ईट ( सोमेश्वर स्वामी)
महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता धमाल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय दादा सावंत यांच्या मित्र मंडळ कडून ईट येथे करण्यात आलेले आहे . हा कार्यक्रम खास सेने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याची जोरदार तयारीकरण्यात आली आहे .याची पाहणी शिवशक्ती कारखान्याचे सर्वेसर्वा केशव सावंत यांच्याकडून करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवाजी तात्या भोईटे,धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक प्रवीण देशमुख,युवा सेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण ,ईश्वर आबा देशमुख व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन जि.प प्रशाला ईट शाळेच्या प्रांगणात करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमात प्रथम पारितोषक फ्रीज,द्वितीय टीव्ही,तृतीय वॉशिंग मशीन, चतुर्थ पिठाचीचक्की व पाचवे बक्षीस शिलाई मशीन दिले जाणार आहे.
उपस्थित राहणाऱ्या सर्वच महिलांना साडीची भेट दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एक दिवस मनोरंजन व्हावे यासाठी ही होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली आहे . त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे अवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे .