Home Blog Page 313

बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या- अॅड. प्रकाश आंबेडकर



भूम – काळाच्या  ओघाप्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे कृषिचा कोणताही उद्योग एका कडे न राहता शंभर जणांकडे असला पाहिजे तरच गोरगरीब व मध्यमवर्गीय तारला जाईल हे बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेशभाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ भूम नगर परिषद समोर सभेला  सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या प्रसंगी   बोलताना बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की 
त्या काळी  स्व. मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखाने हे सहकारी तत्वावरच चालवले जावे असा कायदा सर्वसामान्यच्या हितासाठी तयार केला होत तेव्हा आपली लोकसंख्या 35 कोटी  परंतु या लोकांनी स्वतःच्या फायदा साठी आत्ताची लोकसंख्या 129 कोटी असताना देखील कायदा मोडून खाजगीकरण करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दादागिरी ची भाषा करू लागले आहेत यांना यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारला 22000 कोटी रुपयांचा टॅक्स जमा होतो तो रोजगार हमीवर खर्च करण्याची तरतूद आहे तरी पण मागील 10 वर्षा पासून हे सरकार रोजगार हमीवर पैसे खर्च न करता रस्ते विकासासाठी तारण ठेवला आहे. सत्ता आमच्या हातात दिली तर हा पैसा बेरोजगारांना कामे व भत्ता वाटप करण्यासाठी वापरणार . 21 टीएमसी पाण्यावर बोलताना सांगितले की गेल्या 15 वर्षा पासून मी हे ऐकत आहे याचे नुसते राजकारण चालू आहे ते पाणी आज ना उद्या मिळणारच आहे व आम्ही सत्ता श्रीमंत होण्यासाठी मागत नाहीत तसे असते तर मागेच सत्तेत बसलो असतो आम्हाला बहुजनांचा विकास घडवायचा आहे आपली सत्ताआली तर आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना पगारवाढ करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले..
या प्रसंगी शेतकरी नेते गोरख भाऊ भोरे, नेते प्रवीण रणबागुल वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष मुजीब भाई पठाण, जिल्हाध्यक्ष वाघमारे, अनदुरकर सर, मुसभाई शेख, एजाज काजी, ऍड सिराज मोगल, वांचीतचे मुकुंद लगाडे, रसूल भाई पठाण, सुनील भाऊ कांबळे,अनुराधा लोखंडे, तानाजी बनसोडे, परांडा तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड,वाशीचे दिलीप गरड, के टी गायकवाड, दत्ता शिंदे, नेते नवनाथ पडळकर जिप सदस्य सौ छाया ताई सुनीलभाऊ कांबळे,  उषाताई सुरेशभाऊ कांबळे, प्रदीप कांबळे,सुभाष वाघमारे काकासाहेब मारकड आदी उपस्थित होते.

तुळजापुरातून आ.चव्हाण की, आ.राणाजगजितसिंह पाटील ?

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वात हाय व्होल्टेज लढत तुळजापूर मतदार संघात होत आहे. या मतदार सांगत दोन तालुक्यांचा समावेश होतो उस्मानाबाद मतदारसंघातील 72 गावे आणि संपूर्ण तुळजापूर तालुका. एकूण 18 उमेदवार नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत भाजपचे राणाजगजितसिंह पाटील कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांच्यात होत आहे. मधुकरराव चव्हाण सलग तीन टर्म आमदार आहेत. त्यापैकी काही काळ त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदी व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी गेला. या कार्यकाळात जिल्ह्यात किवा मतदारसंघात नेमका काय बदल झाला हे जनतेला अपेक्षित होते मात्र प्रचारादरम्यान या गोष्टी येत नाहीत. रोजगाराची समस्या किती प्रमाणात सुटली याचा ऊहापोह प्रचारात होत नाही. तुळजापूर देव्वस्थनाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली आहेत याची मांडणी लोकांना दिसत नाही. उलट मला शेवटची संधी द्या’ असा प्रचार आमदार चव्हाणांकडून सुरू असल्याने लोकांमध्ये नेमकी शेवटची संधी कशासाठी असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. धावत्या युगात आपला लोकप्रतिनिधी आपल्या कामांसाठी किती धावू शकतो याचाही जनता गांभीर्याने विचार करत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने शेवटची संधी म्हणून निवडून दिले त्यानंतर आजपर्यंत मतदारसंघातील नेमके किती प्रश्र्न सुटले याची आकडेवारी जनतेला मिळू शकेल काय? पाण्यासारखा गंभीर विषय सोडवण्यासाठी काय धोरणे आखणार आहोत याचा प्रचारात समावेश आहे काय? उस्मानाबाद तालुका पिकविम्यातून वगळला होता शेकडो शेतकरी हक्काच्या पैशापासून वंचित असताना विद्यमान आमदारांनी किती वेळा तो प्रश्र्न लाऊन धरला? किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करून उस्मानाबाद तालुक्यातील शेतकर्‍यांचा प्रश्र्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे कोणालाही आठवत नाही. भातुकलीचा डाव असल्यागत मतदारांना शेवटची संधी द्या म्हणणे हे कितपत योग्य आहे. याचा खल अख्ख्या मतदार संघात सुरू आहे. सध्या तरुण वर्ग राजकारणात मोठ्या प्रमाणावर एंट्री करत असतानाच तब्बल तीन वेळा आमदारकीची संधी देऊनही थकलेल्या अवस्थेत पुन्हा अजून संधीची मागणी आमदार चव्हाण मतदारापुढे करत आहेत याला संधीसाधू म्हणावे की काय? असा उलट सवाल जनतेतून विचारला जात आहे. आ.चव्हाणांपेक्षा राणादादा हे तरुण असल्याने व त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची पद्धत जिल्ह्याला परिचित असल्याने व राणा पाटलांचा प्रचारही धडाकेबाजपणे सुरू असल्याने तुळजापूरचा मतदार राजा यावेळी नेमकी कोणाला संधी देतो यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.

बंजारा क्रांती दलाने वंचित बहुजन आघाडीला झिडकारून भाजपाला दिले जाहीर समर्थन

तुळजापूर, दि. १५- समाजाच्या मुलभूत प्रश्नावर कोणतीही ठाम भूमिका घेण्यास कुचराई करणार्‍या बहुजन वंचित आघाडीला नाकारून भारतीय बंजारा क्रांतीदलाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुका पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बंजारा क्रांती दलाने भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठींबा घोषित केला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयासाठी आपण कटीबध्द असल्याचे बंजारा क्रांती दलाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 
भारतीय बहुजन बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंटूभाऊ राठोड, जिल्हाध्यक्ष भिमराव राठोड व युवा जिल्हाध्यक्ष लिंबाजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बंजारा समाजाच्या अडचणी, गोरगरीबांना न्याय आणि त्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना जाहीर पाठींबा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. आजवर विविध पक्षांनी बंजारा समाजाचे समर्थन घेण्यापुरते त्यांना वापरून घेतले. मात्र त्यानंतर समाजाच्या हिताकडे आणि मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या अनुमतीने राणाजगजितसिंह पाटील यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंटू राठोड यांनी जाहीर केले आहे. 
या

वेळी भाजपचे विजय दंडनाईक, गणेश सोनटक्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य सौ.उषा यरकळ, टिकले गुरुजी, अड. रमेश भोसले, सुरजित राऊत – माजी प.स. सदस्य, पोपट राऊत ग्राम समिती सदस्य, विजय फंड, रमेश शिंदे, वाणे वाडीचे माजी सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच प्रमोद उंबरे, सुधाकर अबदारे, इत्यादी उपस्थित होते.

बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची भूम येथे जाहीर सभा

 

परंडा :- परंडा मतदारसंघातील राजकीय वातावरण ऑक्टोबर हिट पेक्षाही जास्त तापू लागले असून प्रमुख पक्षाचे उमेदवार आपापली राजकिय  ताकद वापरून आपल्या प्रमुख नेत्यांच्या  प्रचार सभा घेत आहेत परंडा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार  सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो बाळासाहेब (प्रकाश )आंबेडकर हे भूम येथे बुधवारी सभा घेणार असून त्यासाठीचे भव्य नियोजन भूम येथे सुरू आहे सध्या परंडा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असून आंबेडकर यांची जाहीर सभा झाल्यानंतर मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे 
सद्या परंडा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून वंचित बहुजन आघाडीचे सुरेश कांबळे यांनी तिन्ही तालुक्यातील वाड्या ,वस्त्यांवर जाऊन भेट देऊन संपर्क वाढवला आहे तर युती व आघाडीवर नाराज वंचित कडे आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे 

निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर हादरा फुलवाडी सरपंच-उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश

            निवडणूकीच्या तोंडावर तुळजापूर मतदार संघात मधुकर चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होत आहे. तालुक्यातील फुलवाडी येथील सरपंचउपसरपंचसर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाससह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकला आहे. आमदार मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाला झुगारून डॉ. पद्मसिंह पाटील व महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित भाजपात प्रवेश केल्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना समर्थन देत तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. आमदार मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाला त्यानिमित्ताने मोठा हादरा बसला आहे. 
सरपंच मधुकर हजारेउपसरपंच सुभाषचंद्र कुताडेमाजी सरपंच वसंत जाधवसंजय हांडगे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज हिप्परगे यांच्यासह गुणवंत लंगडेसुभाष जाधवराजेंद्र राठोडचंद्रकांत लोहारराजेंद्र धबालेशांतीर हांडगेकाशीनाथ हांडगे,शेखर हांडगेबळीराम
हिप्परगेअविनाश हिप्परगेमारूती हिप्परगेसंतोष हिप्परगेअनिल हिप्परगेजितेंद्र हिप्परगेराजेंद्र हिप्परगेधनाप्पा धबालेशंकर धबालेसोमनाथ धबाले,विजय धबालेसुग्रीव कवडेनागनाथ पांचाळनितीन राठोडप्रकाश चव्हाणबालाजी लंगडेमहादेव कुताडे,अर्जून कुताडेसोमनाथ कुताडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटीलउमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे वसंत वडगावेविक्रमसिंह देशमुखदीपक आलुरेसाहेबराव घुगेमल्लिनाथ जेवळे,यशवंत लोंढेकाशिनाथ शेटेदयानंद मुंडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून; देवानंद रोचकरींनी कसली कंबर

तुळजापूर – तुळजापूर मतदार संघात निवडणूक प्रचाराला वेग आला असून भाजपचे पदाधिकारी प्रचारासाठी  ठाण मांडून बसले आहेत. भाजपचे नेते देवानंद रोचकरी यांनीही भाजपच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी तर रात्री सभा असा दिनक्रम सुरू आहे. भाजपने रोचकरी यांना महामंडळाचे आश्वासन दिले असून रोचकरी यांच्या ताकदीचा फायदा महायुतीचे  उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना  होणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकात देवानंद रोचकरी यांनी २०१४- ३५८९५, २००९- ४५९४२,२००४- ३७५१३ एवढी मते घेतली होती त्यांना मानणारा वर्ग पाहता तेच मतदान भाजपला होईल असा अंदाज लावला जात आहे. तर एकीकडे मधुकरराव चव्हाण सोशल मीडिया पासून अलिप्त असल्याने ते किती मतदारपर्यंत पोचतील याबाबत साशंकता आहे. वांचीतचे जगदाळे आणि प्रहारचे धुरगुडे यांनी वयक्तिक भेटीगाठी वर भर दिला आहे.

भगव्या च्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्याना माफ करू नका- उध्दव ठाकरे

उस्मानाबाद- भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफ करू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन शिवसेनाप्रमुख उदधव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील सभेत करत पक्ष सोडून जनाऱ्यांवर टीका केली 
शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे उस्मानाबाद येथे आले होते. १० रुपयात थाळी, १ रुपयात आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, महाविद्यालयीन तरुणींना मोफत शिक्षण व बससेवा हा शिवसेनेचा  वचननामा जनतेपुढे मांडला. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही खरपूस टीका केली.

सभेसाठी परीक्षेची वेळ बदलली
उध्दव ठाकरे यांची सभा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात झाली मात्र तत्पूर्वी शाळेत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ बदलली, तसेच सभा होत असलेल्या परिसरात इतर शाळा व महविद्यालयाच्या परीक्षा चालू असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

नळदुर्ग नगरपालीकेतील अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नळदुर्ग :- अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या 5 नगरसेवकांनी  अशोक जगदाळे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले आहे. कार्यकर्त्यांसह काही नेते सकाळी, दुपारी व संध्याकाळी वेगवेगळ्या प्रचार कार्यालयात दिसत आहेत. त्यामुळे हे राजकीय कार्यकर्ते व नेते नेमके कोणत्या पक्षाचे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तसेच मतदारसंघात दररोज वेगवेगळी समीकरणे जुळत व बिघडत आहेत. अशीच काही राजकीय समीकरणे जुडल्यामुळे नळदुर्ग शहराच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आला आहे.त्याची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे तुळजापूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या 5 नगरसेवकांनी  बंड पुकारत ऐनवेळी पाठ फिरवून गायब झाल्यामुळे झाली. त्यामुळे अशोक जगदाळे यांच्या तंबूत खळबळ उडाली होती. हे नगरसेवक तेव्हापासून अशोक जगदाळे यांच्याशी अंतर ठेवून नॉटरिचेबल असल्याने  तर्क वितर्क लावले जात होते. मात्र अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर गायब असलेले 5 नगरसेवकांनी नळदुर्ग येथे 12 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नळदुर्ग येथील  महायुतीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याने  अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आमदारकीचे स्वप्न पाहणारे  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना मोठा झटका बसला आहे.कारण अशोक जगदाळे यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळी त्यांची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवक  नितीन कासार, महालिंग स्वामी व इतर 1 असे तीन नगरसेवक वगळता नगरपालिकेतील गटनेता तथा नगरसेवक निरंजन राठोड,  उपनगराध्यक्षा शाहीन मासुलदार, नगरसेवक दयानंद बनसोडे, आसिफा बेगम काजी, सुनंदा जाधव हे पाच नगरसेवकांनी त्यांची साथ सोडणार हे निश्चित झाले  होते. त्यामुळे हे नगरसेवक कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कारण 3 वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला नळदुर्गकरांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन 12 नगरसेवक 1 नगराध्यक्ष असे 13 जणांना निवडून देऊन सत्ता दिली होती. मात्र काही वर्षांनंतर अशोक जगदाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांचे एकदम जवळचे  4 नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारत बंडखोरी केली होती. ते नगरसेवक यापूर्वीच  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज महायुतीचे उमेदवार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे समर्थक असलेले 9 नगरसेवकांनी साथ सोडल्या मुळे 3 नगरसेवक व 1 नगराध्यक्षा आता शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी 1 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून अशोक जगदाळे यांच्यापासून अंतर ठेवून नॉटरिचेबल आहे. त्यामुळे नळदुर्ग नगरपालिकेत अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला पडलेल्या खिंडारामुळे त्यांचा राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यात काही शंका नाही. तसेच नळदुर्ग शहराच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असलेला 1 मोठा मासा येणाऱ्या काही दिवसात आपल्या 2 समर्थक नगरसेवकासह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

तुळजापुरात भाजपचे बेरजेचे राजकारण !

उस्मानाबाद – निवडणुका म्हटल्या की पक्ष बदला बदली, बंडखोरांचे बंड या साऱ्या घटना आल्या. परंतु तुळजापूर मतदारसंघात सध्या वेगळे चित्र आहे.आचारसंहितेपूर्वी रोहन देशमुख, देवानंद रोचकरी अश्या तगड्या लोकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती.मात्र भाजपने माजी मंत्री राणाजगजिसिंह पाटील यांना उमेदवारी दिली.या उमेदवारी नंतर भाजपमध्ये बंडखोरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र देवानंद रोचकरी यांनी राणाजगजिसिंह पाटील यांना पाठिंबा दिला तसेच रोहन देशमुख यांनीही मेळावा घेऊन भाजप एकत्रित असल्याचे दाखवून दिले. १० ऑक्टोबर ला झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत दीपक आलुरे आणि गणेश सोनटक्के यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. दोघांचीही तुळजापूर तालुक्यात ताकद आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवसेनेचे कार्यकर्ते काही काळ प्रचारापासून अलिप्त होते मात्र त्यांनीही युती धर्म पळूनी कामाला सुरुवात केली. या पूर्वीच्या निवडणुकीत अा. चव्हाण यांच्यासमोर अनेक उमेदवारांचे आव्हान असायचे त्याच्यांत मतविभाजन होऊन निवडणूक जिंकणे त्यांना सहज सोप्प असायचं. यापूर्वी विभाजनाचा फायदा हाताला होत होता. मात्र शमलेली बंडखोरी मतदारसंघातील वजन असलेले नेते यांचा भाजप प्रवेश यातून भाजपने आखलेले बेरजेचे राजकारण येत्या २१ तारखेला काय किमया दाखवते ते पाहावे लागेल.

कार्यकर्ते झाले चार्ज
गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपूर्वी लढत कशी होईल याबाबत भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या मध्ये साशंकता होती मात्र सभेमध्ये शहा यांनी तुळजापूरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्याचे दिलेले आश्वासन तसेच २१ टी एम सी पाणी आदी स्थानिक मुद्द्यानाही प्राधान्य दिले यामुळे युतीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत

महाराष्ट्रात १८ ठिकाणी होणार अमित शहांच्या सभा पैकी तुळजापूर साठी एक

महाराष्ट्रात विधानसभेचा आखाडा पेटला आहे. भाजपने आपली ताकद पणाला लावली असून गृहमंत्री अमित शहा १० तारखेला तुळजापूर मतदार संघात महायुतीचे उमेदवार राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
 महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत महायुतीत २८८ पैकी १६४ भाजपकडे आहेत. गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्रात एकूण १८ सभा होणार आहेत त्यापैकी एक तुळजापूर मतदारसंघात होणार असल्याने या मतदारसंघासाठी भाजप किती प्रयत्नशील आहे हे दिसून येत आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात चार मतदार संघापैकी एकच भाजपकडे आहे.  तो जिंकण्यासाठी भाजप चांगलाच तयारीला लागला आहे. प्रचारात केंद्रीय नेतृत्वाची साथ लाभल्याने राणाजगजिसिंह पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी अशीच साथ मिळाल्यास जिल्ह्यासाठी चांगली बाब असल्याचे जाणकार सांगतात. मात्र आघडीचे उमेदवार मधुकरराव यांच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही मोठ्या नेत्याच्या सभेचे अद्याप पर्यंत नियोजन नाही. इतर उमेदवार सभांपेक्षा वैयक्तिक भेटीगाठीवर भर देत आहेत.