Home ताज्या बातम्या दूध भेसळ प्रकरणी समृद्धी मिल्क व फूड प्रोसेसिंग प्लांटवर कारवाई

दूध भेसळ प्रकरणी समृद्धी मिल्क व फूड प्रोसेसिंग प्लांटवर कारवाई

0
27

  • प्रकल्पाचा परवाना निलंबित
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्रीस प्रतिबंध

धाराशिव दि.25,(प्रतिनिधी) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे दुध भेसळ होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जिल्हास्तरीय दुध भेसळ रोखणाऱ्या समितीने आज 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक गौहर हसन,अन्न व प्रशासनचे निरिक्षक,वजन व मापे अधिकारी,प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी,छत्रपती संभाजीनगर आणि संरक्षणार्थ 10 ते 15 पोलीस यांच्या सहपथकाने धाड टाकून कारवाई केली.

रत्नापूर येथील समृध्दी मिल्क अँड फुड प्रासेसिंग प्लँट या प्रकल्पावर जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती पथकाने धाड टाकली असता घटनास्थळी शेडमध्ये दुध उत्पादने, कुल्फी,बदाम शेक बनविण्यात येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.अतिशय अस्वच्छ वातावरणात दुध उत्पादने बनविण्याची प्रक्रीया होत असल्याचे दिसुन आले.त्यामध्ये बदाम शेक,खवा,प्रोटीन पावडर हे पदार्थ आढळुन आले.पदार्थाचे नमुने काढुन अन्न व औषध प्रशासनामार्फत पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

या प्रकल्पावर बदाम शेक व एक स्टेनलेस स्टील कॅनला बुरशी लागलेली असल्याचे दिसून आले. यावेळी बदाम शेक नष्ट करण्यात आला.या प्रकल्पावर एक वजन काटा मुद्रांकीत नसल्याने वजन मापे अधिकारी यांनी प्रकल्पावर दंडात्मक कारवाई केली.या प्रकल्पात आढळुन आलेले पदार्थ अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करण्यात आले. प्रकल्पाचा परवाना निलंबीत करण्यात आला.पुढील आदेशापर्यंत प्रकल्पामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादन / विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

ही कारवाई दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली.सदर कारवाई विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.आयुक्त पशुसंवर्धन विभाग व आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
*

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here