येरमाळा – वडगाव शिवारातील रावसाहेब नवले यांच्या गट क्र. 95 मधील शेत विहीरीतील दोन पानबुडी पंपासह त्याचे वायर व शेतातील तुषारसिंचन संचातील 16 नोजल असे साहित्य दि. 27 मार्च रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावर रावसाहेब नवले यांनी येरमाळा पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 63/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- दिनकर गोरे, पोउपनि- नाईकवाडे, सपोफौ- मुंडे, कोळी, पोहेकॉ- राठोड, पोना- शिंदे, डोके यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथील रमेश उर्फ बबलू बाबूशा काळे यास उपरोक्त गुन्ह्यातील चोरीच्या मालापैकी तुषारसिंचन संचाचे 9 नोजलसह दि. 29 जून रोजी लक्ष्मी पारधी पिढी येथून ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा उर्वरीत तपास चालू आहे.