उस्मानाबाद,दि.17 (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग,शासन निर्णयानुसार एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता तहसील व मंडळ मुख्यालयी फेफार अदालत घेणे बाबतच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दि. 11 मे 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करुन जिल्हयातील तालुका निहाय फेफार अदालत घेण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेल्या साध्या व विवादग्रस्त फेफारांची संख्या निशचित करुन दर महििन्याच्या तिस-या मंगळवारी शासकीय सुटटी असल्यास त्याच्या लगतच्या दुस-या दिवशी फेरफार अदालत आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुषंगाने दि. 16 मे 2023 रोजी जिल्हयातील 57 मंडळ मुख्यालयी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/ अ.क. यांच्या उपस्थित फेरफार अदालत घेण्यात आली त्यामध्ये 831 फेफार मंजूर करण्यात आले आहेत.
तालुका निहाय मंडळ संख्या व फेरफार आदालतीमध्ये मंजूर फेरफारची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. उमरगा संख्या 7 (64),उस्मानाबाद 11 (167), कळंब 8 (165), तुळजापूर 9 (85), परंडा 7 (186), भूम 7 (78), लोहारा 4 (25), वाशी 4(61),यांनतरही शेतक-यांचे फेरफार प्रलंबित असतील अथवा नव्याने फेरफार घेण्याबाबत शेतक-यांनी जून महिन्यात दि.20 जून2023 रोजी होणा-या फेरफार अदालत मध्ये जास्ती जास्त सहभाग नोंदवावा आसे अवाहन जिल्हाधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.