उस्मानाबाद : झाडे गल्ली, उस्मानाबाद येथील श्रीमती रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्याने त्यांच्या वयोवृध्द सासू या घरी एकट्या होत्या. रेखा यांची सासू दि. 19 जून 2022 रोजी 17.00 ते 18.00 वा. दरम्यान घरास कडी लावून बाहेर गेल्या असता त्यांच्या घराची कडी अज्ञात व्यक्तीने उघडून घरातील कपाटातले 370 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले होते. यावरुन रेखा पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 190/2022 हा भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत दि. 20 जून रोजी नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार यांनी घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. सदरचा गुन्हा करणारे आरोपी त्या फुटेजमध्ये घटनास्थळावरुन जा- ये करत अससताना दिसुन आले. त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी- 1) विक्रांत जगन्नाथ सवाईराम 2) सरोजा विक्रांत सवाईराम या दोघा पती- पत्नींस मुंबई येथील रबाळे रेल्वे स्थानकावरुन आज दि. 01 जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसुन व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली देउन सदर गुन्ह्यातील सुवर्ण दागिने हे त्यांचे मुळ गाव- शिराळा, ता. वाळवा, जि. सांगली येथील आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगीतले. यावर पथकाने नमूद गुन्ह्यातील चोरीच्या सुवर्ण दागिन्यांपैकी 310 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आरोपीतांच्या घरातून हस्तगत केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- रवी आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.