तासगाव अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव
बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली
तासगाव (प्रतिनिधी)
तासगाव नगरीतील सहकाराचा मानबिंदू ठरलेल्या तसेच शून्य टक्के एनपीए व सतत ऑडीट वर्ग ‘अ’ असणाऱ्या सर्व सभासद व ठेवीदार यांच्या प्रगतीमध्ये साथ देणारी दि.तासगाव अर्बन बँक सामाजिक बांधिलकी जपत बँकेच्या संचालक मंडळाकडून विविध उपक्रम राबविणेत येतात. याच सामाजिक बांधिलकीचा विचार करून बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या संचालक मंडळाचे वतीने विधवा प्रथा बंदी उपक्रमास अनुसरून विधवा महिला ठेवीदारांना जेष्ट नागरिकाना ठेवीवर देण्यात येणाऱ्या जादा व्याज दराच्या सुविधेप्रमाणे अर्धा टक्का जादा व्याज दर देणेचा ठराव बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. या वेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे होते.
प्रथम बँकेचे उपाध्यक्ष श्री कुमार शेटे यांनी उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनींचे स्वागत केले. तद् नंतर बँकेचे अध्यक्ष श्री महेश्वर हिंगमिरे यांनी बँकेच्या सांपत्तिक स्थितची माहिती देताना सांगितले की, गेल्या सहा वर्षात बँकेच्या व्यवसायामध्ये दुप्पटीपेक्षा जास्त रक्कमेने वाढ झालेली आहे. बँकेचे वसूल भाग भांडवल रु. २७५.१६ लाख इतके आहे. पुढील काळात बँकेच्या भागभांडवलामध्ये वाढ करणेचा मानस असून त्यासाठी सर्व सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रु.५०००/- पूर्ण करून घ्यावेत. बँकेचे राखीव निधी २१११.९९ लाख, ठेवी रु.२१२६०.७५ लाख, कर्जे रु. १४४८१.१९ लाख तर बँकेची एकून गुंतवणूक रु. ८०६८.३४ लाख इतकी आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये बँकेस रु. २७५.७० लाख इतका नफा झालेला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अर्धे वर्ष लॉकडाऊन मध्ये जावूनही बँकेने आपली टक्के एन.पी.ए. ची परंपरा कायम ठेवलेली आहे. पुढील काळामध्ये बँकेच्या शाखा विस्तार करणेचा मानस असून नवीन पाच शाखा उघडण्याचे आमचे संचालक मंडळाचा मनोदय आहे. सभासदांना १५ टक्के डिव्हीडंड ची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच सभासदांच्या खात्यामध्ये डिव्हीडंड ची
रक्कम जमा करणेत येईल. दि.३१/०३/२०२३ पर्यंत बँकेच्या ऐकून ठेवी रु.३००,०० कोटी तर कर्जे रु.२१०.००
कोटी करणेचा बँकेचा मानस असून त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे व आपल्या बँकेच्या ठेवीमध्ये वाढ करावी.
तदनंतर बँकेचे सी.ई.ओ. श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी सभेपुढील विषय मांडले व त्यास
सभासदांनी एकमताने सूचक व अनुमोदन करून सर्व विषयास मंजुरी दिली. यावेळी बँकेचे जेष्ट सभासदांचा सत्कार मान्यवर सभासदांच्या हस्ते करण्यात आला तसेच १० वी च्या परीक्षेत तासगाव केंद्रामध्ये पहिल्या आलेल्या २ गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कारही यावेळी करण्यात आला.
उपस्थित सभासदांचे स्वागत बँकेचे उपाध्यक्ष कुमार शेटे यांनी केले तर सभेचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन बँकेचे संचालक श्री विनय शेटे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक राजेंद्र माळी यांनी मांडला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. यावेळी सभासदांनी शाखा जत साठी जागा खरेदी करणे तसेच इमारत बांधणे, शाखा कुपवाड साठी बँकेचे अद्ययावत डेटा सेंटर उभारणे व शाखेसाठी इमारत बांधणे साठी तसेच बँकेच्या शाखांसाठी आवश्यक त्या ठिकाणी जागा खरेदी करणे इमारत बांधणे साठी सभासदानी एकमताने मंजुरी दिली.
बँकेने जेष्ट सभासदांचा सत्कार करण्याचे वय ७५ वरून ७१ केले बद्दल कमलाकर कुत्ते यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून श्री अनिल पिसे तासगाव यांचे गॅस सिलिंडर स्फोटांमध्ये घराचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले त्याना बँकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी विविध संस्थामध्ये पदाधिकारी म्हणून निवड झाले बद्दल श्री रवींद्र देवधर, सिदगोंड पाटील, मिलिंद सुतार यांचा सत्कार करणेत आला.
तसेच मिटिंग साठी हॉल उपलब्ध करून दिले बद्दल शाबाद म्हेतर यांचा सत्कार करणेत आला. यावेळी बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, व्हा. चेअरमन कुमार शेटे, संचालक श्री. सदाशिव उर्फ बंडोपंत शेटे, अरुण पाटील, श्री विनय शेटे, अनिल कुत्ते, श्री उदय वाटकर, धोंडीरामबापू सावंत, रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, तज्ञ संचालक सिए.. उदय डफळापूरकर, सिए. अमित शिंत्रे, संचालिका सौ. सविता पैलवान, सौ. उमा हिंगमिरे, सीईओ श्रीकांत कुलकर्णी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य रवींद्र देवधर, अवधुत गडकर, प्रदीप पवार बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, पत्रकार तथा स्वामी रामानंद भारती सह. सुतगिरणीचे संचालक राहुल कांबळे, द्राक्ष बागातदार उदय अण्णा शेटे, माजी नगरसेवक सोमनाथ मिठारी, सूर्यकांत पेटकर, सुनील चव्हाण,विलास शिंदे सर, रशिदभाई मुल्ला,माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील,माजी नगरसेवक गजानन खुजट अँड. आर. एम. टिंगरे.जगदीश कालगावकर, सुनील जोशी कवठेमहांकाळचे नगरसेवक अजित माने, रणजीत घाटगे, जत येथील प्रसिद्ध व्यापारी शशिकांत शेठ काळगी, मनोज जेऊर, श्री दस्तगीर नदाफ इत्यादी उपस्थित होते.