परंडा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने माजी सैनिक शंकर सोंडगे व राजेंद्र उदागे यांचा सत्कार

0
100

परंडा( प्रतिनिधी )परंडा उपजिल्हा रुग्णालयात सिक्युरिटी गार्डची नौकरी करीत असलेले माजी सैनिक राजेद्र उदागे व वरिष्ठ लीपीक शंकर सोंडगे यांचा कारगील विजय दिनाचे औचित्य साधून परंडा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते दि. २६ जुलै रोजी सत्कार करण्यात आला.
१९९९ ला कारगिल युद्ध झाले तेव्हा मेजर शंकर सोंडगे हे या युद्धा मध्ये समर्पणाने लढले. त्यांचे शौर्य,धाडस,त्याग यामुळेच पुन्हा आपला देश हा सुरक्षित झाला व कश्मीर पुन्हा भारताकडे आले.असे देशाची सेवा केलेले वीर जवान माजी सैनिक शंकर सोंडगे हे उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ लीपीक पदावर तर माजी सैनिक राजेद्र उदागे हे परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.
परंडा उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने या दोन्ही माजी सैनिकांचा वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा,पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी डॉ.ऑफीस
सुपरटेंडंट पवार साहेब,आनंद मोरे,डॉ.ठाकुर मॅडम,अमोल बांबूरकर,चंद्रभान पवार,तानाजी गुंजाळ,किशोर जगताप, रक्त पुरवठा विभाग सोनल कुकडकर, हॉस्पिटल इन्चार्ज श्रीमती कुलकर्णी मॅडम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here