धाराशिवमध्ये समाजासाठी प्रेरणादायी पाऊल – दोन मृत व्यक्तींचे यशस्वी देहदान

0
213

धाराशिव | ७ ऑगस्ट २०२५:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे आज दोन मृत व्यक्तींच्या देहांचे यशस्वीपणे देहदान करण्यात आले. या समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोलाची मदत होणार असून, इतरांसाठीही एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

पहिले देहदान कै. श्री. सुभाष काशिनाथ सूर्यवंशी (वय ७५, सोलापूर – सेवानिवृत्त शिक्षक) यांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांनी नितीन व सऺतोष सूर्यवंशी यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेञ नानीजधाम ता.जि.रत्नागिरी, यांच्या प्रेरनेने देहदानाची इच्छा व्यक्त केली.

दुसरे देहदान कै.श्रीमती सिताबाई बापुराव रणदिवे (वय ७०) यांचे करण्यात आले. त्यांचे चुलत नातु दत्ता रणदिवे व उपसरपऺच सतिष खराटे याऺनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून देहदानासाठी पुढाकार घेतला.

या दोन्ही देहांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. शरीररचना विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या कार्यात डॉ. स्वाती पाऺढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचना विभाग), डॉ. सुवर्णा आनंदवाडीकर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. तानाजी लाकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र), श्री. प्रशाऺत बनसोडे, श्री. पंकज कसबे प्रयोगशाळा तऺञज्ञ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेऺद्र चौहान यांचे लाभले. त्यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आणि हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

देहदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून समाजातील इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here