दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करा – आ. कैलास पाटील यांची प्रधान सचिवांकडे मागणी

0
87

धाराशिव – धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करण्याची मागणी आ. कैलास पाटील यांनी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्याकडे केली आहे.

धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस व गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्याचे फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक आहे.
धाराशिव जिल्हयात दिनांक-११/०४/२०२४ तसेच त्यानंतर दि. २०/०४/२०२४ रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन जिरायत पिका खालील ४०२ बाधित शेतकऱ्यांच्या १४१.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. १३६०० प्रमाणे रु.१९.२४०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत पिका खालील २०९ बाधित शेतकऱ्यांच्या ७३.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. २७००० प्रमाणे रु.१९.८४५०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील २०३१ बाधित शेतकऱ्यांच्या १२२०.६० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. ३६००० प्रमाणे रक्कम रु.४३९.४१६०० लक्ष असे एकुण ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या एकुण २६४२ शेतकऱ्यांना रक्कम रु.-४७८.५०५०० लक्ष मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या कडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला असुन सदर प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना सदरील प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी अनुदान देणेबाबत घोषणा करण्यात आलेली होती. परंतु स्वतःला निर्णय वेगवान गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या घोषणाबाज सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिलेली नाही. त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान पेरणीपुर्व जमा होणे आवश्यक आहे.धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करणेबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करावी असे आ. कैलास पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here