Home Blog Page 245

सांगली जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दोन आठवडे बंद करण्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांचे निर्देश

तासगाव प्रतिनिधी/ सांगली प्रतिनिधी 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून त्यानंतर कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना तसेच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नूतन महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी संजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात पुढील दोन आठवडे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनानक आवश्यक कार्यवाही करावी. आठवडी बाजारांवर निर्बंध आणताना जनतेच्या सोयीचाही विचार व्हावा. जनतेला भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची कमतरता भासू नये याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे.

    पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत असताना जिल्ह्यात १ हजार ३ रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी १८१ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८२२ रूग्ण गृहअलगीकरणामध्ये आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हॉस्पीटलमध्ये कोरोना अनुषंगीक उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या काळात आणखी रूग्णांना हॉस्पीटलायझेशनची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेवून शासकीय रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्येही कोरोना विषयक उपचारांची आवश्यक तजवीज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच रूग्णांनीही ताप, कणकण यासारखे दुखणे अंगावर न काढता लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत व पुढील धोका टाळावा. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य यंत्रणेने आपली सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी. पुरेशा बेड्सची संख्या, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा सज्ज ठेवाव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये टेस्टींगची संख्याही वाढवावी, अशा सूचना कोरोना आढावा बैठकीत दिल्या.

    यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. यामध्ये सद्यस्थितीत जिल्ह्यात पहिला डोस १ लाख ८३२ जणांनी घेतला असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ हजार ७१० आहे. याबाबतची अत्यंत तपशिलवार माहिती घेवून लसीची संबंधितांनी भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही ना.पाटील यावेळी केले.

दैनिक जनमत २४ मार्च E paper

 

महावितरणचा थकबाकी नसलेली महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद

 मुख्य अभियंत्यांनी केला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

उस्मानाबाद – महावितरणची थकबाकी नसलेली एकमेव उस्मानाबादची नगरपालिका ठरली असल्याने मुख्य अभियंता यांनी स्वतः नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा सत्कार केला आहे.

याबाबत माहिती अशी की,

उस्मानाबाद  येथील नगर पालिकेची 31 मार्च 2018  पर्यंत पाणीपुरवठा व  पथदिवे यांची थकबाकी एकुण 654.54 लक्ष एवढी होती. त्यापैकी शासन निर्णय क्र.संकीर्ण 2018/प्र.क्र.36/नवि-04 दिनांक13/08/2018च्या परिपत्रकानुसार उस्मानाबाद नगर पालिकेचे  50 टक्के रक्कम नगर विकास खात्याने  14 व्या वित्तआयोगाच्या निधीमधुन परस्पर महावितरण कंपनीला अदा केली व उर्वरित 50 टक्के रक्कम ही उस्मानाबाद नगर पालिकेने शासनाने हप्ते पाडुन दिल्या प्रमाणे सुलभ 15 हप्त्यांमध्ये वेळच्यावेळी भरणा केले. तसेच उस्मानाबाद नगर परिषद चे पाणी पुरवठ्याचे हातलादेवी पंपहाऊस, तेरणा   फिल्टर, तेरणा बुस्टर , रुईभर फिल्टर तसेच शहरातील बोर मिळुन 107 कनेक्शन आहेत व पथदिवे , नगरपालिका कार्यालय व  शाळा यांचे एकुण 207 कनेक्शन असुन प्रत्येक महिन्याला  महावितरण चे   साधारणः  35 ते 40 लाख रूपये लाईट बिला पोटी भरणा केला जातो. त्यामुळे आज तागायत 1 रूपयाही थकबाकी नसलेली महाराष्ट्रातील एकमेव उस्मानाबाद नगर पालिका ठरली आहे. त्यामुळे महावितरण चे  मुख्य अभियंता मुंबई  भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांचा   नगर परिषद उस्मानाबाद येथे येऊन यथोचित सत्कार व  अभिनंदन केले.

 यावेळी उस्मानाबाद महावितरण चे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील  एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर  महेंद्र वाघमारे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह  निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तासगाव व कवठेमंकाळ पोलीस स्टेशनच्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी

 

तासगाव प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर आर पाटील यांचा दणका मतदारसंघातील दोन्हीही पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी

तासगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांची गुप्त वार्ता कक्षात बदली. नविन पोलिस निरीक्षक म्हणून संजीवकुमार झाडे यांची नियुक्ती तर कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांची आवेदन शाखेत बदली. कवठेमहांकाळचे नविन पोलिस निरीक्षक म्हणून जितेंद्र शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

पोलीस विभागा नंतर आता कोणत्या विभागातील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार याकडे तासगाव लागले आहे. कवठेमंकाळ मतदारसंघातील सूज्ञ नागरिकांचे लक्ष

करणीची भीती दाखवून कुटुंब कलह निर्माण करणार्‍या आरग येथील मांत्रिक गौराबाईचा भांडाफोड

मिरज ग्रामीण पोलीस आणि अंनिस यांची धडक कारवाई

तासगाव प्रतिनिधी ( स्पेशल रिपोर्ट )

‘तुमच्या सासूने तुमच्यावर करणी केली आहे, त्यामुळे तुम्हास त्रास होतो,’ असे सांगून जादूटोण्याचे उपचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या व हे न केल्यास वाईट परिणाम होतील, अशी भीती घालून एका प्रतिष्ठित कुटुंबातील विवाहितेच्या कुटुंबात कलह माजविणार्‍या गौराबाई नाईक (पोरे मळा, आरग, ता. मिरज) या मांत्रिक बाईच्या विरोधात पीडित महिलेने सांगली अंनिसकडे तक्रार दाखल केली होती. या मांत्रिक बाईने या पीडित महिलेस करणी काढण्यासाठी विशाळगड, सौंदत्ती येथे दैवी उपचारासाठी फिरविले. पीडित महिलेच्या सासरच्या घरातून करणीच्या वस्तू काढण्याचे ढोंगही केले. हे सर्व करताना मांत्रिक बाईने पीडित महिलेकडून अनेकवेळा पैसे, महागड्या वस्तू उकळल्या. मांत्रिकबाईच्या सल्ल्याने पीडिता वागत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला. याचा एकूण परिणाम म्हणून पीडितेच्या नवर्‍याशी वितुष्ट येऊन तिला तिच्या कुटुंबातून एका मुलीसह बाहेर पडावे लागले.

मांत्रिकबाईकडून पुरेपूर फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांचेशी संपर्क केला. पिडीत महिलेने मांत्रिकबाईविरोधात लेखी तक्रार दिली. सांगली अंनिसने या गंभीर प्रकाराची दखल घेतली. मांत्रिक गौराबाई बुवाबाजी करते का याची खातरजमा करण्यासाठी  सांगली अंनिसचे कार्यकर्ते प. रा. आर्डे, आशा धनाले व त्रिशला शहा हे गौराबाईच्या दरबारात डमीभक्त म्हणून गेले. कार्यकर्त्या आशा धनाले यांनी त्यांना अघोरी त्रास होत असल्याचे गौराबाईस खोटे सांगितले. त्यानंतर गौराबाई यांच्या अंगात म्हाकुबाईचे वारे संचारले व त्या अवस्थेत मांत्रिकबाईने धनाले यांना सवतीने तुमच्यावर करणी केली आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय, असे सांगितले. करणी काढण्यासाठी ‘दर रविवारी दरबारात हजरी लावायला या,’ असा सल्ला दिला. करणीवर उतारा म्हणून भंडारा, गळ्यात बांधायला मंत्रून व गोमुत्रात बुडवून काळा दोरा दिला. तसेच अंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी बाटलीभरून गोमूत्र दिले. हे सर्व बघून गौराबाईच्या खोटे अंगात येऊन ती लोकांची फसवणूक करत अाहे,असे अंनिस कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.

 त्यानंतर अंनिस कार्यकर्त्यांनी थेट मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन तेथील पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची भेट घेतली. त्यांना या बुवाबाजीच्या प्रकाराची सविस्तर माहिती देऊन मांत्रिकबाईवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी पीडित महिलेचा लगेच जबाब नोंदवून घेतला आणि स्वत: पाटीलसाहेबांनी पोलीस गाडी, पंच, फोटोग्राफर घेऊन आरगला  मांत्रिकबाईच्या दरबारावर धाड टाकली. दरबारामध्ये पोलिसांना करणी काढण्याच्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी, वस्तू मिळाल्या. मांत्रिक गौराबाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांच्याकडून सुरू आहे. 

या कारवाईत स्वत: पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस नाईक बंडू पवार, सचिन पाटील, महिला कॉन्स्टेबल उज्ज्वला बांडगे, पोलीस हवलदार संभाजी पवार यांचेसह अंनिस कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे, आशा धनाले व त्रिशला शहा यांचा सहभाग होता. मांत्रिक गौराबाई या आरग-बेडग परिसरात गेली अनेक वर्षे म्हाकुबाई अंगात आणून लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करतात. दर रविवारी त्यांच्या घरी मोठा दरबार भरतो. त्या भक्तांना करणी, बाहेर बाधा काढून देतो, असे अमिष दाखवून फसवणूक करत असतात. मांत्रिक गौराबाई यांचेकडून फसवणूक झालेल्या भक्तांनी निर्भयपणे पुढे यावे आणि पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सांगली अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, सचिव डॉ.सविता अक्कोळे,प्रा.अमित ठकार,शशिकांत सुतार यांनी केले आहे.

 बुवाबाजीविरोधात त्वरीत आणि धडक कारवाई करणारे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील आणि त्यांच्या टीमचे सांगली अंनिसने अभिनंदन केले आहे.