शेत रस्त्या संदर्भात न्याय मिळत नसल्याने कंडारी येथिल शेतकऱ्याचा प्रजासत्ताकदिनी तहसिल कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखुन शेतकरी सुरवसे यास रोखले पुढील अनर्थ टळला
परंडा (भजनदास गुडे दि २६ जानेवारी ) शेतरस्त्या वरील अतिक्रमन काढण्याच्या मागणीची प्रशासन दखल घेत नसल्याने परंडा तालूक्यातील कंडारी येथिल शेतकरी संजय सुरवसे यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी परंडा तहसिल कार्यालयाच्या परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून न्याय मिळत नसले मुळे संतप्त झालेला शेतकरी संजय सुरवसे यानी तहसिल कार्यालयाच्या परिसरात विषारी औषध पिण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी सुरवसे यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. कंडारी येथील शेतकरी संजय विठ्ठल सुरवसे यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार यांना निवेदन देऊन कंडरी येथिल जमीन सर्वे नंबर ३०८,३०९,१५ आणी १८ मधील बांध रस्त्यावर रामा सुरवसे कमलबाई सुरवसे, यांनी अंब्याची झाडे लावली आहेत तर संतोष सुरवसे यांनी शेततळे खोदून अतिक्रमन केले असल्याची तक्रार दाखल केली होती .पालक मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या जनता दरबारात तक्रार दाखल करून रस्ता खुला करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्याय मिळत नसल्यामुळे संजय सुरवसे यांनी टोकाचे पाऊल उचलून तहसिल कार्यालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी संजय सुरवसे यांचे बंधू गणेश सुरवसे यांनी रस्त्यावरील अतिक्रमन काडून रस्ता खुला करावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
वाशी(शहाजी चेडे) – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वाशी शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा दिनांक 20/01/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. रफिक अन्सारी (सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग उस्मानाबाद) व तालुका वैद्यकीय आधिकारी डाॅ.गोवर्धन महेंद्रकर उपस्थित होते. तसेच वाशी तालुका डाॅक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ.अक्षय इंगोले, सल्लागार डाॅ.सचिन पत्की आणि तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डाॅ. कवडे दत्तात्रय, डाॅ. थोबडे सुरेंद्र, डाॅ.काझी एन.एफ, डाॅ. खोसे, डाॅ. पाटील, डाॅ. करडे.टी.एन, डाॅ. संजीव गरड, डाॅ. अमर तानवडे उपस्थित होते.
यात कुष्ठरोग विरोधात ही अंतिम लढाई या शिर्षकाखाली बहुमूल्य असे मार्गदर्शन डाॅ. अन्सारी यांनी केले. तसेच आपल्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कुष्ठरोग चा वाढता आलेख कसा रोखणार याविषयी चर्चा आणि उपाय सांगितले. गत वर्षी जवळपास 600 च्या वर नविन कुष्ठरोग चे रूग्ण संपूर्ण जिल्ह्य़ातून आढळून आले होते. हीच संख्या आता शुन्या वर आणाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच हा आजार आता पूर्ण पणे भारतातून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.यात रूग्णांना पूर्ण पणे औषधोपचार मोफत असून तात्काळ मदत आणि मार्गदर्शन मिळेल असे आश्वासन ही दिलेले आहे. जर आपल्या आसपास असे रूग्ण आढळून येत असतील तर निसंकोच पणे आम्हास किंवा कुठल्याही जवळच्याच डाॅक्टर्सना कळवावे जेणेकरून रूग्णास त्वरीत उपचार करुन पुढील हानी टाळता येईल… “लवकर उपचार लवकर आराम.”हाच मुख्य उद्देश आहे.
जिल्हाधिकारी यांनी खासापुरी, स्त्री रुग्णालय व उप जिल्हा रुग्णालयाच्या नियोजीत जागेची केली पाहणी
खासापूरी येथील स्थलांतरीत कुटूंबाची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
स्थलांतरीत कुटूबांच्या जागा वाटपाचा प्रश्न काही दिवसातच मार्गी लावणार जिल्हाधिकारी यांची माहिती
परंडा ( दि २१ – भजनदास गुडे )सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने परंडा तालूक्यातील खासापुरी गाव खाली करण्यात आले,आणी ३०० कुटूंबाचे संसार उघड्यावर पडले.
उघडयावर पडलेल्या बेघर स्थलांतरीत कुटूंबाच्या मदतीला आरोग्यमंत्री तथा पालक मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत धाऊन आले त्यांनी स्वखर्चाने जमीन खरेदी करून स्थलांतरीत कुटूबांना घरासाठी जागा देण्याची घोषणा केली.या मुळे बेघर स्थलांतरीत खुल्या वर्गातील कुटूंबांना दिलासा मिळाला आहे.
खासापुरी येथिल स्थलांतरीत कुटूंबाची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दि २१ रोजी सकाळी भेट घेऊन जागेची पाहणी केली व काही दिवसातच स्थलांतरीत कुटूबांना जागेचे वाटप करण्या येणार असल्याची माहीती सांगीतली.
१०९ दलित कुंटूबासाठी प्रशासणाकडून दिनदयाल उपाध्ये योजनेतून घर बांधकामा साठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तर रमाई आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे.
तसेच खुल्या वर्गातील स्थलांतरीत कुटूंबांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून १२९ घरकुले तर एन टी वर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून २१ कुटूंबाना घरकुले देण्यात येणार आहेत यासाठी घरकुल देण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी परंडा शहरात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व १०० खाटांचे उप जिल्हा वर्धीणी रुग्णालयास मान्यता दिली आहे.
मंगळवार पेठ येथील जुन्या नागरी दवाखन्याच्या जाग्यावर १०० खाटांचे रूग्णालय तर एस टी डोपो समोरील खुल्या जागेत १०० खाटांचे स्त्री रूग्णालय उभारण्यात येणार आहे.या संभव्य जागेची जिल्हाधिकारी यांनी पाहाणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता,उपविभागीय अधिकारी रोहिनी नऱ्हे, तहसिलदार रेणूकादास देवणीकर,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठाण, नायब तहसिलदार सुजित वाबळे, एसटी अगार प्रमुख राहुल वाघमोडे,बळीराजा शेतकरी संघटणेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सौदागर टोंपे, मंडळ अधिकारी दुरगाप्पा पवार, तलाठी चंद्रकांत कसाब, खासापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरूणा चव्हाण,शंकर चव्हाण,दिपक भापकर,माजी सरपंच नितीन घाडगे,अनिल घाडगे,बाळासाहेब कोळेकर, यूवराज कसबे,विजय शिंदे, विजय देशमुख यांची उपस्थिती होती .







































































