महावितरणच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह
पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!
पारा (राहूल शेळके): वाशी तालुक्यातील पारा येथील नवयुवक विशाल गोडसे चे दैव बलवत्तर म्हणून दि. २५ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अंगावर महावितरण ची मेन लाईनची तार पडून सुद्धा हा युवक सुखरूप बचावला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , पारा येथील नवयुवक विशाल लक्ष्मण गोडसे हा युवक सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पारा गावातून स्वतःच्या शेताकडे जात असताना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाशी रोडवर स्वतःच्या मोटरसायकल वरून जात असताना अचानक वाशी ते पारा जाणारी महावितरण ची मेन लाईनची तार तुटून अचानक अंगावर पडली व तो युवक गाडीवरून पडला . दैव बलवत्तर म्हणून या युवकाला थोडासा करंट लागला परंतु शारीरिक काही नुकसान झाले नाही. याबाबत युवकाने वाशी व पारा येथील महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर संपर्क केला असता कोणीही कॉल घेतला नाही.
दैनिक जनमतने वारंवार बातमीतून तसेच प्रतिनिधीने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेटून पारा येथेच 33 के व्ही प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करण्यात यावी म्हणून पाठपुरावा केला आहे .परंतु या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अध्याप पर्यंत काहीही कामे केलेली नाहीत. अशा निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पारा 33 के वी चे काही देणे घेणे दिसत नाही .पावसाळापूर्वी प्रि मेन्टेनन्स ची कामे जर वाशी महावितरण केले असते तर आज ही वेळ आली नसती. वाशि महावितरण ने या गंभीर गोष्टीची दखल घेऊन प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करावीत अन् ग्राहकांना विज पुरवठा सुरळीत द्यावा अशी मागणी होत आहे.