माजी पोलीस पाटील करत होता तस्करी ,वाघ/बिबट्या ची तीन नखे,एका वन्य प्राण्यांचे काळीज व एक बंदूक सह अटक
राधानगरी( प्रतिनिधी) -आज 3.9.2021 रोजी सकाळी 12 वाजता वनविभागाच्या एका धडाक्याच्या कारवाई मध्ये मौजे शिवडाव , ता.बुडरगड , जिल्हा कोल्हापूर , येथे माजी पोलीस पाटील वसंत महादेव वासकर वय 55 , याच्या राहत्या घरावर मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा मारण्यात आला.सदर छाप्यात त्याच्या घरात 3 वाघ/बिबट नखे व एका वन्य प्राण्यांचे काळीज हे हस्तगत करण्यात आले. ह्या शिवाय शिकारीसाठी वापरलेली बंदूक ही हस्तगत करण्यात आली आहे.तसेच आरोपी- वसंत महादेव वासकर यास देखील अटक करण्यात आलेली आहे.आरोपी याने तीन नख्या घरातील स्वयंपाक घरात हळदीच्या डब्यात (3)तीन नख्या लपवून ठेवले होते.वन्यप्राण्यांचे काळीज त्याने फ्रिज मध्ये लपवून ठेवले होते.720 ग्राम मांस, बारा बोअर बंदूक, 13 जिवंत काडतुस हे हस्तगत केले आहे, व तीन बिबट्या नखे.त्याच्या घरात एक बंदूक हे जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपी ह्याने ह्यापूर्वी असे अनेक कारनामे जंगलात यापूर्वी केल्याची चर्चा आहे. ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वन संरक्षक डॉ व्ही क्लेमेंट बेन व उपवनसंरक्षक आर.आर.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई मध्ये सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल फिरते पथक युवराज पाटील, वनक्षेत्रपाल अशोक वाडे, किशोर आहेर, सुनील खोत, मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक सांगली अजितकुमार पाटील व वनविभागाचे इतर वनपाल संदीप शिंदे, वनरक्षक जॉन्सन डिसोझा, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले हे सहभागी झाले होते.अधिक तपास सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे करीत आहेत.
17 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत.”
परंडा :- १७ वर्षापासून हवा असलेला आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.वडगांव (नळी), ता. भुम येथील भावड्या उध्दव काळे याचा भुम पो.ठा. गु.र.क्र. 37 / 2004 मध्ये सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत असल्याने गेली 17 वर्षे तो पोलीसांना हुलकावनी देत होता. गोपनीय माहिती आधारे परंडा पो. ठा. च्या पोनि- श्री. सुनिल गीड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- कळसाईन, पोना- घोळवे, पोकॉ- कोळेकर, सय्यद यांच्या पथकाने त्यास आज दि. 03 सप्टेंबर रोजी भुम तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
“अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान 33 छापे.”
उस्मानाबाद जिल्हा : काल दि. 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद पोलीस दलाने जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी मोहिम राबवून खालील प्रमाणे कारवाया केल्या. यात 305 लि. अवैध गावठी मद्य तर देशी- विदेशी 146 बाटल्या मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 33 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.
1) तुळजापूर पो.ठा. च्या पथकास अपसिंगा ग्रामस्थ- लक्ष्मी कांबळे या 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.
2) कळंब पो.ठा. च्या पथकास इंदीरानगर परिसरात ललीता काळे या 10 लि. गावठी दारु, डिकसळ येथील श्रावणी काळे व कविता काळे या दोघी अनुक्रमे 10 व 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या, कळंब मार्केट यार्डात कमल पवार या 19 लि. गावठी दारु तर तानाबाई शिंदे या भोगजी येथे 20 लि. गावठी मद्य बाळगलेल्या आढळल्या.
3) मुरुम पो.ठा. च्या पथकास केसरजवळा येथे राजेश गायकवाड हे 7 लि. गावठी दारु बाळगलेले, चिंचोली (भु.) येथे अजित गायकवाड हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले तर दाळींब येथे जगदीश पवार हे देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले आढळले.
4) शिराढोन पो.ठा. च्या पथकास लोहटा (पु.) येथे सुरज भोगले हे 180 मी.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या 8 बाटल्या, रांजणी येथे अशपाक कुरेशी हे देशी दारुच्या 8 बाटल्या तर दाबा येथे रावसाहेब टेळे हे देशी दारुच्या 28 बाटल्या बाळगलेले आढळले.
5) परंडा पो.ठा. च्या पथकास ईडा येथे अमोल कचरु भोसले हे 180 मी.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 13 बाटल्या तर सुमित नलवडे हे 4 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
6) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास जाहगीरदारवाडी तांडा येथे आंबादास राठोड हे देशी दारुच्या 24 बाटल्या बाळगलेले तर उज्वला पवार या महामार्गावरील तेरणा तिठा परिसरात 7 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.
7) येरमाळा पो.ठा. च्या पथकास सापनाई येथे समाधान पायाळ हे 5 लि. गावठी दारु बाळगलेले तर चोराखळी येथे सिताबाई काळे या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेल्या आढळल्या.
8) भुम पो.ठा. च्या पथकास वालवड येथे सचिन मोहिते हे देशी दारुच्या 11 बाटल्या बाळगलेले तर गोरमाळा फाटा येथे लताबाई पवार या 5 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.
9) उमरगा पो.ठा. च्या पथकास तुरोरी येथे शिवाबाई लिंबोळे या 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर गोपीनाथ राठोड हे पळसगाव तांडा येथे 20 लि. गावठी दारु बाळगलेले तर जकेकुरवाडी येथे बालाजी चव्हाण हे 18 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
10) ढोकी पो.ठा. च्या पथकास बुकनवाडी येथे शंकर शिंदे हे 10 लि. व गवणा शिंदे 15 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
11) लोहार पो.ठा. च्या पथकास परशुराम गणागुणी हे जेवळी (द.) येथे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
12) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास अणदुर येथील दयानंद सोनवने हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
13) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास जुने बस आगार परिसरात शितल काळे या 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.
14) वाशी पो.ठा. च्या पथकास बारलोणी येथे चंदाबाई शिंदे या 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.
15) तामलवाडी पो.ठा. च्या पथकास वडगाव (का.) येथील ज्ञानेश्वर भोसले हे देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले आढळले.
16) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास चिलवडी येथे सुनिल दिंडोळे हे 15 लि. तर महेश हाके हे येडशी येथे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
17) बेंबळी पो.ठा. च्या पथकास नांदुर्गा येथे अजित बनसोडे हे देशी दारुच्या 16 बाटल्या बाळगलेले आढळले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्यसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार: दत्तात्रय भरणे
सोलापूर, दि.3: येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्मितीसाठी एकूण नऊ कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे . त्यातील दोन कोटी रुपये निधी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित सात कोटी रुपये निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील आठवड्यात समिती सदस्यांसह भेट घेण्याचा निर्णय स्मारक समिती सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली .
येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्यांची बैठक पार पडली , त्यावेळी ते बोलत होते .या बैठकीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू तथा स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर यांच्यासह समितीचे सदस्य बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, आदित्य फत्तेपुरकर, डॉ. अनिकेत देशमुख, गेना दोडतले, श्रावण भवर, बाळासाहेब बंडगर, अस्मिता गायकवाड, ॲड. सुचेता व्हनकळसे, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे आदी उपस्थित होते .
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकासंदर्भात माहिती दिली. स्मारकासाठी विद्यापीठासमोर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी स्मारक, चबुतरा आणि ॲम्पीथेअटर असणार आहे. ॲम्पिथेअटरमध्ये डॉकुमेंटरीद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचा, शौर्याची माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या पत्रावरसुद्धा अहिल्यादेवींच्या फोटोचा लोगो करण्यात आला आहे.
शासनाकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्मारकाचे काम 6 मार्च 2022 अथवा 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहेत. जगाला अभिमान वाटावा आणि नव्या पिढीला आदर्श ठरावे, असे स्मारक उभारणार असल्याचे पालकमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत समितीच्या सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हातात धरलेली शिवपिंडावरील पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींचा फोटो हा हातात शिवपिंड धरलेला असून लोकांच्या मनात तोच फोटो परिचित असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे एकमतांनी शिवपिंड हातात धरलेला अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. प्रभारी कुलसचिव डॉ. घुटे यांनी आभार मानले.
०४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.तसेच ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दूसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
स्थानिकांना पास मिळण्यासाठी मच्छीमारांचे ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद –
सीना कोळेगाव धरणात परंडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारी करण्यासाठी पास मिळावा या मागणीसाठी मच्छीमारांचे आंदोलन सुरू असून गेल्या तीन तासापासून उस्मानाबाद शहरातील सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालय येथे मच्छीमारांनी ठिय्या मांडला आहे. परवाना मिळाल्याशिवाय इथून उठणार नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
आंदोलनाच्या सुरुवातीपासून घोषणा देऊन आंदोलन करणारे मच्छीमार आता अर्धनग्न आंदोलनाकडे वळले आहेत.
पोलिसांची चर्चा निष्फळ
आंदोलनाच्या सुरुवातीला आनंद नगर पोलिसांनी आंदोलक आणि प्रशासनात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सहायक आयुक्त न्यायालयीन कामासाठी औरंगाबाद येथे गेले असल्याने निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे आंदोलक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांनी केलेली चर्चा तूर्तास निष्फळ ठरली आहे.
निधी आणण्यावरून श्रेयवादाला फुटले तोंड
सक्षणा सलगर यांनी अर्ध्यात सोडला कार्यक्रम
उस्मानाबाद – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतात तसे आरोप प्रत्यारोप, श्रेयवाद देखील होत असतात. विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम देखील जोरात सुरू होतात. असाच कार्यक्रम उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथे काल दि ०२ सप्टेंबर रोजी झाला. त्यात जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि राष्ट्रवादीच्या पाडोळी गटाच्या सदस्या यांच्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गासाठी असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान श्रेयवादाला तोंड फुटले आहे.
मेंढा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पालखी प्रदक्षिणा रस्त्याचे आज माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मंदिराच्या समोरच्या ओट्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला.प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचे भाषण झाले तदनंतर अर्चना पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली आणि मेंढा गावात विकासकामांना निधी आणल्याचे सांगितले यावर जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी आक्षेप घेतला या गटाची सदस्य मी आहे निधी आणण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मंदिरात तरी खोटे बोलू नका असा स्वर काढत त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. या कार्यक्रमानंतर मेंढा गावात या प्रकाराची चर्चा दिवसभर होती.
निधी कोणी आणला त्याचे रेकॉर्ड चेक करा – सक्षणा सलगर
मेंढा गाव माझ्या जिल्हा परिषद मतदार संघात येते तिथल्या विकास कामासाठी मी केलेल्या मागणीनुसार निधी मिळाला. जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड चेक करून बघितल्यास कोणी मागणी केली आणि कोणी निधी आणला हे समजेल. गेल्या पाच वर्षात अर्चना पाटील कधीच गावात आल्या नाहीत. आज येऊन मी निधी आणला सांगून श्रेय घेणे चुकीचे आहे. मतदार संघात येण्याला विरोध नसून श्रेय घेण्याला माझा विरोध असल्याची प्रतिक्रीया सक्षणा सलगर यांनी दिली.
आर. पी.आय. चे विविध मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण
तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवरती अतिक्रमण करुन बांधकाम करणाऱ्या गणपत नरवडे व त्यास सहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी, नगरअभियंता, तसेच कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले आहे
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या असून प्रामुख्याने तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुढे नगरपरिषद तुळजापूर, नगर अभियंता, बांधकाम परवाना लिपीक, व विकास योजनेचा अभिप्राय देणारे लिपीक यांची तत्कालीन मुख्याधिकारी अशिष लोकरे, व त्यांना सहाय्य करणारे सर्व कर्मचारी यांची या प्रकरणी सखोल चौकशी करून बांधकाम परवानगी देणारे व बांधकामास पुर्णत्वास सहकार्य करणारे तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुंढे व अशिष लोकरे त्यांचे सहकर्मचारी यांच्यावर गुन्हे नोंद त्वरीत 15 दिवसाच्या आत योग्य कार्यवाही करण्यातीत यावी. तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने मार्फत होणा-या जमिनचे तात्काळ वाटप करण्या यावे. महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे ,मोलाना आझाद, संत रोहीदास महाराज या सर्व महामंडळाला तात्काळ निधी उपलब्ध करुन प्रकरणाचे वाटप करण्यात यावी. संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेतील प्रकरणे तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना तात्काळ पगारी चालू करण्यात याव्या, रमाई आवास योजनेची प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी., महागाई निर्देशांकाप्रमाणे मागास्वर्गीय विदयार्थ्याच्या शिष्यवर्ती मध्ये वाढ करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, रंजित गायकवाड,तानाजी कदम,आनंद पांडागळे, विद्यानंद बनसोडे,संपत जानराव,प्रविण बनसोडे,उद्य बनसोडे,स्वराज जानराव आदींची स्वाक्षरी आहे.
०३ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.तसेच ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने कोविशील्ड लसीचा पहिला आणि दूसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

































