दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

0
73
दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

उस्मानाबाद: जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पनदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला़शहरातील पत्रकार भवनमध्ये दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ कार्यक्रमास जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सचिव संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेते शोएब मोमीन, अजित जगताप, सलिम मोमीन, श्रीकांत पवार, किशोर सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी संघटक प्रशांत कावरे, विनोद बाकले, मल्लिकार्जुन सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष कदम, तालुका सचिव आकाश नरोटे, पत्रकार उपेंद्र कटके,  प्रविण पवार, विजय मुंडे, किशोर माळी, लक्ष्मीकांत बनसोडे, अजहर शेख, शारूख सय्यद, संतोष खुने आदींसह पदाधिकारी, सदस्य, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here