धाराशिव – वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यातील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. भौतिक सुविधांचा अभाव तर आहेच मात्र सध्या उन्हाळा सुरू आहे त्यासाठी आवश्यक असणारे जंतनाशक गोळी व ओ.आर.एस. पावडर सारखे औषध उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
६ वर्षाच्या चिमुरडीला तिचे वडील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोट दुखू लागल्यामुळे घेऊन गेले होते. मुलीस डॉक्टरांनी दिलेल्या औषधापैकी फक्त एकच गोळी मिळाली. मात्र जंताची गोळी आणि ओ आर एस पावडर मात्र बाहेरून घेण्यास सांगितले.
उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर महाविद्यालयाची पूर्वतयारी नसेल तर रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औषधाच्या अनुपलब्धतेबाबत अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी औषध उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र औषधासाठा पुरेसा रहावा यासाठी शासनाने निधी देऊनही तुटवडा का होतो? रुग्णांना बाहेरून औषधे का खरेदी करावी लागतात हा संशोधनाचा विषय आहे.