कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क
कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील बुजवडे येथील गोवा बनावटीच्या मद्य साठ्यावर कारवाई केली असून, यावेळी ३ लाख ६० हजार ४८० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ असा अंदाजे १० लाख १० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
काळया रंगाच्या स्कॉपिओ नं. GA-01-R-9022 या वाहनाची तपासणी केली असता, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले विविध बँडचे ७५० मिली व १८० मिलीचे ५९ बॉक्स मिळून आले. वाहन व मुद्देमाल संशयित शिवाजी गावडे व दशरथ सावंत यांचा असल्याचे समजते. त्यांना फरार घोषीत करुन या गुन्हयामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास चालू आहे. विदेशी मद्य मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे ७५० मिलीचे १२ बॉक्स, डीएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ७५० मिलीचे ३ बॉक्स, गोल्डन एस ब्ल्यू व्हिस्कीचे ७५० मि.ली.चे २५ बॉक्स, गोल्डन एस
ब्ल्यु व्हिस्कीचे १८० मिलीचे २५ बॉक्स, किंगफिंशर स्ट्रांग बिअर चे ५०० मि.ली. ४ बॉक्स असे एकूण ५३४ ब.लि. वाहनासह जप्त करण्यात आले. मुद्देमाल १०,१०, ४८० चा असून मद्याची किंमत ३,६०,४८० आहे. आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे करत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे, दु. निरीक्षक अभयकुमार साबळे, जवान राजेंद्र कोळी, विशाल भोई, सचिन लोंढे, मारुती पोवार, साजिद मुल्ला यांनी केली.