धाराशिव, ता. 9 एप्रिल 2025:
श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा 9 एप्रिलपासून 18 एप्रिल 2025 पर्यंत मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे. येरमाळा (ता. कळंब) येथे होणाऱ्या या धार्मिक यात्रेमध्ये हजारो भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या अहवालावरून जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक संजय जाधव (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) अंतर्गत अधिकार वापरत 11 एप्रिल रोजी 00:01 पासून ते 13 एप्रिल रोजी 24:00 पर्यंत येरमाळा परिसरातील विविध मार्गांवरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक बंद राहणारे मार्ग (अवजड वाहनांसाठी):
- छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
- कळंब → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → कळंब
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → परळी / परभणी
- परळी / परभणी → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- कळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
- छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कळंब
पर्यायी मार्ग (अवजड वाहनांसाठी):
- छत्रपती संभाजीनगर → येरमाळा उड्डाणपूल → येडशी → बार्शी
- बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → येरमाळा उड्डाणपूल → छत्रपती संभाजीनगर
- कळंब → मोहा फाटा → दहीफळ → येडशी → पांगरी → कुसळंब → बार्शी
- बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → दहीफळ → मोहा फाटा → कळंब
- बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → ढोकी → कळंब → परळी → परभणी
- परभणी → परळी → कळंब → ढोकी → येडशी → पांगरी → कुसळंब → बार्शी
- कळंब → मनुष्यबळपाटी → मांडवा → वाशीफाटा → छत्रपती संभाजीनगर
- छत्रपती संभाजीनगर → वाशीफाटा → मांडवा → मनुष्यबळपाटी → कळंब
सूट असलेली वाहने:
- पोलीस, रूग्णवाहिका, अग्निशमन दल
- अत्यावश्यक सेवेतील वाहने
- हलकी वाहने व एस.टी. बसेस
- श्री येडेश्वरी देवी यात्रेदरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ही वाहतूक योजना तयार केली आहे. वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.