परंडा,(प्रतिनिधी) परंडा शहरातील प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना नुकतीच मलेशिया येथील इनटी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर झाली.ही फेलोशिप त्यांना दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.
पुणे येथील एम.आय.टी. विद्यापीठकडून मागील वर्षी पानगावकर यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या संशोधनातील उत्कृष्ट कामाच्या आधारे व अध्यापनाच्या अनुभवाच्या अनुषंगाने त्यांना पुढील संशोधनासाठी ही फेलोशिप फायदेशीर ठरणार आहे.आर्टिफिशीअल इंटेलेजन्स आणि मशीन लर्निंग या विषयाशी निगडित त्यांचे संशोधन आहे. तसेच ते सध्या उज्जैन,मध्यप्रदेश येथिल अवंतिका विश्वविद्यालय येथे अभियांत्रीकीच्या संगणक विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत व विविध संशोधनपर प्रोजेक्ट वर काम करत आहेत.
प्रा.डॉ.सत्यजित पानगावकर या फेलोशिप च्या माध्यमातून मलेशियात रिसर्च प्रोजेक्ट,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिसर्च पब्लिकेशन्स आणि विविध ग्रँट्स साठी काम करतील. त्यांनी आता पर्यंत ०१ पेटंट,८ कॉपीराईट,०१ रिसर्च ट्रेडमार्क तसेच ३५ संशोधनपर पेपर्स लिहिलेले आहेत.आपल्या संशोधनाचा उपयोग जगातील सर्व सामान्यच्यासाठी व्हावा अशी त्यांची तळमळ आहे.
प्रा. डॉ.सत्यजित पानगांवकर हे मूळचे परंडा शहरातील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी विविध क्षेञातील मान्यवरांनी, मिञपरिवारांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
परंड्याचे सुपुत्र प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना मलेशिया विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर
RELATED ARTICLES