नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी ऐन विधानसभेच्या मतदानाच्या तोंडावर बंडाचा झेंडा घेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 18 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या नळदुर्ग शहरातील प्रचार कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षासह आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण तीन वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नय्यरपाशा जाहगिरदार, शहेबाज काजी, बसवराज धरणे, सुफिया कुरेशी, मन्नाबी कुरेशी हे पाच नगरसेवक निवडून आले होते. विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडले होते. त्यामुळे नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असलेले नयरपाशा जागीरदार व नगरसेविका सुफिया कुरेशी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे नळदुर्ग नगरपालिकेत तीनच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.तसेच नगरसेवक नयरपाशा जागीरदार व सुफिया कुरेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहराचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कारण नयरपाशा जागीरदार हे नळदुर्ग शहराच्या राजकारणामध्ये साम-दाम-दंड-भेद या युक्तीचा वापर करून काहीही उलटफेर करण्याची ख्याती राखतात अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे हि निवडणूक जरी विधानसभेची असली तरी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग शहरातील राजकीय पटावरील अनेक दिग्गज नेत्यांची आव्हाने त्यांच्यासमोर राहणार आहेत. कारण या निवडणुकीनंतर नगरपालिकेतील अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे आहे.
युगारंभ यात्रेतून भाजप करणार शक्तिप्रदर्शन
तुळजापूर – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शक्तिप्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आज दि.१८/१०/२०१९ रोजी सायं ठीक ०५ वा. हंगरगा (तीर्थ) पासून ‘युगारंभ यात्रा’ (रोड शो व रॅली) चे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा हंगरगा- तिर्थ(खु)- तिर्थ (बु) – बिजनवाडी – चिंचोली – आरळी (खु )- आरळी (बु ) – येवती- आरबळी – इटकळ- केशेगाव – देवसिंगा- नीलेगवा – गुळहळी -दहीटना- शहापुर – गुजनुर – खुदावाडी मार्गे जाणार असून अणदूर येथे रात्री ०९ वा. जाहीर सभा होणार आहे. या सभेला
भाजपा नेते देवानंदभाऊ रोचकरी, युवा नेते मल्हारदादा पाटील व महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.
तरी या ‘युगारंभ यात्रेत’ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या- अॅड. प्रकाश आंबेडकर
भूम – काळाच्या ओघाप्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे कृषिचा कोणताही उद्योग एका कडे न राहता शंभर जणांकडे असला पाहिजे तरच गोरगरीब व मध्यमवर्गीय तारला जाईल हे बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
तुळजापुरातून आ.चव्हाण की, आ.राणाजगजितसिंह पाटील ?
बंजारा क्रांती दलाने वंचित बहुजन आघाडीला झिडकारून भाजपाला दिले जाहीर समर्थन
वेळी भाजपचे विजय दंडनाईक, गणेश सोनटक्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य सौ.उषा यरकळ, टिकले गुरुजी, अड. रमेश भोसले, सुरजित राऊत – माजी प.स. सदस्य, पोपट राऊत ग्राम समिती सदस्य, विजय फंड, रमेश शिंदे, वाणे वाडीचे माजी सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच प्रमोद उंबरे, सुधाकर अबदारे, इत्यादी उपस्थित होते.
बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची भूम येथे जाहीर सभा
निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर हादरा फुलवाडी सरपंच-उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून; देवानंद रोचकरींनी कसली कंबर
भगव्या च्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्याना माफ करू नका- उध्दव ठाकरे
उस्मानाबाद- भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफ करू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन शिवसेनाप्रमुख उदधव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील सभेत करत पक्ष सोडून जनाऱ्यांवर टीका केली
शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे उस्मानाबाद येथे आले होते. १० रुपयात थाळी, १ रुपयात आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, महाविद्यालयीन तरुणींना मोफत शिक्षण व बससेवा हा शिवसेनेचा वचननामा जनतेपुढे मांडला. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही खरपूस टीका केली.
सभेसाठी परीक्षेची वेळ बदलली
उध्दव ठाकरे यांची सभा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात झाली मात्र तत्पूर्वी शाळेत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ बदलली, तसेच सभा होत असलेल्या परिसरात इतर शाळा व महविद्यालयाच्या परीक्षा चालू असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
नळदुर्ग नगरपालीकेतील अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
नळदुर्ग :- अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या 5 नगरसेवकांनी अशोक जगदाळे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले आहे. कार्यकर्त्यांसह काही नेते सकाळी, दुपारी व संध्याकाळी वेगवेगळ्या प्रचार कार्यालयात दिसत आहेत. त्यामुळे हे राजकीय कार्यकर्ते व नेते नेमके कोणत्या पक्षाचे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तसेच मतदारसंघात दररोज वेगवेगळी समीकरणे जुळत व बिघडत आहेत. अशीच काही राजकीय समीकरणे जुडल्यामुळे नळदुर्ग शहराच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आला आहे.त्याची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे तुळजापूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या 5 नगरसेवकांनी बंड पुकारत ऐनवेळी पाठ फिरवून गायब झाल्यामुळे झाली. त्यामुळे अशोक जगदाळे यांच्या तंबूत खळबळ उडाली होती. हे नगरसेवक तेव्हापासून अशोक जगदाळे यांच्याशी अंतर ठेवून नॉटरिचेबल असल्याने तर्क वितर्क लावले जात होते. मात्र अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर गायब असलेले 5 नगरसेवकांनी नळदुर्ग येथे 12 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नळदुर्ग येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याने अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आमदारकीचे स्वप्न पाहणारे तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना मोठा झटका बसला आहे.कारण अशोक जगदाळे यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळी त्यांची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी व इतर 1 असे तीन नगरसेवक वगळता नगरपालिकेतील गटनेता तथा नगरसेवक निरंजन राठोड, उपनगराध्यक्षा शाहीन मासुलदार, नगरसेवक दयानंद बनसोडे, आसिफा बेगम काजी, सुनंदा जाधव हे पाच नगरसेवकांनी त्यांची साथ सोडणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे हे नगरसेवक कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कारण 3 वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला नळदुर्गकरांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन 12 नगरसेवक 1 नगराध्यक्ष असे 13 जणांना निवडून देऊन सत्ता दिली होती. मात्र काही वर्षांनंतर अशोक जगदाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांचे एकदम जवळचे 4 नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारत बंडखोरी केली होती. ते नगरसेवक यापूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे समर्थक असलेले 9 नगरसेवकांनी साथ सोडल्या मुळे 3 नगरसेवक व 1 नगराध्यक्षा आता शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी 1 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून अशोक जगदाळे यांच्यापासून अंतर ठेवून नॉटरिचेबल आहे. त्यामुळे नळदुर्ग नगरपालिकेत अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला पडलेल्या खिंडारामुळे त्यांचा राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यात काही शंका नाही. तसेच नळदुर्ग शहराच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असलेला 1 मोठा मासा येणाऱ्या काही दिवसात आपल्या 2 समर्थक नगरसेवकासह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.







