नवी दिल्ली – देशातील निवडणूक व्यवस्थेला पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांची (RUPPs) नावे नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळली आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29A मधील अटींचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
आयोगाची तपासणी व कारवाई
जून 2025 मध्ये आयोगाने 345 RUPPs ची पडताळणी करण्याचे निर्देश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. या पक्षांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या व वैयक्तिक सुनावणीची संधी देण्यात आली. चौकशीनंतर, 334 पक्षांनी नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले. उर्वरित प्रकरणे पुन्हा पडताळणीसाठी पाठवली आहेत.
आयोगाच्या निर्णयानंतर, देशातील RUPPs ची संख्या 2,520 वर आली आहे. वगळण्यात आलेले पक्ष आता कलम 29B, 29C, प्राप्तीकर कायदा, 1961 आणि निवडणूक चिन्हे (आरक्षण व वाटप) आदेश, 1968 अंतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र राहणार नाहीत. तथापि, आदेशावर 30 दिवसांच्या आत अपील करता येणार आहे.
मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची यादी
- आम आदमी पार्टी
- बहुजन समाज पार्टी
- भारतीय जनता पार्टी
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
- इंडियन नॅशनल काँग्रेस
- नॅशनल पीपल्स पार्टी
मान्यताप्राप्त राज्य पक्षांची यादी
- एजेएसयू पार्टी
- ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
- ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस
- ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
- ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
- अपना दल (सोनेलाल)
- आसाम गण परिषद
- भारत आदिवासी पार्टी
- भारत राष्ट्र समिती
- बिजू जनता दल
- बोडोलँड पीपल्स फ्रंट
- सिटिझन ॲक्शन पार्टी – सिक्कीम
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी लेनिनवादी) (लिबरेशन)
- देसिया मुप्पोकू द्रविड कळघम
- द्रविड मुन्नेत्र कळघम
- गोवा फॉरवर्ड पार्टी
- हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- इंडियन नॅशनल लोक दल
- इंडियन युनियन मुस्लिम लीग
- इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा
- जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टी
- जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- जनसेना पार्टी
- जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- जनता दल (संयुक्त)
- जननायक जनता पार्टी
- जनता काँग्रेस छत्तीसगड (जे)
- झारखंड मुक्ती मोर्चा
- केरळ काँग्रेस
- केरळ काँग्रेस (एम)
- लोक जनशक्ती पार्टी
- लोक जनशक्ती पार्टी (राम विलास)
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना
- महाराष्ट्रवादी गोमंतक
- मिझो नॅशनल फ्रंट
- नाम तमिळर कटची
- नागा पीपल्स फ्रंट
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
- नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
- पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट
- पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल
- राष्ट्रीय जनता दल
- राष्ट्रीय लोक समता पार्टी
- राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
- रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टी
- रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी
- समाजवादी पार्टी
- शिरोमणी अकाली दल
- शिवसेना
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
- सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा
- तेलुगु देसम पार्टी
- टिपरा मोथा पार्टी
- युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी
- युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल
- विदुथलाई चिरुथैगल कटची
- व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी
- युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी
- झोरम नॅशनलिस्ट पार्टी
- झोरम पीपल्स मूव्हमेंट
आयोगाचा उद्देश
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ निष्क्रिय व नियमांचे पालन न करणाऱ्या पक्षांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नाही, तर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, शिस्त व जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी एक सर्वसमावेशक आणि निरंतर प्रयत्नाचा भाग आहे.
- ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केला ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024’: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा अव्वल
- अंगणवाडी पाडली; दोघांवर गुन्हा दाखल
- ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी
- धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास
- खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची १.२० लाखांची फसवणूक