भूम( वसिम काजळेकर ) :- मराठवाड्याचे महाबळेश्वर (हाडोंग्री ) येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त हाडोंग्री येथील इको व्हिलेज (ध्यान केंद्र ) येथे रोप वाटप व वार्षिक वृक्ष संवर्धन बक्षीस वितरण सोहळ्याच आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटिल (हाडोंग्रीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य बाळासाहेब पाटिल(हाडोंग्रीकर )यांनी आयोजन केल होत. या मध्ये उदघाटक म्हनून भूम उवविभागीय आधिकारी रोहिणी नऱ्हे तर अध्यक्ष म्हनून भूम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत ढवळशंक, प्रमुख पाहुणे म्हनून भूम न.प.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये मान्यवरांकडून जमिनीचे वाळवंटीकरन,पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती अश्या शेती निघडीत विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजीवनी पाटिल, अमेय पाटिल, गावच्या तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य परीसरातील शेतकरी व सर्वच स्थरातील नागरिक उपस्थित होते.
पर्यावरण दिनानिमित्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर वाढवून पालेभाज्याउगवाव्यात जेने करून नागरिकांचे रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि सोबतच आपल्या शेतीचे भविष्यात होणारे वाळवंटिकरण थांबेल.
आदित्य पाटिल (हाडोंग्रीकर )अध्यक्ष इको विलेज, ध्यान केंद्र.
माळीन गावासारखी दुर्दैवी भूसखलनाची घटना देशी प्रकारच्या वृक्षांची लागवड करुन आनी जोपासून होनारी घटना टाळू शकतोत.आनी पर्जन्यमान देखील वाढेल.
रोहिणी नऱ्हे उपविभागीय अधिकारी भूम