नंदगाव (शाम नागीले) तुळजापूर तालुक्यातील नंदगावामध्ये दुर्मिळ प्रजातीचा प्राणी आढळला ज्याला येथील स्थानिक लोक मरनागिण या नावाने संबोधत होते घटनास्थळी ज्यावेळेस प्राणी मित्र व सर्पमित्र संजूबाबा यांनी त्या प्राण्याला पकडुन सुरक्षित पर्यावरणात सोडण्याचे काम यशस्वी रित्या केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तुळजापूर तालुक्यातील नंदगावामध्ये दुर्मिळ प्रजातीचा प्राणी आढळला ज्याला येथील स्थानिक लोक मरनागिण या नावाने संबोधत होते घटनास्थळी ज्यावेळेस प्राणी मित्र व सर्पमित्र संजूबाबा यांनी त्या प्राण्याला पकडुन सुरक्षित पर्यावरणात सोडण्याचे काम यशस्वी रित्या केले त्यांच्याशी या प्राण्याबद्दल संवाद साधताना त्यांनी सांगितले की या प्राण्याला उद मांजर किंवा पान मांजर या नावाने ओळखले जाते अतिशय सुंदर असा प्राणी आहे आणि मुख्य म्हणजे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा प्राणी स्मशानातील मेलेले मुडदे उकरून खातात किंवा लहान मुलांना मारून पाठीवर टाकून घेऊन जातात पण या सर्व अफवांचे खंडन करत सर्पमित्र संजूबाबा यांनी सांगितले की या सर्व अफवा आहेत आणि या प्राण्यांचे मुख्य खाद्य फळे व भाज्या आहेत आणि हा पाण्याच्या जवळ रहात असल्यामुळे मासे हे त्याचे आवडीचे खाद्य आहे. सामान्य नागरिकांमध्ये या प्राण्याबद्दल अपुरी माहिती असल्यामुळे या प्राण्यांना मारले जाते आणि जादूटोणा करण्यासाठी त्याची अवैध शिकारी करण्यामुळे आज या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे आणि लोकांमध्ये या प्राण्यांबद्दल जागृत करणे गरजेचे आहे.