तुळजापूर (धाराशिव) – स्वेच्छानिवृत्ती मंजुरीसाठी 1.55 लाख रुपयांची लाच घेताना रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालय, तुळजापूरचे सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठेपाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau – ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आली.
57 वर्षीय तक्रारदार हे रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मंजूर करून घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, स्वेच्छानिवृत्तीचा ठराव घेण्यासाठी सचिव पेठेपाटील यांनी पंचासमक्ष 1.55 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ही बाब तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशीव येथे कळवली.
सापळा रचून कारवाई
ACB पथकाने तक्रारीची पडताळणी करून सचिव पेठेपाटील हे खरोखर लाच मागत असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर, तुळजापूरमध्ये त्यांच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून त्यांनी 1.55 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
झडतीत मिळालेले पुरावे:
अटक केल्यानंतर आरोपीच्या अंगझडतीत ₹6,180 रोख रक्कम आणि सुमारे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. त्यानंतर त्यांच्या घरझडतीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास:
आरोपी विरोधात पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपास केला जात आहे. ACB पथकाने आरोपीला अटक करून चौकशीची तयारी केली आहे.
कारवाई करणारे अधिकारी:
- सापळा अधिकारी: श्री. नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, ACB धाराशीव
- सापळा पथक: पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, जाकेर काझी, नागेश शेरकर, शशिकांत हजारे
- पर्यवेक्षण अधिकारी: श्री. सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप-अधीक्षक, ACB धाराशीव
- मार्गदर्शक अधिकारी: श्री. संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक, ACB छत्रपती संभाजीनगर) आणि श्री. मुकुंद आघाव (अपर पोलीस अधीक्षक, ACB छत्रपती संभाजीनगर)
ACB कडून आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या लाचेच्या मागणीविरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी ACB च्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- 5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?
- जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार ! मार्चमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आदेश, कर्मचारी उपस्थित – विभाग प्रमुख मात्र गायब!!
- धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका – जिल्हा आणि राज्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष