परंडा (प्रतिनिधी) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे दि८एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख,वार्ड प्रमुख,बुथ प्रमुख,शिवसैनीक यांची आढावा बैठक पार पडली.
या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,जिल्हा प्रमुख रणजीत पाटील,तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकाना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उस्मानाबाद लोकसभेचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश
राजेनिबांळकर यांना परंडा तालुक्यातुन जास्ती जास्त मताची लीड देऊन पुन्हा लोक सभेत पाठवा असे अवाहाण केले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,शिवसेना समन्वयक जनार्धन मेहेर,माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे,शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर,माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी,शिवसेना महीला आघाडी तालुका संघटक छायाताई जोगदंड,शिवसेना उप तालुका प्रमुख दिलाप रणभोर, उप तालुका प्रमुख रमेश गरड, उप तालुका प्रमुख शिवाजी कासारे,उप तालुका प्रमुख बुध्दीवान गोडगे,उप शहर प्रमुख उमेश परदेशी,विजय खरसडे, सुदाम देशमुख,हरि नलवडे, किरण शिंदे,अनिकेत काशिद, जावेद बागवान,दिपक गायकवाड,शाहु खैरे,अशोक गवारे,शिवाजी देवकर,सागर ठवरे,बिभिषण घोगरे,प्रदिप नेटके,भगवंत लांडगे,आब्बास मुजावर,बाबुराव गायकवाड, संजय कदम,तुषार पाटील, भास्कर शिंदे,दादा होरे,मकरंद जोशी,संतोष गायकवाड,प्रशांत गायकवाड,संजय वाघ,सुहास कदम,रावसाहेब काळे,संतोष करळे,महेश करळे,सत्तार पठान यांच्यासह परंडा तालुका व परंडा शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख/वार्डप्रमुख /बुथप्रमुख व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.