शिवराज्याभिषेक दिनी 51 झाडांचे वृक्षारोपण

0
60

 


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीचा उपक्रम

उस्मानाबाद : जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अहिल्यादेवींच्या 297व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीमार्फत अहिल्यादेवी चौकात 51 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमात मागील पाच सहा वर्षांत पर्यावरण संरक्षणासाठी शेकडो झाडांचे वृक्षारोपण आणि संगोपन केलेले शरदचंद्रजी पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके आणि कै.चंदरराव दळवी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संभाजी दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन दोघांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने वड, चिंच, गुलमोहर, चिकू, पिंपळ, कडुलिंब या देशी झाडांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उर्वरित झाडे लावण्यात आली. याप्रसंगी शेखर घोडके यांनी सर्व झाडांना संरक्षणासाठी लोखंडी जाळी देण्याचे मान्य केले. यावेळी बोलताना प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की, वृक्षारोपण करण्यात येत असलेल्या या नियोजित जागेत लवकरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आम्हा सर्वांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, धीरज मोटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौरे, मुकुंद घुले, डाॅ.संजय सोनटक्के, डाॅ.संतोष पाटील, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, संतोष वतने, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, संदीप वाघमोडे, तानाजी सलगर, विनायक नलावडे, राहुल गवळी, अजय कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सुरेश शिंदे, सचिन चौरे, गणेश सोनटक्के, रवी देवकते, किशोर डुकरे, नितीन डुकरे, विकी अंधारे, प्रसाद तेरकर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here