Home Blog Page 165

टपाल कर्मचारी देखील संपावर, आज आणि उद्या दोन दिवस संप


ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप,पोस्टमन व एम.टी.एस.ग्रामीण डाक सेवक या संघटनेच्या वतीने पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर दोन दिवसीय देशव्यापी संप लाक्षणिक सुरू आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व कामगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी हा देश देशव्यापी दोन दिवसांचा लाक्षणिक संप आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करा व जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करा. खाजगीकरण,फ्रॅंचाईजी, आऊटलेट,डाक मित्र योजना मागे घ्या. इतर केंद्रीय खात्यांप्रमाणे टपाल खाते ही पाच दिवसांचा आठवडा लागू करा. टपाल खात्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरा. युनियन पदाधिकारी यांना निर्मन लावणारे नियम १९६४-१५(१) ३ चे आदेश मागे घ्या.फिनॅकल सर्वरची क्षमता वाढवा, नेटवर्कसाठी एनएसपी-१ व एनएसपी-२ नेटवर्क स्पिड सुनिश्चित करा. ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घ्या कमलेशचंद्रा समितीच्या सकारण सकारात्मक शिफारशी त्वरीत लागू करा. पार्सल साठी असणारे नोड डिलिव्हरी सेंटर स्पीड पोस्टसाठी असणारे सेन्ट्रल डिलिव्हरी सेंटर बंद करा. कोविड १९ च्या सर्व समस्येचे निराकरण करा कोविड मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा लाखाचे अर्थसाह्य द्या व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या.एचएसजी इईच्या रिक्त पदावर नियुक्तीसाठी असलेली कठोर निर्बंध शिथिल करून त्या रिक्त जागा भरा. १८ महिन्यांचा थकित महागाई भत्ता त्वरित अदा करा.आयपीपीबी खाती उघडणे बाबत, ए झेड यावर करणे, आधार कार्ड सेवा, बिझनेस डेव्हलपमेंट च्या नावाखाली अवैज्ञानिक लक्ष्य साध्य करण्यासाठी होणारी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा. सर्वच स्तरावर नियमीतपणे व सर्व प्रकारच्या कामगार प्रतिनिधीच्या बैठका घ्या. टपाल खात्याचे विकेंद्रीकरण थांबवा तसेच पार्सल हब चालवण्यासाठी खाजगी व्यक्तीची करण्यात येणारी नियुक्ती थांबवा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद भेटला आहे त्यामुळे पोस्ट सेवा पूर्ण पणे ठप्प झाली आहे.यावेळी अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग 3 चे सचिव कॉ.महेश वाघमोडे कॉ.बाळासाहेब कदम कॉ. भीमराव पाटील कॉ. सुरेश जगदाळे कॉ. दिनेश मेटे कॉ. लक्ष्मण टापरे कॉ. राशनकर कॉ. विष्णुदेवा सुरवसे तसेच एनऐपीईचे संघटनेचेनेचे नेते लक्ष्मण मिसाळ फुटाणे. पोस्टमन संघटना सचिव कॉ.रझाक शेख कॉ. कुबेर बोरकर एफएनपीओ पोस्टमन संघटना सचिव कॉ. खरजुले तसेच ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सचिव कॉ.बाळासाहेब बुबने कॉ.अविनाश समुद्रे ,बाळासाहेब सोनवणे कॉ. बाळासाहेब बुबने कॉ. पी डी मते कॉ. महामुद पठाण आदी कर्मचारी या संपात सहभागी होते.

वारकरी अपघातातील मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणार २ लाख रुपये

 आ. कैलास पाटील यांचा पाठपुरावा



उस्मानाबाद –

कदमवाडी ता.तुळजापुर येथील वारकरी हे पंढरपुर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते. वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यु झाला होता त्या चार मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये असे चार जणांचे एकूण ८ लाख रुपये मदत मिळणार आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

अहवालातील यादीनुसार मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांस आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करुन मंजूर अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. तसेच या घटनेतील मृत व्यक्तींचे प्रकरणी पोलीस पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र व इत्यादी कागदपत्र अहवालासह सादर करण्यात यावीत. त्याच प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर प्रयोजनाकरीता वापरण्यात आल्याबद्दल विनियोगाचे प्रमाणपत्र देखील सादर करावे व अर्थसहाय्य प्राप्त झाल्याबद्दल महसुल मुद्रांकित पावती या सचिवालयास सत्वर पाठवावी. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


दैनिक जनमत २८ मार्च E paper २०२२

जागतिक जल दिनानिमित्त आरओ प्लांटचे उद्घाटन




सलगरा – प्रतिक भोसले


तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे जागतिक जलदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पिरॅमल फाउंडेशन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, इनेबल हेल्थ सोसायटी (दिल्ली) यांच्या सी.एस.आर. फंडातून मंजूर शुध्द पिण्याचे पाणी प्रकल्प,२ लाख लिटर रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोरवेल रिचार्ज, आणि शोष खड्डे आदी कामे सलगरा येथे करण्यात येणार आहेत म्हणून त्याच पार्श्वभूमीवर आज दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त सलगरा येथे आरओ प्लांटचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मध्ये ३० पैसे प्रति लिटर या दराने स्कॅन केलेल्या कार्डद्वारे २० लीटर शुद्ध पाणी दिले जाणार असल्याची माहिती पिरॅमल फाउंडेशनचे मॅनेजर दिपक कळंदकर यांनी दिली. 


 या वेळी पिरॅमल फाउंडेशनचे मॅनेजर दिपक कळंदकर, प्रशांत पाटील, नितीन शिंदे, सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, जि.प. शाळेचे सुरेश वाघमोडे, व्हि.टी. कांबळे, बी.एच. सनगुंदे, श्रीमती. पवार व्हि.बी. प्रशांत मुळे, जीवन लोमटे, अनिल लोमटे, ज्ञानेश्वर बोधणे, गोरख मुळे, अनिल मुळे, नवनाथ बामणकर, राहुल बोधणे, दिलीप  लोमटे, कुमार लोमटे, दिलीप मुळे, दस्तगीर मुलाणी यांच्या सह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

किलज येथे अखंड शिवनाम सप्ताहाला प्रारंभ


सलगरा, दि.२१(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.२१ मार्च पासून अखंड शिवनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या १९ वर्षापासून सर्वाना समवेत घेऊन भक्तिमय वातावरणात यंदा सुद्धा हा सप्ताह सोहळा पार पडणार असून यामध्ये आज किलज येथील महादेव मंदिरात उपस्थित भजनी मंडळ, तसेच गावातील ग्रामस्थ व विविध पदांचे पदाधिकारी यांच्या समवेत महापूजा व परमरहस्य पारायण ग्रंथपूजन,विना,टाळ,मृदंग पूजन करीत विविध भक्तिमय भजन गीते गात या सप्ताह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तसेच परमरहस्य पारायण ग्रंथ वाचन करीत सुरुवात करण्यात आली. या सप्ताह सोहळ्या दरम्यान आठ दिवसांमध्ये दररोज परमरहस्य ग्रंथ वाचन,गाथा भजन,प्रवचन,शिवपाठ,विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, यांसह आनंदीमय,भक्तिमय वातावरणात हा सोहळा रंगणार आहे.सप्ताह सोहळा दरम्यान सर्व कीर्तने ही अभंग अमृत या यूट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार आहेत, या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सुद्धा उपस्थिती दर्शवत असतात. ग्रंथ वाचनाकरिता यंदा सुद्धा लहानग्या मुलांसमवेत महिलांचा देखील समावेश आहे. आठ दिवस आता किलज मध्ये भक्तिमय वातावरण असणार आहे, या सप्ताहाची सांगता ही महाप्रसादाने किलज येथील महादेव मंदिरात होणार आहे.