठराव झाला असल्याची त्यांनी आठवण करुन दिली. मात्र शहरात बागांना तारेचे कंपाऊंड बसवले जात आहे. एकएक फुटांवर झाडांची लागवड सुरु आहे. नागरिकांना बागेचा आनंद घेता येणार नाही. असे इंगळे यांचे म्हणणे होते. मात्र बागांना बांधकाम करुन कंपाऊंड वॉल करता येत नाही. किती अंतरावर झाडे लावायची याबाबत शासनाचे धोरण आहे. त्यानुसार झाडे लावत असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले, यावर नगरसेवक माणिक बनसोडे यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करा असे सांगितले. यावर नगराध्यक्षांनी तुमच्या आमदारांना शासनाच्या धोरणाबाबत विधानसभेत विषय मांडायला सांगा म्हटल्यानंतर हा विषय थांबला.
सभेमध्ये लेखा विभागासाठी टॅली सॉफ्टवेअर बनवुन सनदी लेखापालची नेमणुक करणे, नागरिकांच्या तक्रारीसाठी नगरपालिकेचे ऍप बनवणे, आधारवर आधारित बायोमेट्रीक प्रणाली उपकरण खरेदी, मलनिस्सारण केंद्रासाठी सर्व्है नं ६६१,६६२,६६८ चा भाग खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करणे, डीजीपे अंकाऊंट उघडणे, अग्निशामन वाहन खरेदी आदी विषयांच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
साहित्य संमेलनासाठी ठराव
आखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे व्हावे अशा मागणीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेवुन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.
अल्पसंख्यांकासाठी नविन डीपीआर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनेनुसार शहरातील अल्पसंख्यांकाच्या स्तर उंचावण्यासाठी, अल्पसंख्याक वस्तीमध्ये जागा शोधुन त्याच्या डीपीआरच्या प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये अल्पसंख्यांकासाठी उद्योग प्रशिक्षण, बाजार, शाळा, मच्छीमार्केट, यापैकी एक उपक्रम आखता येणार आहे.
नगरपालिकेच्या सभेत वृक्षलागवड, ओएफसी केबलवरुन खडाजंगी
वृक्ष लागवडी सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण जनजागृतीचे काम करावे – सहआयुक्त विश्वास मुंडे
सातत्याने पर्जन्यमानाचे कमी होत असलेले प्रमाण हे चिंताजनक बाब असून त्यामुळे पडत असलेल्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवण्यासाठी काम करावे असे मत आयकर विभाग औरंगाबाद चे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद यांच्या वतीने मारवाड गल्ली येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा , उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,आई गोशाळेचे अध्यक्ष सतीश सोमानी, अन्नपूर्णा ग्रुपचे अध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, पी. के. मुंडे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
नेमक्या समस्या समजून काम केल्यास उत्तर लवकर मिळते आणि काम करण्यास सोपे होते. वृक्ष लागवडी सोबत पर्यावरण जनजागृतीसाठी एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद करत असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरणाची काळजी आपण घेतली तर पर्यावरण पण आपली काळजी घेईल असेही मत यावेळी विश्वास मुंडेंनी व्यक्त केले.
जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपले उस्मानाबाद हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व सहभाग घ्यावा व यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पण सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी वृक्ष लागवड सोबत वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे असून जास्त प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास सध्याची दुष्काळी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणूस बदलू शकतो पण वृक्ष बदलत नाही त्यामुळे वृक्ष लागवडीचा आपणांस फायदाच असुन कोणत्याही प्रकारचे नुकसान आपले होत नाही असे ही मत यावेळी आर. राजा यांनी व्यक्त केले.
शासनापेक्षा वृक्ष लागवडी मध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वसामान्य नागरिकांने वृक्ष लागवड केल्यास त्या वृक्षाप्रती प्रेमाची भावना त्या व्यक्ती कडे असते त्यामुळे वृक्षसंवर्धन करण्यास मदत होते. वृक्ष लागवड जास्त प्रमाणात व्हावी या उद्देशाने या वर्षी उस्मानाबाद नगरपालिका मधून प्रत्येक व्यक्तीला दोन झाडे देण्यात येणार असून ज्यांना वृक्ष हवे आहेत त्यांनी नगरपालिकेमधून वृक्ष घ्यावेत असे आवाहनही यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
यावेळी आई गोशाळा चे अध्यक्ष सतीश सोमाणी यांना गोरक्षण व गोसंवर्धन साठी गोरत्न पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल अजमेरा व आभिलाष लोमटे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुणाल गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले
यावेळी जितेंद्र खंडेरिया,मनोज कोचेटा, विशाल थोरात, अमर चांडक, हरीश सारडा, रोहन चौहान, अमित अजमेरा, अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, अँड. विश्वजीत शिंदे, अभिमान हंगरगेकर,अनुप बांगड, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, किरण वारे पाटील, सचिन बारस्कर, सचिन बांगड,आदित्य लगदिवे, अक्षय गांधी, मुजाहिद सिद्दिकी, रोहित सहाने व अन्नपूर्णा ग्रुप,एकता फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अग्रलेख – वृत्तपत्रांना फटका
बचावात्मक खेकडा प्रवृत्ती
पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्टेडियम वर जेष्ठ नागरिक कट्ट्यावर दोघांचे वाढदिवस थाटात…
संयोजक युवराज नळे यांनी सर्वांचे आभार मानले.
तेर येथे पोलिस रेझीग डे दिनानिमित्त जनजागृती
मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा
कोपर्डी घटनेसह महिलावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे,अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरूपयोग टाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी,स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु कराव्या अशा विविध मागण्यांसाठी दि.4 जानेवारी 2017 रोजी लोहारा तालुका मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव,महिला,युवक,मुली हातात भगवे ध्वज घेवुन व काळ्या फीती लावुन,व हातात विविध मागण्यांचे फलक,व बँनर घेवुन सहभागी झाले होते. या मोर्च्यामुळे संपुर्ण शहर भगवामय व मोर्चामय दिसत होते.या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना घेवुन शहरातील बसस्थानकापासुन करण्यात आली.हा मुक मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने छञपती शिवाजी महाराज चौक,आंबेडकर चौक,आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला.या मोर्चास पाठींबा देत शहरातील मुस्लीम समाजाने आझाद चौक येथे व लोहारा तालुका केमिस्ट्री अँण्ड डृगीस्ट असोसिशन यांच्यावतीने शिवाजी चौक येथे पाण्याचे वाटप करण्यात आले.
हा मोर्चा तहसील कार्यलयावर पोहचल्यानंतर शकंरराव जावळे पाटील महाविध्यालयाच्या प्रांगणात मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले.हा परिसर समाजबांधवानी मोठ्या प्रमाणात भरला होता.यावेळी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन ज्ञुतुजा राखुंडे यांनी केले.यानंतर पुढील मागण्यांचे निवेदन नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावी मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार व अनन्वित छळ करुन तिला ठार मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.जागतिक स्तरावर बलात्कारासारख्या गुन्ह्याचा विचार केला तर या गुन्ह्यातील आरोपींना इस्लामीक राष्टृामध्ये आठ दिवसात सजा होते.इतर पाश्चात राष्टृामध्ये दोन ते तीन महिन्यात गुन्हेगारांना सजा होते.परंतु आपल्या देशात या भयंकर अपराधांची प्रकरणे अनेक वर्ष चालतात.तरी आपल्या देशाच्या कायध्यामध्ये बदल करुन या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना आपल्या देशामध्ये तीन ते चार महिण्यात सजा होण्याबाबत कायध्यात बदल करण्यात यावा,केंद्रीय सामाजिक न्यायमंञी गहलोत याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार महाराष्टृात अँटृासिटीच्या गुन्ह्यात 8 व्या क्रंमाकावर आहे.100 अँटृासिटी गुन्ह्यापैकी 92.4% गुन्हे हे बोगस असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.तसेच देशभरामध्ये 92 ते 96% गुन्हे बोगस असल्याचे समितीने सांगीतले आहे.तरी अँटृासिटीच्या कायध्याचा गैरवापर होऊ नये म्हणुन त्यात आवश्यक ते बदल करुन नविन तरतुदी कराव्यात,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे, लोहारा शहरातील शिवाजी चौकात शिवछञपतींच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबीची पुर्तता करुन शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याची उभारणी करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन निकीता हंडीभाग,सत्यभागा जाधव,बबीता शिंदे,रेणुका चिंचोळ्,प्रतिक्षा मोरे,या मुलीनी प्रभारी तहसीलदार डॉ.रोहन काळे यांना दिले आहे.या मोर्चाची सांगता राष्टगीताने करण्यात आली.या मोर्चात तालुक्यातील मराठा समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,वकील मंडळी,महिला,नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी व प्रभारी पो.नि.फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हा मोर्चा लोहारा शहरात प्रथमच न भुतो न भविष्यतो असा निघाला होता.या मोर्चात अलोट गर्दि उसळली होती.या मोर्चात अतिशय शिस्तता दिसुन आली. यावेळी निर्माण झालेला कचरा शेवटी संवयसेवकांनी व मराठा समाजाने काढुन शहराची स्वच्छता केली.










