महसूल दिन भूम मध्ये अन् टाळे जिल्हाधिकारी कार्यालयात

0
355

धाराशिव – जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूम येथे महसूल दिन आयोजित केला होता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना टाळे दिसून आल्याने मुख्यालयी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखा, लेखा विभाग, अभिलेख कक्ष यांना चक्क टाळे पाहायला मिळाले तर काही विभागात शुकशुकाट होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या किती कर्मचाऱ्यांना भूम येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले याबाबत विचारणा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जावे तर त्याही भूम येथील कार्यक्रमाला गेल्या असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क शुकशुकाट होताच मात्र महिन्याचा पहिला सोमवार असताना लोकशाही दिन असताना प्रशासनातील प्रमुख अधिकारी नसल्याने कामानिमित्त आलेलेल नागरिक रिकाम्या हाताने परत निघून गेले. याबाबत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देखील टाळेच

धाराशिव उपविभागीय अधिकारी कार्यालयाची देखील अशीच अवस्था होती. कार्यालय बंद का आहे हे सांगायला देखील तिथे कोणीच नव्हते. जात प्रमाणपत्राची कामासह इतर शैक्षणिक कामासाठी तसेच इतर तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना केवळ बंद कुलुपाचे दर्शन झाले. किमान आवक जावक विभाग तरी चालू असायला हवा होता अशा प्रतिक्रिया रेंगाळत उभारलेल्या नागरिकांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here