Home Blog Page 219

ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी झारखंड राज्यातून अटकेत.

 

सायबर पोलीस ठाणे उस्मानाबाद : ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीला झारखंड राज्यातून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले असून याबाबत अधिक वृत्त असे की, तुमच्या युपीआय ॲपलिकेशनची केवायसी करायची आहे. असा कॉल परंडा येथील जाकीर मुल्ला यांना आल्याने त्यांनी समोरील अज्ञाताने सांगीतल्याप्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘क्वीकसपोर्ट’ हे ॲपलिकेशन घेउन आपल्या युपीआय खात्यावर व्यवहार केले. दरम्यान समोरील अज्ञाताने या ‘क्वीकसपोर्ट’ ॲपलिकेशनद्वारे मुल्ला यांच्या युपीआय खात्याची- बँक खात्याची माहिती व पासवर्ड जाणून घेउन त्यांच्या खात्यातील 1,62,957 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. आपली फसवणूक झाल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आल्याने त्यांनी परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गु.र.क्र. 165 / 2020 नोंदवण्यात आला.

            पुढील तपासाकरीता उस्मानाबाद येथील सायबर पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. सायबर पोलीसांनी तांत्रीक माहिती गोळा केली असता हा गुन्हा मधुपूर, जि. देवघर, रा. झारखंड येथील मुर्शीद अन्सारी या 22 वर्षीय तरुणाने केला असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास परंडा पो.ठा. च्या सपोनि- श्री. ससाने, पोकॉ- मुलानी, विधाते यांचे पथक झारखंड येथे रवाना झाले होते. तब्बल 7 दिवस झारखंड राज्यात शोध घेउन नमुद आरोपीस अखेर दि. 01.09.2021 रोजी ताब्यात घेउन उस्मानाबाद येथे आनले असून उर्वरीत तपास सायबर पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.


रात्रगस्तीदरम्यान 15 भ्रमणध्वनींसह संशयीत ताब्यात.”



अंबी पोलीस ठाणे : अंबी पो.ठा च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर यांसह पोहेकॉ- मुळे, धावडे, पोकॉ- आडसूळ यांचे पथक आज दि. 7 सप्टेंबर रोजी पहाटे रात्रगस्तीस असतांना अंबी येथे एक पुरुष रस्त्यात दिसला. पोलीसांनी त्यास हटकले असता त्याचे नाव सुभाष उत्तम राऊत, रा. खांबेवाडी, ता. करमाळा असल्याचे समजले. संशयावरुन पोलीसांनी त्याच्या पिशवीची झडती घेतली असता आत 14 स्मार्टफोन व 1 फिचर फोन असे एकुण 15 भ्रमणध्वनी आढळले. या भ्रमणध्वनींच्या मालकी- ताबा विषयक तो समाधानकारक माहिती देत नसल्याने त्यास अटक करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122, 124 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्या भ्रमणध्वनींच्या आयएमईआय क्रमांकाद्वारे मुळ मालकांचा शोध घेतला जाणार असुन या कामी उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याची मदत घेतली जाणार आहे. 

राष्ट्रगीताने आता जिल्हा परिषदेच्या कामकाजाची सुरुवात होणार…अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिले आदेश

 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तातडीने जारी करावेत असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता कांबळे यांनी दिले आहेत.
    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम.राऊत,पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जलसंधारण विभागाचे वि. वि. जोशी आणि समाज कल्याण अधिकारी चौगुले यांची यावेळी उपस्थिती होती. राजे उमाजी नाईक यांनी क्रांतिकारकांच्या भूमिकेतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी देखील ठरवून दिलेल्या वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे कांबळे यांनी नमूद केले. 
सकाळी 9:45  ही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. त्या अनुषंगाने दररोज सकाळी 10:00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये राष्ट्रगीताने जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात व्हावी. यासंबंधी अंमलबजावणी व्हावी याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाला आदेश द्यावेत अशा सूचना अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी यावेळी दिले.
    राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये आयोजित कार्यक्रमाला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सलगरा सह परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा

सलगरा,दि.७(प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) परिसरातील किलज, गंधोरा, वडगाव (देव) आणि वाणेगाव आदी गावांमध्ये दि.६ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेती व्यवसायात वर्षभर मदत करणाऱ्या सर्जा राजाच्या सन्मानाचा दिवस म्हणून बैलपोळा साजरा करतात. शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे.

बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) दिले जाते. बैलाला अंघोळ घातली जाते, बैलाचे खांदे हळद, तेल, तूपाने शेखतात, त्याला झूल घातली जाते, त्यांच्या अंगावर विविध रंगाचे ठिपके उठवले जातात, नक्षीकाम केलेली झूल, कपाळावर बाशींग आणि गळ्यात कवड्याच्या-घुंगराच्या माळा घातल्या जातात. नवीन वेसण, कासरा घातला जातो, पुरणपोळीचा व सुग्रास अन्नाचा नैव्येद्य दाखवला जातो. बैल पोळ्याच्या सणाला पंचक्रोशीतील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळाला.

०८ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  ०८ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १३  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  ०८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

२) दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील ९ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी ८ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे

जनतेच्या हिताचा विचार करून कर्तव्यदक्ष नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी भर पावसात कर्तव्य बजाविले

 

उस्मानाबाद :- प्रभाग क्रमांक १४ मधील अजिंठा नगर व लहुजी चौक येथील रस्ता अतिशय खराब झाल्याने

नागरिकांना जाणे येणे करतांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते,या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत येथील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना वेळोवेळी कळविले होते,दि.०२/०९/२०२१ रोजी  निवेदनही देण्यात आले होते व दि.०९/०९/२०२१ रोजी नगर परिषद कार्यालयातील पोर्च मध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे व स्थानिक रहिवाशी उपोषणाला बसणार असेही कळविले होते,दि.०३/०९/२०२१ रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती,शहरातील भुयारी मार्ग व रस्ते याबाबत नगराध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली व तात्पुरते स्वरुपात नाली बांधकाम करुन रस्ता सपाटीकरण करून मुरुम टाकुन रोलर फिरविण्याचे सांगितले,परंतु सततधारेच्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय जास्तच झाली,गरज राहिल वास्तवतेची,या रस्त्याची दुरावस्था पाहुन कर्तव्यदक्ष नगर सेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ बनसोडे यांनी तातडीने नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून स्वखर्चाने लहुजी चौक येथील रस्त्यावरील जेसिबीने  चिखल,गाळ काढुन त्यावरती दगडाची खडी टाकुन रोलर फिरवुन नागरिकांची होणारी गैरसोय दुर केली,कर्तव्यदक्ष नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी त्यांच्या प्रभागात विकासकामे मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन महत्त्वाचे म्हणजे बौध्द श्मशान भुमीतील वर्षानुवर्षे रेंगाळलेली विकास कामे ही पुर्ण केली आहेत,आज दि.०७/०९/२०२१ रोजी भर पावसात चिंब भिजत त्यांनी नागरिकांची गैरसोय दुर केली असुन सोय केल्या बद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत,यात प्रामुख्याने नगरसेवक सिध्दार्थ  बनसोडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगुलभाऊ बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,बाळु कांबळे, सलीमभाई शेख,सुरज वाघमारे, नितिन क्षिरसागर,आतिश पेठे,बालाजी क्षिरसागर,जलील कुरेशी, मस्तान कुरेशी,नितीन पेठे,किरण गाडे,आदेश बनसोडे,बाबा पठाण,बाळु,चांदणे अन्य इतर नागरिक उपस्थित होते.

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद,दि.07(जिमाका):-  आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाई‍‍‍क यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी हणुमंत वडगावे, नायब तहसीलदार कुलर्णी कुलदीप, सामान्य प्रशासनच्या नायब तहसीलदार श्रीमती शिल्पा कदम, महसूलच्या नायब तहसीलदार श्रीमती अर्चना मैंदर्गे, अव्वल कारकून एम.एल.मैंदपवाड, श्रीमती एस.एस. माजलगावकर, नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्हयातील या केंद्रांवर लस शिल्लक आपला स्लॉट बुक करा

 उस्मानाबाद जिल्ह्यातील काही केंद्रांवर अजूनही शिल्लक आहे. ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनी आपला असल ऑफ बुक करून घ्यावा. 

रात्री १०.४५ पर्यंत ०७ सप्टेंबर रोजी बुक करण्यासाठी शिल्लक असलेली लस

०७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  ०७ सप्टेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशिल्ड  लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.तसेच ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने कोविशिल्ड  लसीचा पहिला आणि दूसरा  डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशिल्ड  लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड  लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०७ सप्टेंबर २०२१ रोजी ७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.