ईट (सोमेश्वर स्वामी)- भुम तालुक्यातील ईट जि.प प्रशाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे 31 डिसेंबर शनिवार रोजी आयोजन करण्यात आले . यामध्ये 163 विद्यार्थ्यांनी स्टॉल उभारले होते. तीन तासांमध्ये विविध पदार्थाच्या विक्रीतून अनेक रुपयांची विद्यार्थ्यांनी कमाई केली. यावेळी आनंद नगरी कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय कमिटी अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून ईट जि प प्रशाले कडून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे. आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाँल लावून स्वतःहा बनविलेल्या पदार्थाची विक्री करुन त्यातुन दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे. प्रशालेने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल या हेतूने प्रशाले कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग कवडे, सहशिक्षक हुंबे सर, गाडे सर, कोळी सर, कचरे सर ,सातपुते सर , बाजीराव कवडे सर,नानासाहेब कवडे सर, पवार सर, पितळे सर ,कांबळे सर आंधळे सर , तसेच सहशिक्षिका कुलकर्णी मॅडम,भोसले मॅडम, गिरी मॅडम,गवळी मॅडम,देशमुख मॅडम, यांनी परिश्रम घेतले.