धाराशिव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक संजय जाधव (भा.पो.से.) यांनी मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये एकूण सात पोलिस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
बदलून आलेले अधिकारी आणि त्यांची नवीन नेमणूक
- पोनि विनोद हनमंतराव इज्जपवार – परंडा पोलिस ठाण्यातून स्थानीक गुन्हे शाखा, धाराशिव येथे
- पोनि अजित तुकाराम चिंतले – लोहारा पोलिस ठाण्यातून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे
- पोनि सचिन चंद्रकांत यादव – सायबर पोलिस ठाणे, धाराशिव येथून नळदुर्ग पोलिस ठाण्यात
- सपोनि ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे – धाराशिव शहर पोलिस ठाण्यातून लोहारा पोलिस ठाण्यात
- सपोनि तात्या रुपाजी भालेराव – तुळजापूर पोलिस ठाण्यातून येरमाळा पोलिस ठाण्यात
- पोनि आण्णासाहेब रामचंद्र मांजरे – आनंदनगर पोलिस ठाण्यातून तुळजापूर पोलिस ठाण्यात
- पोनि रविंद्र पांडुरंग खांडेकर – तुळजापूर पोलिस ठाण्यातून आनंदनगर पोलिस ठाण्यात
पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले असून, बदलून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन ठिकाणी हजर राहून जबाबदारी स्वीकारावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या खांदेपालटामुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.