
भूम : च्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा १” अंतर्गत भुम तालुक्यात मंडळनिहाय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ही शिबिरे पार पडणार असून नागरिकांच्या महसूल विषयक दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निवारण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – ७ मार्च २०२६ रोजी माणकेश्वर, १४ मार्च २०२६ रोजी पाथरूड, १० एप्रिल २०२६ रोजी वाळवड, १७ एप्रिल २०२६ रोजी आंबी, २४ एप्रिल २०२६ रोजी ईट, ८ मे २०२६ रोजी भुम व १५ मे २०२६ रोजी आष्टा येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिरांमध्ये ७/१२ उताऱ्यावरील किरकोळ दुरुस्ती अर्ज स्वीकारणे व तत्काळ नोंदी करणे, डिजिटल ७/१२ संदर्भात मार्गदर्शन, फेरफार प्रकरणांचा निकाल, ‘जिवंत ७/१२’ टप्पा-१ अंतर्गत वारस नोंदी घेणे व निर्णय करणे, तसेच शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याबाबत मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, जात, नॉनक्रिमिलिअर आदी प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारून शिबिरातच वितरण केले जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, पोस्ट ऑफिस विमा योजना याबाबत मार्गदर्शन तसेच ई-मोजणीसह विविध सेवा उपलब्ध राहणार आहेत.
तहसीलदार भुम श्री. जयवंत पाटील यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
- एमपीएससी विद्यार्थी स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात