धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव शहरात नियमित पाणी पुरवठा होत नव्हता. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. पुढील काही दिवस पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांनी प्रसिद्धीपत्रक काढून यांनी सांगितले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
धाराशिव शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाळी वातावरण व वाऱ्यामुळे वारंवार खंडित होत आहे. तसेच उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरास अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत शहरात नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.