उस्मानाबाद, दि. 6 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील बेंबळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समिती व जिल्हा बुध्दीबळ संघाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेस राज्यातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत लातूर, उमरगा, पंढरपूर येथील स्पर्धकांनी विजयश्री मिळवला असून आयोजकांच्यावतीने स्पर्धकांना विशेष पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
शनिवारी श्रीखंडोबा मंदिर परिसरात पार पडलेल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सामुदायिक अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे, हरिश्चंद्र गावडे, डॉ. अविनाश गावडे, नवनाथ कांबळे, जयंती समितीचे अध्यक्ष संतोष लगस, दिनेश हेड्डा, राजाभाऊ गावडे आदी उपस्थित होते. त्यानंतर जलद बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या. खुल्या गटातून संदेश बजाज (लातूर) याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना हरिश्चंद्र गावडे यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे पाच हजार एक रूपयांचे रोख बक्षीस व धनंजय तानले यांच्यावतीने चषक देण्यात आले. 21 वर्षाखालील खुल्या गटातून लातूर येथील प्रथमेश देशमुख याने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यास प्रशांत दाणे यांच्यावतीने एक हजार एक रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट महिला स्पर्धक म्हणून सौंदर्या डिगोळे, उत्कृष्ट ज्येष्ठ स्पर्धक म्हणून गोकुळ गोरे तर उत्कृष्ट उस्मानाबाद स्पर्धक म्हणून अभिजीत गोरे यांना प्रकाश शेळके यांच्यावतीने सातशे रूपयांची रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.
खुल्या गटातील द्वितीय क्रमांकासाठी शिवसेना विभागप्रमुख दिनेश हेड्डा यांच्यावतीने चार हजार एक रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी माजी सरपंच बाळासाहेब कणसे यांनी तीन हजार एक, चतुर्थ क्रमांकासाठी नामानंद फूड्सच्यावतीने दोन हजार तसेच पाचव्या ते अकराव्या क्रमांकापर्यंतच्या स्पर्धकांसाठी अनुक्रमे श्रीधर गावडे, ज. सद्दाम रोडे, रामभाऊ मोटे, अमर होळकर, अर्जून सोनटक्के, यशवंत डोलारे, परमेश्वर कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या रकमेची बक्षीसे ठेवली होती. 21 वर्षाखालील विजेत्या द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकासाठी अमोल माने, तृतीयासाठी प्रवीण तानले, चतुर्थसाठी सुरज वाघे यांच्यावतीने वेगवेगळ्या रकमेची बक्षीसे विजेत्या स्पर्धकांना देण्यात आली. स्पर्धेत परिक्षक म्हणून डॉ. अमोल गावडे व सोलापूर येथील युवराज पोगुल यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना हरिश्चंद्र गावडे, येडशी येथील ज्येष्ठ नागरिक जयप्रकाश तोडकरी, स्पर्धेचे मार्गदर्शक डॉ. अविनाश गावडे, डॉ. अमोल गावडे, प्रकाश शेळके, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष लगस यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.
राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेतील विजेते
खुल्या गटात प्रथम ः संदेश बजाज (लातूर), द्वितीय ः धनंजय यसगुडे (बीड), तृतीय ः किरण अंकुशराव (सोलापूर), चतुर्थ ः ज्योतीराज तांदळे (लातूर), उत्तेजनार्थ ः चंदशेखार बसरगीकर, योगेश राठोड, आदित्य गुंडला, अनिल क्षीरसागर, चंद्रकांत पवार, बाबा बादुले, शंकर साळुंखे. 21 वर्षाखालील गट ः प्रथम ः प्रथमेश देशमुख, द्वितीय ः यशराज साठे, तृतीय सर्वेश सोले, चतुर्थ ः अथर्व गावडे, पाचवे ः प्रवीण देशमुख., विशेष बक्षीस ः उत्कृष्ट महिला स्पर्धक सौंदर्या डिगोळे, उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक स्पर्धक गोकुळ गोरे, उत्कृष्ट उस्मानाबाद स्पर्धक अभिजीत गोरे.