उस्मानाबाद – सहकार, उद्योग,व्यापार व सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक परिवार, उस्मानाबाद या संस्थेस केंद्रीय सहकारीता मंत्रालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून “लोटस मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, उस्मानाबाद.” या नावाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. नुकतेच या बाबद चे पत्र संस्थेस प्राप्त झाले आहे.
या वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून हॉस्पिटल उभा करणे तसेच समाजाच्या आवश्यकतेनुसार, समाजातील सर्व घटकांना परवडेल या दृष्टीने वैद्यकीय सेवा पुरवणे, रुग्णांवर आर्थिक बोजा न पडता त्याला योग्य तो उपचार मिळेल या साठी या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल.
या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरात आगामी कालखंडात अद्ययावत असे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभा करण्याचा मानस असल्याचे श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ता कुलकर्णी यांनी सांगीतले.
श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्वच उपक्रमांवर समाजाचा विश्वास आहे. त्या विश्वासास पात्र राहूनच वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले जाईल असाही विश्वास दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.