मद्यसाठ्यासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद – जिल्हयात अवैध मद्य / मद्यार्क, मळी आयात, निर्यात, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करुन गुन्हे नोंदविण्याची मोहिम चालु आहे. त्याअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून ६,११,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश उत्सावाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी सामुहीक धाड सत्र आयोजीत करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयातील अधिकारी सतर्क राहुन सदर मोहिमेत भरीव कामगीरी करीत आहेत. यातच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 09 सप्टेंबर रोजी दिपकनगर तांडा ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद येथील सुनिल नारायण चव्हाण वय 27 वर्षे हा उस्मानाबाद- बार्शीरोडवर कौडगांव ता. जि. उस्मानाबाद येथे त्यांचे फायदेसाठी अवैध रित्या गोवाराज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असल्याची खात्रीलायक बातमी मीळाली नुसार टि.एस. कदम. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक उस्मानाबाद / लातुर एस.के.शेटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद आर. आर. गिरी, व्ही. आय. चव्हाण, जवान ए. आर. शेख, जवान-नि-वाहनचालक यांचेसह गुप्त माहिती मिळालेल्या उस्मानाबाद- बार्शीरोडवर कौडगांव ता. जि. उस्मानाबाद येथे प्रो. गुन्हेकामी रात्री १ वाजता छापा मारला असता सदर आरोपी हा गुन्हयाच्या ठिकाणावरुन फरार झाला असुन सदर ठिकाणावरुन प्रो. गुन्हयाचा नमुद एकुण रु.6,11,280/- रुपये किंमतीचा गोवाराज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची मद्याचा मुद्देमाल व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील आरोपी व इतर यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65-(a)(e), 81, 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा तो कोणाला विक्री करणार होतो याचा तपास केला जात आहे.