महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव जिल्हा दौरा कार्यक्रम निश्चित

0
424

धाराशिव| प्रतिनिधी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान विविध शासकीय आढावा बैठकांना उपस्थिती, नागरीकांच्या निवेदने स्विकारणे, पत्रकार परिषद तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग यांचा समावेश आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील. तेथून इंडिगोच्या विमान क्र. ६ई-५०२७ ने सायं. ७.२५ वा. छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करून रात्री ८.२५ वाजता आगमन करतील. त्यानंतर व्हीआयपी शासकीय विश्रामगृहात मुक्काम असेल.

गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता मोटारीने बीडमार्गे धाराशिवकडे प्रयाण होईल. सकाळी ११.३० वाजता धाराशिव येथे आगमनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा बैठक, मुद्रांक व नोंदणी विभागाचा आढावा, भूमी अभिलेख विभागाचा आढावा तसेच दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता तुळजापुरात आगमन करून आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यावरील कार्यक्रमात उपस्थित राहतील.

त्याच रात्री ७.३० वाजता ते पुन्हा धाराशिव शासकीय विश्रामगृहात मुक्कामी परततील.

शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते मुरुम (ता. उमरगा) कडे प्रयाण करतील. ९.३० वाजता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी होतील. तेथून पुढे ११ वाजता मोटारीने जालनाकडे रवाना होतील.

जालन्यात दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने, आढावा बैठक, मुद्रांक व नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतल्यानंतर सायं. ७.३० वा. पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता भाजपा कार्यालय, संभाजीनगर कॉलनी येथे पक्ष बैठकीस उपस्थिती लावून, ९ वाजता भोकरदनकडे प्रयाण करून रात्री १० वाजता तेथे मुक्काम करतील.

या दौऱ्याच्या निमित्ताने तीन जिल्ह्यांत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व विकासकामांचा आढावा घेणे हाच मुख्य उद्देश असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here