Home Blog Page 316

E-Paper दैनिक जनमत 12 जुलै

दैनिक जनमत 12 जुलै 

अग्रलेख -सोनियांच्या दारी ‘राज’ सवारी

विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आघाडी, युती किंवा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही अशी परिस्थिती होती. मात्र गुढीपाडव्यानंतर राज ठाकरेंनी सभा घेतली सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची चिरफाड केली. मरगळलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला बळ येथूनच मिळाले त्यानंतर राज ठाकरेंनी 10 सभामंधून टीकेची तलवार धारधार ठेवली. परप्रांतीय मतांच्या भितीपोटी काँग्रेस मनसेला सोबत घ्यायला तयार नव्हती मात्र राष्ट्रवादीतील एक गट मनसेला सोबत घेण्याची इच्छा बाळगून होता. राज ठाकरेंनी मात्र कोणासोबतच न जाता एकला चलो रे ची भूमिका घेतली. पक्ष स्थापनेनंतर मनसेला चांगले यश मिळाले ते स्वबळावरच आणी जागाही कमी झाल्या एकटे असतानाच. मनसेला स्वबळाचा इतिहास आहे तो विधानसभेच्या वेळी टिकणार नाही असा अंदाज आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी राज ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली. ते बदलाचे दिशादर्शक आहे.  काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करा असे त्यांनी कोणत्याच सभेत सांगितले नाही मात्र मोदी-शहा जोडीला सत्तापटलावर पुन्हा येऊ देऊ नका असा  पुनरूच्चार वारंवार केला. परंतू लोकसभेत जे व्हायचे तेच झाले भाजप -शिवसेनेच्या तेवढ्याच जागा आल्या. सध्याही राज्यात सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका करणारा कोणताही नेता नाही. यातच राज ठाकरेंनी काँगेस नेत्या सोनिया गांधीची भेट घेतली. ठाकरे घराण्याने नेहमी गांधी घराण्यावर टीका केली आहे. खुद्द राज ठाकरेंनी सोनिया गांधीची भाषणातून कित्येकदा नक्कल केली आहे. बाबासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींची घेतलेली भेट वगळता दोन्ही घराण्यात भेटीचे योग आलेले नाहीत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील सत्ता समीकरण बदलण्यासाठी राज ठाकरे महत्वाची भूमिका बजावू शकतात. मनसे आणी काँग्रेसकडे हारण्यासारखं काहीच उरलेलं नाही मात्र मिळवण्यासाठी खूप काही आहे. उघड उघड आघाडी न करता पडद्यामागून एकमेकांना मदत दोघेही करू शकतात. जेवढे सत्ताधारी मजबूत आहे तेवढाच विरोधीपक्ष मजबूत असावा तरच लोकशाही आनंदाने नांदेल

E-Paper दैनिक जनमत 11 जुलै

दैनिक जनमत 11 जुलै सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

         
                       
               

E-Paper दैनिक जनमत 10 जुलै

दैनिक जनमत E Paper सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आवृत्ती  

दैनिक जनमत E-Paper कोल्हापूर

E-Paper दैनिक जनमत 9 जुलै

दैनिक जनमत 9 जुलै

नगरपालिकेच्या सभेत वृक्षलागवड, ओएफसी केबलवरुन खडाजंगी


उस्मानाबाद, दि. ५ प्रतिनिधी – नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे गटनेते नळे यांच्यात ओएफसी केबलवरुन चांगीलच खडाजंगी झाली दोघेही एकमेकांच्या जागेवर उठुन जोरजोरात बोलत असल्याने सभागृहात काही काळ तणाव होता.
सभेची सुरुवात नगरसेवक अभय इंगळे यांनी मांडलेल्या विषयाने झाली. शहरातील बागांमध्ये झाडे लावली जात आहेत. बागांना कंपाऊंड वॉल करुन झाडे लावण्याच्या ठराव झाला असल्याची त्यांनी आठवण करुन दिली. मात्र शहरात बागांना तारेचे कंपाऊंड बसवले जात आहे. एकएक फुटांवर झाडांची लागवड सुरु आहे. नागरिकांना बागेचा आनंद घेता येणार नाही. असे इंगळे यांचे म्हणणे होते. मात्र बागांना बांधकाम करुन कंपाऊंड वॉल करता येत नाही. किती अंतरावर झाडे लावायची याबाबत शासनाचे धोरण आहे. त्यानुसार झाडे लावत असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले, यावर नगरसेवक माणिक बनसोडे यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करा असे सांगितले. यावर नगराध्यक्षांनी तुमच्या आमदारांना शासनाच्या धोरणाबाबत विधानसभेत विषय मांडायला सांगा म्हटल्यानंतर हा विषय थांबला. 
सभेमध्ये लेखा विभागासाठी टॅली सॉफ्टवेअर बनवुन सनदी लेखापालची नेमणुक करणे, नागरिकांच्या तक्रारीसाठी नगरपालिकेचे ऍप बनवणे, आधारवर आधारित बायोमेट्रीक प्रणाली उपकरण खरेदी, मलनिस्सारण केंद्रासाठी सर्व्है नं ६६१,६६२,६६८ चा भाग खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करणे, डीजीपे अंकाऊंट उघडणे, अग्निशामन वाहन खरेदी आदी विषयांच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
साहित्य संमेलनासाठी ठराव
आखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे व्हावे अशा मागणीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेवुन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.
अल्पसंख्यांकासाठी नविन डीपीआर 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनेनुसार शहरातील अल्पसंख्यांकाच्या स्तर उंचावण्यासाठी, अल्पसंख्याक वस्तीमध्ये जागा शोधुन त्याच्या डीपीआरच्या प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये अल्पसंख्यांकासाठी उद्योग प्रशिक्षण, बाजार, शाळा, मच्छीमार्केट, यापैकी एक उपक्रम आखता येणार आहे.

E- Paper दैनिक जनमत

दैनिक जनमत 8 जुलै

वृक्ष लागवडी सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण जनजागृतीचे काम करावे – सहआयुक्त विश्वास मुंडे

          सातत्याने पर्जन्यमानाचे कमी होत असलेले प्रमाण हे चिंताजनक बाब असून त्यामुळे पडत असलेल्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवण्यासाठी काम करावे असे मत आयकर विभाग औरंगाबाद चे  सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद यांच्या वतीने मारवाड गल्‍ली येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते
          यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा , उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,आई गोशाळेचे अध्यक्ष सतीश सोमानी, अन्नपूर्णा ग्रुपचे अध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, पी. के. मुंडे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
          नेमक्या समस्या समजून काम केल्यास उत्तर लवकर मिळते आणि काम करण्यास सोपे होते. वृक्ष लागवडी सोबत पर्यावरण जनजागृतीसाठी एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद करत असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरणाची काळजी आपण घेतली तर पर्यावरण पण आपली काळजी घेईल असेही मत यावेळी विश्वास मुंडेंनी व्यक्त केले.
          जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपले उस्मानाबाद हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व सहभाग घ्यावा व यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पण सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी वृक्ष लागवड सोबत वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे असून जास्त प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास सध्याची दुष्काळी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणूस बदलू शकतो पण वृक्ष बदलत नाही त्यामुळे वृक्ष लागवडीचा आपणांस फायदाच असुन कोणत्याही प्रकारचे नुकसान आपले होत नाही असे ही मत यावेळी आर. राजा यांनी व्यक्त केले.
          शासनापेक्षा वृक्ष लागवडी मध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वसामान्य नागरिकांने वृक्ष लागवड केल्यास त्या वृक्षाप्रती प्रेमाची भावना त्या व्यक्ती कडे असते त्यामुळे वृक्षसंवर्धन करण्यास मदत होते. वृक्ष लागवड जास्त प्रमाणात व्हावी या उद्देशाने  या वर्षी उस्मानाबाद नगरपालिका मधून प्रत्येक व्यक्तीला दोन झाडे देण्यात येणार असून ज्यांना वृक्ष हवे आहेत त्यांनी नगरपालिकेमधून वृक्ष घ्यावेत असे आवाहनही यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
         यावेळी आई गोशाळा चे अध्यक्ष सतीश सोमाणी यांना गोरक्षण व गोसंवर्धन साठी गोरत्न पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल अजमेरा व आभिलाष लोमटे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुणाल गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले
          यावेळी जितेंद्र खंडेरिया,मनोज कोचेटा, विशाल थोरात, अमर चांडक, हरीश सारडा,  रोहन चौहान, अमित अजमेरा, अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, अँड. विश्वजीत शिंदे, अभिमान हंगरगेकर,अनुप बांगड, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, किरण वारे पाटील, सचिन बारस्कर, सचिन बांगड,आदित्य लगदिवे, अक्षय गांधी, मुजाहिद सिद्दिकी, रोहित सहाने व  अन्नपूर्णा ग्रुप,एकता फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

अग्रलेख – वृत्तपत्रांना फटका

वृत्तपत्रांना फटका

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात सामान्यांना म्हणावा तसा दिलासा नाही तसेच सामान्यांच्या जिवनात महत्वपूर्ण घटक असलेल्या वृत्तपत्रांनाही फटका बसणार आहे. वृत्तपत्रांच्या कागदावर 10 टक्के कस्टम ड्युटी लावली आहे. याचा परिणाम वृत्तपत्रांच्या कींमतीवर होईल याचा बोजा बोजा वाचक आणी वृत्तपत्रे दोघांवरही बसणार आहे. 2010 नंतर वर्तमानपत्रांच्या कागदावर ड्युटी नव्हती. वृत्तपत्र ही एक चळवळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीला बळकटी देत होती. तर स्वातंत्र्यानंतर समाजप्रबोधन करण्याचं काम वृत्तपत्रांकडे आहे. सोशल मेडीया  आणी इलेक्ट्रॉनिक मेडीयांचा वापर वाढला असल्याने याचा परिणाम वृत्तपत्रांवर झाला. मात्र मुद्रीत माध्यमांच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता आजही कायम आहे. वृत्तपत्र चळवळ टिकवण्याची जबाबादारी शासनाची आहे सरकारला त्यांच्या चुका सुधारायच्या असतील तर वृत्तपत्र टीकलीच पाहीजेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुरूवात देखील वृत्तपत्रातून झाली. व्यंगचित्र आणी अग्रलेखांच्या माध्यमातून त्यांनी देशाला वेगळी दिशा दिली. आत्ताच्या काळात व्यंगचित्र आणी अग्रलेख सोशल मेडीयातून प्रसिद्ध करता येतात मात्र त्याला लोकांपर्यंत पोहचण्याला मर्यादा आहेत. फेसबुक जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी पोस्ट पोहोचवण्यासाठी पैसै घेते. भविष्यात सोशल मेडीया किंवा मोबाईल मुळे सायबर वाॅर सुरू झाल्यास समाजप्रबोधन करण्याचे कोणतेच माध्यम उरणार नाही तेव्हा वृत्तपत्रेच चांगली भूमिका वठवू शकतात. त्यासाठीच वृत्तपत्र चळवळ टिकली पाहीजे. मोठी वृत्तपत्रे अशी झटके सहन करू शकतात मात्र लघु व मध्यम वृत्तपत्रांची अवस्था वाईट आहे. वृत्तपत्रे ज्या कींमतीत विकतात त्यापेक्षा दुप्पट खर्च त्यांच्या छपाईसाठी होतो ही वस्तुस्थिती आहे.  सरकार या सार्‍या गोष्टी जाणतेच ती टिकण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत

बचावात्मक खेकडा प्रवृत्ती

बचावात्मक खेकडा प्रवृत्ती 

खेकडा प्रवृत्ती मानवी जिवनात विकासाला खिळ घालते हे सर्वांनी महिती असते मात्र खेकड्यांचा वापर एखाद्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी केला जाणे हे अजबच म्हणावे लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणे फुटले त्यात 18 जणांचा जिव गेला धरणफुटीचे दोषी अजून ठरायचेत यात दोषी ज्याने धरण बांधले तो असू शकतो आणि गावकर्‍यांनी तक्रार करूनही ज्यांनी योग्य दखल घेतली नाही असे अधिकारी होऊ शकतात. हे धरण शिवसेनेच्या आमदारांच्या काळात बांधले गेले. त्यांच्या संबंधातील व्यक्तीनीच हे धरण बांधले आहे. दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई व्हावी  ही प्राथमिक भुमिका सर्वांचीच असते. मात्र सत्ताधाऱ्यांकडून हे धरण खेकड्यामुळे फुटलय असे तर्क लावण्यात येत आहेत. यातून संबंधित कंत्राटदारला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. धरण आघाडी सरकारच्या काळात बांधले गेलय याला ते जबाबादार कितपत यापेक्षा जे सध्या ज्यांचे सरकार आहे त्यांनी याबाबत काय केले हे महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यात असेच धरण फुटल्यानंतर ते उंदरामुळे फुटल्याचा कयास बांधला होता. महाराष्ट्राला जलक्रांतीची परंपर आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी बांधलेली धरणे कधी फुटली नाहीत त्यापैकी अनेक धरणे आजही सुस्थितीत आहेत. इंग्रजांनी बांधलेली पूल, इमारती आजही चांगल्या स्थितीत आहेत. लोकशाहीत अभाव आहे नियोजनाचा. कंत्राटदार पोसणे हा सत्ताधाऱ्यांचा धर्म बनला आहे त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे तर्क लावले जातात. कोंढव्यातील घटनेनंतर तात्काळ संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला मात्र या कंत्राटदाराचा सत्ताधाऱ्याशी संबंध असणे यामुळे गुन्हा दाखल न होणे यातच सगळे काही समजून घेता येईल.  उच्चस्तरीय समीती चौकशी करेल मात्र सत्ताधाऱ्यांकडून कंत्राटदाराच्या बचवासाठी प्रयत्न केले जाणे हे दुर्दैव आहे. भारतात अनेक मोठ मोठी धरणे आहेत काही धरणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरही असतात. उंदीर आणी खेकड्यामुळे धरणे फुटत असतील तर त्यांच्यापासून धोका आहे असे म्हणने हास्यास्पद आहे. खेकडे जलसंस्कृतीतल एक घटक आहेत. पाय ओढण्याची वृत्ती खेकड्याची असते. धरण फुटणे याला जबाबदार प्रशासनातील अधिकारी आहेत ज्यांनी जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हीवीच.