माजी खासदार संजय (काका) पाटील यांनी लेखी पत्राद्वारे व रोहित पाटील यांनी फोन व्दारे पाठिंबा दिला.
कवठेमहांकाळ,दि.२४.(तानाजी शिंगाडे)
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी कवठेमहांकळ येथील रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग नागज फाट्यावर सोमवारी (ता. २३) धनगर समाज बांधवांनी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. शेवटी तहसीलदार प्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित व्हावे या करिता पंढरपूर या ठिकाणी 14 दिवसापासून आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन होणार असल्याचे म्हटले आहे.तसेच महाराष्ट्रातील आदिवासी असलेला धनगर समाज कायम अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे. धनगरसमाजासाठी हक्काचे अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा,अन्यथा धनगर समाज पेटून उठल्या शिवाय राहणार नाही, असे नमूद केले आहे.
यावेळी रास्ता – रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वसंत कोळेकर गुरुजी,माजी सभापती अजितदादा कारंडे, माजी सभापती विकास हक्के, पैलवान नितीन आमुने, सुर्यकांत ओलेकर, सुरेश घागरे, राहुल गावडे,सुभाष खांडेकर यांच्या सह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनात माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर, उपसभापती रावसाहेब पाटील,जनाप्पा खताळ, संजय दाईगडे, दत्ता पाटील, दादासाहेब चोरमुले, कोंडिबा पाटील,संजय घागरे, संजय खरात,गटुभाऊ ओलेकर,
युवराज घागरे, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सरपंच रमेश कोळेकर, महादेव यमगर, पांडुरंग यमगर,दिपक कोळेकर, मंजुनाथ कोळेकर अमोल ओलेकर, भारत माने, अवधुत ओलेकर, राघू शिंदे, संभाजी शिंदे, निवृत्ती इरकर,आदींसह असंख्य सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.