डोक्यात दगड घालून केला खून, फरार आरोपीस परंडा पोलिस पथकाने दोन तासात केली अटक
परंडा ( प्रतिनिधी ) तुझ्याच मुलाने माझ्या पत्नीस पळऊन नेहले आहे तीला शोधण्यासाठी चल असे म्हणून बापू ऊर्फ उत्तम कदम यांना घरातून नेऊन आरोपी सुधीर काळे याने दगडाने ठेचून खून केला ही घटना दि.२५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक येथे घडली आहे.
याबाबत पोलिसा कडून मिळालेले माहिती अशी की
काही दिवसांपूर्वी मयत उत्तम कदम रा.भूम याचा मुलगा राम कदम याने सुधीर उर्फ पापा काळे याची पत्नी सोना हीला प्रेम संबंधातून पळवून नेले होते. त्यानंतर सुधीर काळे याने बापू कदम यास माझी बायको शोधण्यासाठी माझ्या बरोबर चल, तुझ्याच मुलाने माझी बायको पळवून नेलेली आहे.तिला शोधून देणे आता तूझीच जबाबदारी आहे.जो पर्यंत माझी बायको सापडत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही असे म्हणून स्वतःच्या पिकअप वाहणातून आस्तिक भोबडे नावाच्या चालकास सोबत घेवून त्याच्या बायकोचा शोध घेण्यासाठी दि २४ एप्रील रोजी भूम येथून घरातून निघाले होते.
संभावीत ठिकाणांवर पळून गेलेल्या राम आणि सोना यांचा शोध घेतला परंतू ते दोघे सापडले नाहीत.दि.२५ एप्रिल रोजी सोलापुर जिल्हयातील टेंभूर्णी येथे शोध घेवून साकत मार्गे परत भूमकडे जात असताना साकत (बू) रोडवर अंदाजे १०.३० वा सूधीरने वाहनाची चावी काढून घेतली आणी गाडीखाली उतरला आणी गाडीची चावी खाली रानात फेकून दिली.त्याच्या मागोमाग बापू कदम हा देखील गाडीतून खाली उतरला आणि सुधीरला चल आपण भूमला जाऊया म्हणून विनंती करू लागला.परंतू सूधीरने बापूचे एकले नाही उलट बापूच्या मुलाने त्याच्या बायकोला पळवून नेल्याचा राग मनात धरून बापूच्या दिशेने दगडे भिरकावु लागला.दगडाचा मार लागून बापू रोडवर पडल्यावर सुधीरने एक मोठा दगड बापूच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी तात्काळ घटनास्थळास भेट दिली.
पोलीस अधिक्षक अतूल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उप विभागीय पोलीस अधिकारी भूम गोरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे,सहाय्यक पोलीसउपनिरीक्षक मुळे,पोलीस हवलदार दिलीप पवार,पोलीस हवलदा विशाल खोसे,पो.ना.शेवाळे,पोना,काकडे,पो.का.कोळेकर यांच्या पथकाने आरोपीस पळून जात असताना अवघ्या दोन तासात परंडा तालूक्यातील आंतरगाव येथून ताब्यात घेतले.
सदरील प्रकरणात मयताचा मूलगा लक्ष्मण उत्तम कदम याच्या फिर्यादीवरून कलम ३०२ नुसार परंडा पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे करीत आहेत.