Home Blog Page 236

जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व वृक्ष लागवड करुन शिवसेनेचा ५५वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

      

परंडा (प्रतिनिधी) शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनाचे औचित्य साधून परंडा तालुक्यातील जेष्ट शिवसैनीकांचा सत्कार व पंचायत समीतीच्या परिसरात वृक्ष लागवड करुण वर्धापण  दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        परंडा तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने दि.१९ रोजी परंडा पंचायत समितीच्या सभागृहात शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख  याचा सत्कार करून व पंचायत समितीच्या परिसरा मध्ये वृक्षारोपन करून शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

        यावेळी शिवसेनेचे जेष्ठ शाखाप्रमुख लक्ष्मण करळे, सुदाम सुरवसे,हरी भोई,महालींग गुडे,दिपक कुलकर्णी,भगवाण सुर्वे,श्रीमंत खबाले,दत्ता रणभोर, धर्मा जगदाळे,श्रीकांत खबाले, विनोद जगताप यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके व शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते हार,श्रीफळ,शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

        या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.गौतम लटके,तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, पंचायत समीती सदस्य गुलाब शिदे,पोपट चोबे,सतिष दैन,शाम मोरे,बळीराम गवारे,शुक्राचार्य ढोरे,उप ता.प्र.शाहू खैरे,सतिश मेहेर, नवनाथ बुरंगे,अशोक गरड, विश्वास गुडे,प्रविण कांबळे अमोल गोडगे,विजय नवले,दादा फराटे, सुदाम देशमुख,अप्पा गोडगे,रमेश गरड रूपेश काळे,भारत ढोरे , सागर बुरंगे,बाळू चतुर,राजा ढगे, प्रविण कांबळे यांच्यासह शिवसैनिक मोढ्या संखेने उपस्थित होते.

परंड्यात धाडसी चोरी,सोने, चांदी,रोख रक्कम आसा एकूण २ लाख २६हाजाराचा ऐवज लुटून चोरांचा पोबारा

शिक्षक घरफोडी प्रकरणी श्वान व ठसे तज्ञ घटनाथळी…..

श्वान घरपरिसरात घुटमळले, चोरांचा तपास करणे पोलीसांसमोर आव्हान

परंडा ( दि १९ ) परंडा येथील समर्थनगर सोसायटीमध्ये राहणारे शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांच्या घरघोडी प्रकरणातील आरोपीचा तपास करण्यासाठी  शनिवार दि १९ रोजी  उस्मानाबाद चे श्वास पथक,व ठसे तज्ञाचे पथक पाचारण करण्यात आले होते .

   उस्मानाबाद च्या श्वान पथकातील प्लुटो नावाच्या डाबरमन श्वानाला घटनास्थळाचा वास देऊन पथकातील पोलिस कर्मचारी ढोणे,हावळे, यांनी आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील व्यक्तींचा हात लागला असल्याने श्वान घरपरिसरात घुटमळले त्यामुळे माग काढता आला नाही.ठसे तज्ञाच्या पथकाने ठस्याचे नमुने घेतले आहेत. पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने,पो.उप निरिक्षक दादासाहेब बनसोडे पोलिस कॉन्स्टेबल शेख,पोलिस कॉन्स्टेबल शेंदारकर,पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड,पोलिस कॉन्स्टेबल भोसले,महिला पोलिस नाईक यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे .

        शुक्रवार दि १८ जुन रोजी  भरदिवसा दुपारी २ वाजेच्या सुमारास समर्थ नगर सोसायटी येथील शिक्षक इंद्रजीत मुळीक यांच्या घराच्या  दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरांनी  कपाटातील दीड लाख रुपये रोख व १ तोळ्याचे २ व अर्धा तोळ्याचे २ असे तिन तोळ्याच्या ४  अंगठ्या व चांदीचे पंचपाळ व पायातील चांदीचे पैंजण असा एकुन २ लाख २६ हजाराचा माल चोरून नेला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की शिक्षक मुळीक हे पाहुण्यांचे मासिक असल्याने दि १८ रोजी  कळंब तालूक्यातील गौर येथे गेले होते,घरी इंद्रजीत यांचा मुलगा धिरज एकटाच होता अभ्यास केल्या नंतर मुलगा रूई येथे चुलत्याच्या घरी १२ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लाऊन जेवणासाठी गेला होता . जेवण  करून रुई येथून आल्यावर त्याला घराच्या दरवाज्याची कडी तुटलेली दिसली व घरातील कपाट उघडे दिसल्याने त्यांला घरात चोरी झाल्याचे दिसुन आले .त्याने फोनवर वडिलांना माहिती दिली इंद्रजित मुळीक यांनी  परंडा येथे घरी येऊन पाहिले असता कपाटातील दीड लाख रुपये व सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे दागीन्याची चोरी झाल्याचे दिसुन आले .इंद्रजित मुळीक हे करमाळा तालूल्यातील गौडरे येथे खाजगी संस्थेवर शिक्षक आहे त्यांचा मोठा मुलगा मेडीकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे .मुलाची फी भरण्या साठी त्यांनी पैसे कपाटात आणुन ठेवले होते.या प्रकरणी धिरज मुळीक यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलिसात अज्ञात चोराविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीप्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक दादासाहेब बनसोडे करीत आहेत

दैनिक जनमत १९ जून E paper

दुर्मिळ अशा शृंगी घुबडाला मिळाले जीवदान

 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील पर्यावरणप्रेमी सिध्देश्वर भंडारे यांना सकाळी त्यांच्या शेतात शिंगवाले अर्थात शृंगी घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला उडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक प्रा.मनोज डोलारे यांच्याशी संपर्क साधला.
वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके, प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे यांच्या चमूने ताबडतोब घटनास्थळी भेट देवून प्रथमोपचार केले.
याबाबत माहिती देताना प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की, सदर घुबड हे शृंगी (शिंगवाले) घुबड असून त्याच्या उजव्या पंखाचे हाड मोडले असल्याने त्याला सध्यातरी उडता येणे शक्य नाही. झालेली जखम ही काही दिवसांपूर्वी झालेली असल्याने जखमेचा संसर्ग वाढला आहे. उलूक कुळातील घारीपेक्षा मोठा असणा-या ह्या घुबडाच्या डोक्यावर दोन्ही बाजूंना काळ्या पिसांचा एकेक झुपका असतो. हे झुपके शिंगासारखे दिसतात म्हणूनच त्याला शृंगी हे नाव पडलंय. इंग्रजीत त्याला Indian Eagle Owl/Great Horned Owl अशी नावे आहेत. मत्स्य घुबडाप्रमाणे हा संपूर्ण निशाचर नाही, कारण तो दिवसाढवळ्यासुध्दा हिंडताना दिसतो. खडकावर किंवा झुडपाच्या आश्रयाने तो आपला दिवसाचा वेळ घालवतो. सायंकाळी खोल, गंभीर घुमणा-या आवाजाने याच्या अस्तित्वाची जाणीव होते.
पंखाची जखम जास्त असल्याने त्या शृंगी घुबडाला उपचारासाठी उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डाॅ.सुदर्शन मुंढे आणि त्यांचे सहकारी डाॅ.महेश हंगरकर यांनी उपचार केले.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी सांगितले की जखम पूर्णपणे भरुन येण्यास जवळपास दहा लागणार आहेत. उडता येत नसल्याने आणि तो पूर्णतः मांसाहारी असल्याने त्याची काळजी घेण्याची गरज आहे. तोपर्यंत आमची वनविभागाची टीम आणि प्रा.मनोज डोलारे त्याची काळजी घेणार आहोत. उडण्याक्षम झाल्यानंतर त्याला परत भंडारवाडीच्या शिवारात सोडले जाणार आहे.
घुबड पक्षाविषयी अधिक माहिती देताना प्रा.मनोज डोलारे म्हणाले की, पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. पाश्चात्य जगात बुद्धिमानपणाचे प्रतीक मानले जाणारे आणि पुराणांमध्ये लक्ष्मी देवीचे वाहन असणारे घुबड आपल्याकडे अपशकुनी का समजले जाते हा प्रश्नच आहे. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. निशाचर असल्याने आणि त्याचे भीतीदायक डोळे आणि घूत्कार यामुळे मानव त्याला घाबरतो. वस्तुतः निसर्गात टिकून राहण्यासाठी निसर्गाने त्याला तसे बनवले आहे.
घुबडांच्या जगभरात जवळपास २०० जाती आहेत. अंटार्क्टिका सोडला तर पूर्ण पृथ्वीभर त्यांचा वावर आहे. भारतात जवळ जवळ ६० प्रजाती आणि उप-प्रजातींचे घुबड आढळतात. आपल्याकडे बार्न आउल किंवा गव्हाणी घुबड, पिंगळा हे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय डोक्याजवळची काही पिसे शिंगासारखी उभी राहत असल्याने शृंगी घुबड हे जंगलातून किंवा कडेकपाऱयातून दृष्टीस पडते.
मोठय़ा झाडांच्या ढोलीत जोडीजोडीने दिसणारे पिंगळा हे घुबडाचेच भाईबंद आहेत. यातलाच रानपिंगळा ही जात दुर्मिळ श्रेणीत पोहोचली आहे. घुबड अत्यंत उत्कृष्ट शिकारी असतात. हे लहान किडे, उंदीर किंवा पक्षी खातात. मोठी घुबडे ससे, घुशी, साप यावर उपजीविका करतात. भक्ष्य मोठे असल्यास पंखात पकडून लचके तोडून खातात. लहान प्राणी अख्खा गिळतात. अन्नाचे पचन झाल्यावर न पचलेली भक्ष्याची हाडे, पिसे, केस या पदार्थांचे गोळे बनवून ते ओकून टाकतात.
घुबड शेतकऱयांच्यासाठी उपयुक्त पक्षी आहे. उंदीर, घुशी हे प्रमुख भक्ष्य असल्याने मानवाला उपकारकच आहे. घुबड त्याची शिकार अख्खी गिळतो आणि वर्षभरात सुमारे १००० उंदीर खातो. उंदीर हे घुबडांचे आवडते खाद्य असल्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा मित्र ही समजले जाते.
काही ठिकाणी घुबडांना पाळण्यासाठी पकडले जाते तर जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच घुबडांबद्दल समाजात अजूनही अपसमज आहेत.
२०१६ मध्ये लालबागच्या राजाला पण घुबडावर विराजमान केले होते. समाजातून घुबडाबद्दलचे अपसमज दूर करण्यासाठी हे प्रयत्न हळूहळू का होईना सफल व्हावेत आणि या देखण्या आणि उपयुक्त पक्ष्याला आपण त्याचा मान मिळवून देऊ.