लोकसभेपूर्वी फुल्ल इन्कमींग
धाराशिव – जिल्ह्यात येत्या काही काळात बरेच जण भाजपचे कमळ हाती घेतील या चर्चेला आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र नेमके प्रवेश कोणाचे होणार आहेत, केव्हा होणार आहेत हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.
शहरात आज महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), प्रहार, रयतक्रांती यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून महायुतीचा मेळावा १४ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके, राजाभाऊ ओव्हाळ, सुरज साळुंके, मयूर काकडे, सुरज अबाचने आदी उपस्थित होते.
समन्वय समिती चे काम
महायुतीतील घटक पक्षात समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार असून प्रत्येक आठवड्याला समितीतील सदस्यांची बैठक होणार आहे. शासकीय समित्यांवर कोणाची नेमणूक करायची याबाबत देखील चर्चा याच समितीत होणार आहे.